जागतिक महिला दिन International Women’s Day

जागतिक महिला दिन International Women’s Day

आज आपण या आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक महिला दिवसInternational Women’s Day या विषयावर निबंध वाचणार आहोत.International Women’s Day जगभरात साजरा केला जातो. खालील माहिती वाचून किंवा आहे तशी लिहू शकता. आपण जागतिक महिला दिनाविषयी निबंध लिहू शकता.

दर वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्च का साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी 1990 रोजी महिला दिवस साजरा करण्यात आला. परंतु पुढे 1910 यावर्षी 8 मार्च दिनांक आंतरराष्ट्रीय महिला दिवस निश्चित करण्यात आला.दिवस वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी आणि महिलांनी स्वतःच्या न्यायहक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ जगभर साजरा केला जातो. हृदयी अमृत नयनी पाणी असा जिचा उल्लेख केला जातो त्या स्त्रीच्या सन्मानाच हा दिवस आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अतिउच्च स्थानी कार्यरत असणाऱ्या उल्लेखनीय आणि कर्तृत्ववान स्त्रीयांना मानाचा मुजरा करण्याचा हा दिवस International Women’s Day आहे.

जागतिक महिला दिन

आज पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून महिला सर्वच क्षेत्रांमध्ये धडाडीने कार्य करीत आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष,संरक्षण मंत्री, पालट,अंतराळवीर,संशोधक अशा वेगवेगळ्या पदांवर महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा ठसा उमटविला आहे. महिला आरक्षणामुळे प्रत्येक गावांमध्ये महिला निवडणूक जिंकून लोकप्रतिनिधी म्हणून यशस्वीपणे नेतृत्वाची धुरा सांभाळत आहेत.महिलांमध्ये यशाचे सर्वोत्तम शिखर गाठण्याची क्षमता दिसून येते. आजची स्त्री कर्तृत्ववान आहे एवढेच नाही तर एक पाऊल पुढे आहे हेच दिसून येईल.

27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन 27 February Marathi Bhasha Gaurav Din

भारतामध्ये राजा राम मोहन राय, महात्मा ज्योतिराव फुले,महर्षी धोंडो केशव कर्वे,सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर, पंडिता रमाबाई अशा महान समाजसुधारकांनी महिलांच्या उद्धारासाठी खूप मोठे कार्य केले आहे. सतीची चाल केशवपण बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न या समाजसुधारकांनी केले. स्त्रियांचे शिक्षण,विधवा पुनर्विवाह तसेच प्रौढ विवाह असे अनेक विषय समाजासमोर मांडून त्यावर विचार मंथन घडवून आणले आणि सुधारणा समाजाच्या गळी उतरवल्या.

मुलींची सुरक्षा व सशक्तीकरण निबंध Mulinchi Suraksha v Sashaktikaran

त्याचेच फलित म्हणून लग्नाचे वय मुलाचे किमान 16 ते 18 तर मुलीचे किमान दहा ते बारा असावे अशी तरतूद त्या काळी झाली. त्यामुळे मुलींच्या बालविवाहाला पायबंद बसू लागला. सध्या हेच वय मुलाचे 21 वर्षे आणि मुलीचे 18 वर्षे असे करण्यात आले आहे. हा सुद्धा एक सुधारणेचा विषय आहे.

महात्मा ज्योतिबा फुले, भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून ज्यांना मान मिळाला त्या सावित्रीबाई फुले यांचे योगदान महिलांच्या शिक्षणाबाबत खूप मोठे आहे. तत्कालीन समाजाचा प्रखर विरोध आणि त्यामधून निर्माण झालेल्या सामाजिक संकटाचा सामना करीत फुले दाम्पत्याने महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा दमदार पाया रचला. त्याचाच परिणाम म्हणून स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवत आहेत आणि स्वतंत्रपणे आपले मत व्यक्त करू लागल्या आहेत.

1902 मध्ये रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली. 1904 मध्ये भारत महिला परिषदेची स्थापना झाली. या संघटना महिलांच्या समस्या व मागण्या यांचा जोरदार पाठपुरावा करू लागल्या. त्यातूनच स्त्रियांना मतदानाचा अधिकार आणि मतदानाबरोबरच निवडणुकीला उभे राहण्याचा हक्क अशा सुधारणा भारतामध्ये झाल्या. भारतामध्ये 1943 पासून महिला दिन साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 पासून भारताने राज्यघटना स्वीकारली आणि स्त्रियांना समानतेचा हक्क देण्यात आला.

लिंग समानता जोपासणारा समाज निबंध Ling samanata Jopasanara samaj

आज महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. सर्वच क्षेत्रांमध्ये त्या उंच भरारी घेऊ शकतात. त्याकरिता कुटुंबातील पाठबळ आणि अभ्यासाची साधना करीत राहणे हे मात्र महत्त्वाचे आहे आणि त्यातूनच महिलांचा प्रवास प्रगतीकडे होत राहील, यात शंकाच नाही. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच योजन सर्वत्र होत असते.पण खरी गरज आहे ती महिलांच्या जीवनाकडे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्व कडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्याची. महिलांनी जगभरामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व क्षेत्रात बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाची मोहोर निश्चितच उमटवलेली आहे. महिलांच्या कर्तृत्वाच्या गाथा महिला दिनाच्या निमित्ताने समाजासमोर आल्या पाहिजेत आणि त्यातूनच एकूण समाजाचा दृष्टीकोण बदलला जावा. स्त्री-पुरुष समानतेच नारा देणे योग्य महत्त्वाचे आहे.

महिलाही पुरुषांइतकेच कर्तृत्व गाजवते. महिलेला पुरुषांइतकेच अधिकार आहे.समाजामध्ये महिलांना दुय्यम दृष्टीकोण न राहता समतेचा विचार रुजणे गरजेचे वाटते. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांची गौरवगाथा समोर येणे आणि त्या गौरव गाथेमधून प्रत्येक सामान्य महिलेला आत्मविश्वासाचे बळ मिळावे हे महत्त्वाचे आहे. हा विचार तळागाळात रुजला पाहिजे.

महिलांना मिळणारा सन्मान हा फक्त महिला देण्यापुरता फक्त महिला दिना पुरता नको तर तो नेहमी निरंतर राहिला पाहिजे. पुरुषी मानसिकतेमधून महिलांविषयीचा दृष्टीकोन संपुष्टात आला तर समाजामध्ये आनंद नांदायला फार वेळ लागणार नाही. रोजच महिलांच्या आयुष्यात सन्मानाचा दिवस येईल अशी सामाजिक स्थिती निर्माण झाली तरच प्रगतीचे पंख लावून विकासाच्या गतीने सर्वांनाच पुढे निश्चितपणे जाता येईल.

स्त्रियांना दुय्यम लेखण्याची पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी प्रत्येकाला घरापासूनच प्रयत्न करावे लागणार आहे हेही तितकेच खरे. आजही समाजामध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी फारसा उत्साह दिसून येत नाही. हळू हळू थोडा फार बदल होताना निश्चितच दिसतो आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करत गेलो, त्याचा आनंद मानत गेलो तर या मानसिकतेला निश्चितच रुजवले जाईल आणि मुलगा मुलगी असा भेद न करता दोघांनाही समानतेने स्वीकारण्याची गरज आहे. हे सर्वांच्याच लक्षात येण्याची गरज आहे.

आजही मुलींना विशिष्ट प्रकारची कामे करावी लागतात मुलांनी खेळ पुरुषांनी अशी कामे करणे प्रतिष्ठेचे समजले जात नाही परंतु घरातूनच दर शिक्षण किंवा संस्कार तर योग्य दिले तर निश्चितच यामध्ये बदल होईल सर्व संस्का

आजची स्त्री पुरुषापेक्षा काकणभर जास्त कर्तृत्व गाजवताना दिसून येते. सर्व स्त्रियांना योग्य संधी मिळाली तर निश्चितच त्या आघाडीवर राहून कार्य करतील.

जागतिक महिला दिन International Women’s Day

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment