जागतिक सायकल दिवस World Bicycle Day 2023

जागतिक सायकल दिवस World Bicycle Day 2023

World Bicycle Day 2023
Image courtesy Unsplash

जागतिक सायकल दिवस World Bicycle Day 2023 प्रत्येक वर्षी 3 जून रोजी साजरा केला जातो. बदलत्या हवामान आणि ग्लोबल वार्मिंग च्या काळामध्ये वाढलेले प्रचंड हवेचे, ध्वनीचे प्रदूषण पाहता सायकल वापर वाढणे अतिशय गरजेचे आहे. या दृष्टीने हा जागतिक सायकल दिवस World Bicycle Day 2023 खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे.

जागतिक सायकल दिन कधी असतो?

सायकल चालवणे व सायकल चालवल्यामुळे होणारे आरोग्यदायी फायदे याविषयी जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी 3 जून रोजी जागतिक सायकल दिन जगभरात साजरा केला जातो. तीन जून 2018 पासून जागतिक सायकल दिन जगभरात साजरा होत आहे.सायकलची वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता ओळखण्यासाठी हा दिवस साजरा करतात.

प्लॅस्टिक प्रदूषणावर मात निबंध Essay on Beat Plastic Pollution

सायकल हा साधे, सोपे, सर्वांना परवडणारे, पर्यावरणस्नेही वाहन आहे. शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवून आपण आज चाललो आहोत. यामध्ये सायकलचे योगदान पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच मानवी आरोग्याच्या दृष्टीने चांगली ध्येये गाठू शकते. यात व्यक्तिशः प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्त्वाचे आहे.

जागतिक सायकल दिन का साजरा केला जातो?


सायकल दिन साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील माँटगोमेरी कॉलेजचे प्रोफेसर लेझेक सिबिल्स्की यांनी याचिकेच्या स्वरूपात दिला होता. सन १९९० च्या दशकात सायकल चालवण्यासाठी अनेक लोक प्रोत्साहन देत होते परंतु सायकल चालवण्याच्या आरोग्यदायी फायद्याचे महत्त्व लोकांच्या लक्षात राहिले नाही. त्यानंतर युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने या सायकल दिनाचे महत्त्व जपण्यासाठी ३ जून २०१८ रोजी हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला गेला. हा दिवस आता दरवर्षी जगभर साजरा केला जातो.

World Bicycle Day

जागतिक आरोग्य सायकल चालवण्यास प्रोत्साहन देते नजीकच्या भविष्य काळामध्ये जे हवामान बदल होत आहेत. त्यामुळे मानवी आरोग्यावर काही भयानक परिणाम होत आहेत. ते पाहता सायकल चालवण्याला प्रोत्साहन दिले जात आहे.

“WHO actively promotes cycling for its myriad benefits to health and the environment, including increasing physical activity, reducing noncommunicable diseases such as cancer and diabetes, and decreasing air and noise pollution. Like governments worldwide, it also recognizes cycling as a facilitator of achievement of many Sustainable Development Goals, including those on education, energy, employment, cities and inequalities. “

जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने आपण शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना, सायकल सारख्या पर्यावरणस्नेही वाहनांकडे दुर्लक्ष करत आहोत. पुन्हा आपल्याला पर्यावरण संवर्धन होण्यासाठी किंवा जे आजच्या काळात हवामान बदल होत आहेत; त्यामध्ये टिकून राहण्यासाठी एक शाश्वत पर्याय म्हणून सायकलकडे पाहणे गरजेचे आहे.

सायकल चालवण्याचे फायदे (Cycling benefits in Marathi)

 • किमान अर्धा तास सायकल चालवल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते. मानसिक तंदुरुस्ती सुद्धा सायकल चालवल्यामुळे चांगली राहते.
 • सायकल चालवल्यामुळे आपले वजन समतोल राहते.
 • सायकल चालवल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते व रक्तदाब संतुलित राहतो
 • सायकल चालवल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
 • सायकल चालवल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते.
 • सायकल चालवल्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
 • दररोज सायकलींग केल्यामुळे आपला मेंदू 15 ते 20 टक्के अधिक सक्रिय राहतो. अर्थात सायकल चालवणाऱ्याचा मेंदू इतरांपेक्षा अधिक तल्लख बुद्धीचा होतो.
 • सायकल चालवल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी जळतात त्यामुळे लठ्ठपणा निर्माण होत नाही. आळस व झोप येत नाही. कामाच्या ठिकाणी आपली क्रियाशीलता वाढते.
 • सायकल चालवल्यामुळे आपल्या हृदय आणि फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. मजबूत होतात आणि अनेक प्रकारचे आजार रोग आपल्यापासून दूर राहतात.
 • दररोज अर्धा तास सायकल चालवल्याने लठ्ठपणा, हृदयविकार, मानसिक आजार, मधुमेह, संधिवात, उच्च रक्तदाब अशा अनेक आजारांपासून आपण वाचू शकतो.
 • सायकल चालवल्यामुळे आपला स्टॅमिना वाढतो.
 • दररोज किमान ३० मिनिटे सायकल चालवल्यास चांगली गाढ झोप लागते. म्हणजेच आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारते.

जागतिक कीर्तीच्या काही प्रसिद्ध व्यक्तींनी सायकल चालवणे विषयी काय म्हटले आहे ते आपण पाहूया.

आयुष्य हे सायकल चालविण्यासारखे आहे. आपलं अस्तित्व राखण्यासाठी आपण पुढे जाणे आवश्यक आहे.”– अल्बर्ट आइनस्टाइन

प्रौढ व्यक्तीला सायकलवर पाहणे म्हणजे मानवजातीच्या भविष्याबद्दल निश्चिंत होणे आहे.”
– एच.जी. वेल्स

जेव्हा मी सायकल चालविणे शिकलो; तेव्हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस होता.”
– मायकेल पालीन

संयुक्त राष्ट्र महासभेने ( United Nations General Assembly) दिनांक 3 जून 2018 मध्ये जागतिक सायकल दिवस म्हणून घोषित केला;तेव्हा अनेक देशांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. “सायकल दिन”दिवसाची सुरुवात करण्यासाठी लेस्झेक सिबिल्स्की यांनी मोहीम (Campaign) सुरू केली होती, ज्याला तुर्कमेनिस्तान आणि इतर 56 देशांनी पाठिंबा दिला होता.

कोणत्याही प्रकारची शारीरिक कसरत उदाहरणार्थ सायकलींग, चालणे, खेळणे,व्यायाम करणे ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. शारीरिक दृष्ट्या कार्यरत राहिल्याने आपले वजन नियंत्रित राहते त्याचबरोबर अनेक प्रकारचे मनोशारीरिक फायदे आपल्याला होत राहतात. त्यातल्या त्यात सायकल चालवणे हे आपल्या शरीराच्या दृष्टीने जास्तीत जास्त आरोग्यदायी मानावे लागेल.

आपली इतर कामे करता करता आपण सायकल चालवू शकतो. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी योगदान देऊ शकतो आणि रस्त्यावरची रहदारी कमी झाल्यामुळे अपघातांचे प्रमाणही कमी ठेवू शकतो.

शाश्वत पद्धतीने पुढच्या पिढ्यांसाठी उत्तम असे पर्यावरण आपण टिकवू शकतो, देऊ शकतो. ही सोपी साधी बाब असली तरी पुढच्या पिढ्यांसाठी अतिशय गरजेची असणारी…. महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment