झाशीची राणी लक्ष्मीबाई भाषणZashichi Rani Laxmibai Bhashan

झाशीची राणी लक्ष्मीबाई भाषण Zashichi Rani Laxmibai Bhashan

वक्तृत्व स्पर्धेसाठी किंवा निबंध स्पर्धेसाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई भाषण Zashichi Rani Laxmibai Bhashan या विषयावर या ठिकाणी भाषण निबंध सादर करीत आहोत.झाशीची राणी लक्ष्मीबाई भाषण Zashichi Rani Laxmibai Bhashan वापर करून आपण भाषण किंवा निबंध लिहू शकता.

Zashichi Rani Laxmibai Bhashan
Zashichi Rani Laxmibai Bhashan

सिंहासन हिल उठे, राजवंशो ने भुकुटी तानी थी।

बूढ़े भारत में आई फिर से नई जवानी थी।

गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी।

दूर फिरंगी को करने की सबने मन मे ठानी थी।

बुंदेले हर बोलो के मुँह हमने सुनी कहा थी।

खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।”

इतिहास प्रसिद्ध झाशीची राणी लक्ष्मीबाई महान स्वातंत्र्यसेनानी होत्या. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रणभूमीवर हसत हसत आपले प्राण हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यासाठी त्यागले. हिंदुस्तानचे स्वातंत्र्य इंग्रजांनी गिळंकृत केले होते. हे स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाईने आपले अनमोल प्राण रणभूमीवर अर्पण केले. अशी ही रणझुंजार…..रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण हिंदुस्तानसाठी एक आदर्श होत्या. तमाम भारतीयांच्या अभिमानाचा विषय होत्या.

राणी लक्ष्मीबाई यांचे खरे नाव मनुबाई किंवा मनिकर्णिका होते. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 ला उत्तर प्रदेशमधील काशी येथे झाला. त्यांचे वडील हे मोरोपंत तांबे पुण्याच्या पेशव्यांच्या सेवेत होते. म्हणजेच छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे ते कर्तव्यनिष्ठ सेवक होते. मनूच्या जन्माच्या 4 वर्षीच मनूच्या आईचे निधन झाले. यानंतर मनुबाई यांनी आपला जास्तीत जास्त वेळ वडिलांसोबत पेशव्यांच्या दरबारात घालवला. राणी लक्ष्मीबाई या लहानपणापासूनच पुरुषांप्रमाणे खेळ खेळत असत. आत्मरक्षण, तलवारबाजी, घोडेस्वारी, निशाणेबाजी, घेराव, कुस्ती इत्यादी खेळ लक्ष्मीबाईंना आवडत होते. त्यांच्या या युद्ध अभ्यासात 1857 च्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले तात्या टोपे यांनी त्यांना महत्त्वाचे सहकार्य केले.

इ.स. 1824 मध्ये मनुबाईचा विवाह झाशीचे राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. विवाहानंतर मनुबाईचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. सरकार गंगाधरराव पारंपारिक विचारांचे पाईक होते.गंगाधररावांना दरबारातील कामकाज राणीने पाहावे हे मंजूर नव्हते. म्हणून लक्ष्मीबाई आपल्या रिकाम्या वेळेत व्यायाम, कसरत, घोड्स्वारी करीत असत. लग्नाच्या 9 वर्षांनंतर गंगाधरराव व लक्ष्मीबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु या पुत्ररत्नाचा तीन महिन्यानंतर त्याचा मृत्यू झाला. राणी लक्ष्मीबाई यांनी गंगाधर राव यांना अतिशय दुःख झाले.पुत्राच्या दुःखात गंगाधरराव आजारी पडले. यानंतर त्यांनी आपल्या भावाच्या मुलाला दत्तक घेतले.असे असले तरी आजारपणामुळे शेवटी 1853 मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi

इंग्रजांनी दत्तक विधान खालसा या नीतीप्रमाणे गंगाधररावांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी झाशीच्या राणीला अनाथ समजून त्यांना झाशीचा किल्ला खाली करून इंग्रजांच्या हाती सोपवण्यास सांगितले. परंतु लक्ष्मीबाई यांनी ठामपणे इंग्रजांना सांगितले की “मेरी झांसी नही दुंगी”. इंग्रजांविरुद्ध लक्ष्मीबाईंनी लंडनमध्ये खटला दाखल केला. परंतु यामध्येही इंग्रजांना विजय प्राप्त झाली. शेवटी राणींना झाशीचा किल्ला सोडून राजवाड्यात राहायला जावे लागले. भारतामध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. भारतीय सैनिकांना इंग्रजांनी वाईट वागणूक दिल्याचे तात्कालीन कारण ठरवून 1857 चे स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले. लवकरच 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात राणी लक्ष्मीबाईने आपला किल्ला पुन्हा हस्तगत केला.

राणी लक्ष्मीबाईने महिलांना प्रशिक्षित करून त्यावेळच्या पारंपारिक आणि रूढीप्रिय समाजाचा विचार न करता महिला सैनिकांची फलटण उभी केली. इंग्रजांविरुद्ध जोरदार लढा स्वाभिमानाने आणि प्राणपणाने लढण्याचा ठाम निश्चय केला. इंग्रजही स्वस्थ बसलेले नव्हते. इंग्रजांना भारतावर संपूर्ण कब्जा मिळवायचा होता. हिंदुस्तान गुलाम करायचा होता. लुटायचा होता.काही काळानंतर 21 मार्च 1858 मध्ये इंग्रज अधिकारी सर ह्यु रोज याने उत्तम प्रतीचे सेनानी आणि कर्तबगार राजकारणी यांच्या मदतीने झाशीवर आक्रमण केले. या युद्धात इंग्रजांच्या उत्तम शस्त्रांनी सज्ज सैन्याने राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्याला पराजित करीत झाशीवर पुन्हा आपले वर्चस्व प्राप्त केले. राणी लक्ष्मीबाई कश्यातरी तात्या टोपे व आपल्या मुलासोबत जवळ पास 24 तासाच्या प्रवासात 102 किलोमीटर अंतर पार करून काल्पी येथे येऊन पोहचल्या. तेथील पेशव्याने परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना आश्रय दिला व आपले सैन्यबळही उपलब्ध करून दिले. यानंतर लक्ष्मीबाई यांनी आपल्या प्रमुख सैनिकांच्या मदतीने ग्वाल्हेरच्या राजाला पराजित करून हे राज्य काल्पीच्या पेशव्याच्या स्वाधीन केले.

१८ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ याने सैन्यासह ग्वाल्हेरवर हल्ला चढवला. या युद्धात लक्ष्मीबाई काल्पीच्या पेशव्यांच्या बाजूने लढल्या. इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर, नराधम इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची शेवटची इच्छा होती. शेवटी त्या सेवकानेच त्यांना मुखाग्नी दिला. इंग्रजांच्या शरण न जाता स्वाभिमानाने वीरमरण स्वीकारणाऱ्या या शूर राणीला माझे कोटी कोटी प्रणाम..!

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment