गोवा राज्य दिन Goa Rajya Din

गोवा राज्य दिन Goa Rajya Din

30 मे 1987 या दिवशी गोवा राज्याला भारतीय संघराज्याचा पूर्ण राज्य दर्जा प्राप्त झाला. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 30 मे या दिवशी गोवा राज्य दिन Goa Rajya Din साजरा केला जातो.

Goa Rajya Din

30 मे 1987 दिवशी गोवा राज्याबरोबर जोडलेला दमन, दिव, दादरा नगर हवेली हा भाग केंद्रशासित केला गेला आणि गोव्याला पूर्ण घटनात्मक राज्याचा दर्जा बहाल केला गेला. म्हणूनच हा दिवस गोव्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.

विश्व पर्यावरण दिवस 2023 थीम, यजमान देश World Environment Day 2023 Theme And Host Country

जवळजवळ 450 वर्षे गोवा राज्य हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. त्यानंतर 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यातून भारतीयांकडे आले. त्यासाठी मोठा निकराचा संघर्ष करावा लागला. 19 डिसेंबर हा दिवस गोवा राज्याचा गोवा मुक्ती दिन Goa Liberation Day म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे याच दिवशी भारत हा युरोपियन राजवटी पासून पूर्णपणे मुक्त झाला.

वास्को-द-गामाच्या पहिल्या भेटीनंतर 1510 पासून गोवा आणि त्याचा बराचसा हिस्सा पोर्तुगीजांच्या हातात गेला. 1510 या वर्षापासून गोवा राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यात आले.

गोवा राज्य विकिपीडियावर अधिक माहिती वाचा.

गोवा राज्य 450 वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात होते म्हणजेच पारतंत्र्यात होते. यादृष्टीने विचार केला तर सर्वात जास्त पारतंत्र्य गोवा राज्याला भोगावे लागले.

हिंदुस्तान 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला तरीही गोवा राज्य भारतीयांचे असूनही परक्याच्या ताब्यात होते. गोवा राज्यावर पोर्तुगीजांचे सुलतानी राज्य होते. पोर्तुगीजांनी गोव्यातून पाय काढण्यास नकार दिला. गोव्याचा दाबा पोर्तुगीज सहजासहजी सोडणार नाहीत हे लक्षात आले.

गोव्यातील आणि गोव्याबाहेरील जनतेने पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र होण्यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सुरू केला. हा संग्राम जोरदार होता यामध्ये अनेक क्रांतिकारकांना अक्षरशः मृत्यूला कवटाळावे लागले जनतेचे प्रचंड हाल झाले.

गोवा स्वतंत्र करण्यासाठी गांधीजींच्या मार्गाने म्हणजेच अहिंसक सत्याग्रह करून गोवा स्वतंत्र करावा असे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मत होते. परंतु हिंदुस्तान स्वतंत्र असताना जनतेचे हाल किती वर्षे करायचे हे समजून घेणे आवश्यक होते.

अहिंसक व क्रांतिकारक मार्गाने लढा चालू असतानाही स्वातंत्र्य देण्यास पोर्तुगीज तयार नाहीत.. हे पाहून शेवटी पंडित नेहरूंनी ऑपरेशन विजय ही मोहीम आखली आणि गोव्यावर म्हणजेच पोर्तुगीजांवर हल्ला चढवण्यात आला. 36 तासांच्या निकराच्या लढाईनंतर गोवा राज्य 19 डिसेंबर 1961 रोजी स्वतंत्र झाले.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment