जागतिक हवामान दिन माहिती World Meteorological Day 2023

जागतिक हवामान दिन माहिती World Meteorological Day 2023

जागतिक हवामान दिन (World Meteorological Day) दरवर्षी 23 मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व असे की याच दिवशी म्हणजे 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामान संघटनेचे निर्मिती झाली होती. त्या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ सन 1961 पासून जागतिक हवामान दिन संपूर्ण जगात साजरा केला जातो.

जागतिक हवामान संघटनेचे सदस्य असलेले देश जागतिक हवामान दिन साजरा करतात. जागतिक हवामान दिन निमित्ताने दरवर्षी एक थीम ठरवली जाते आणि त्यानुसार विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

जागतिक हवामान दिन World Meteorological Day 2023 ची थीम

जागतिक हवामान दिन 2023 ची थीम “जागतिक अन्न प्रणालीला समर्थन देणारी मोजमाप Measurements supporting the global food system” आहे. ही थीम हवामान बदलाची वाढती आव्हाने आणि 2022 च्या अखेरीस 8 अब्ज लोकसंख्या असलेल्या जगात अन्नाचे जागतिक वितरण यावर आधारित निवडली गेली.

जागतिक हवामान दिन World Meteorological Day 2022 ची थीम

सन 2022 यावर्षी “लवकर चेतावणी लवकर कारवाई”Early Warning and Early Action अशा प्रकारची थीम या संघटनेने दिली होती. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्यासाठी जागतिक स्तरावर जनजागृती यानिमित्ताने केली गेली.

जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय व स्थापना

जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंड देशांमध्ये जिनेव्हा या ठिकाणी आहे. जागतिक हवामान संघटनेचे एकूण 191 सभासद देश आहेत. जागतिक हवामान संघटना स्थापन करण्यामध्ये ज्या 31 मोजक्या देशांनी पुढाकार घेतला होता; त्यामध्ये भारत देश सुद्धा आहे. ही आपल्या भारतीयांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट समजली पाहिजे.

जागतिक हवामान संघटनेचे कार्य

जागतिक हवामान संघटना हवामानाची स्थिती जाणून घेऊन त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम यांचा अभ्यास करते.एकंदरीत जीवसृष्टीवर होणारे हे परिणाम अभ्यासले गेल्यामुळे आपल्या भवितव्यासाठी मानवप्राणी अधिकच चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतो. अर्थातच परिणाम स्वरूप विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमधून सुरक्षितपणे बाहेर येऊ शकतो किंवा सुटका करू शकतो.

ही संस्था प्रामुख्याने पूर, दुष्काळ, भूकंप, वादळे यांचा अंदाज घेण्यासाठी काम करते. “वर्ल्ड वेदर वॉच” ही पृथ्वीवरील हवामानावर लक्ष ठेवणारी प्रणाली आजही आपले काम अतिशय चांगल्या प्रकारे करत आहे.

जागतिक हवामान दिनाचे World Meteorological Day महत्त्व

या संस्थेमार्फत संपूर्ण जगभरात जिथे जिथे आपत्ती येण्याचा धोका आहे; त्या ठिकाणी अगोदरच आपले अंदाज वर्तवून धोक्याचा संदेश दिला जातो. या कार्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी यापासून बचाव केला जातो.जागतिक हवामान दिन हा दिवस आपल्या पृथ्वीला भेडसावणाऱ्या हवामान बदल, जंगलतोड,भूकंप, अतिप्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी अनेक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक प्रकारची जागृती वाढवी यासाठी साजरा केला जाणारा महत्त्वाचा विशेष दिन आहे.

World Meteorological Day

जगाचे हवामान दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. फार मोठ्या प्रमाणात कारखानदारी निर्माण झाली. त्यामुळे वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड आणि इतर विषारी वायूंचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या हवामानामुळे संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात आली आहे. काही ठिकाणी प्रचंड पाऊस तर काही ठिकाणी प्रचंड दुष्काळ अशी विषम परिस्थिती निर्माण होत आहे. उष्णतेच्या लाटा माणसासह सर्व मानवासह सर्व प्राणीमात्रांना हैराण करून सोडत आहे.

महात्मा फुले स्मृतीदिन Mahatma Phule Smritidin

सारांश

थोडक्यात काय तर मानवाने जागतिक हवामान दिनानिमित्त आपल्या भविष्यासाठी उत्तम हवामान राहावे म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे; हे या निमित्ताने प्रत्येक जबाबदार नागरिकांनी ध्यानात घेतले पाहिजे.

FAQS काही महत्त्वाचे प्रश्न

🌏 जागतिक हवामान दिन केव्हा साजरा केला जातो?

जागतिक हवामान दिन दर वर्षी 23 मार्च रोजी साजरा केला जातो.

🌏जागतिक हवामान संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सन 1950 मध्ये 23 मार्च रोजी 31 देशांनी पुढाकार घेऊन जागतिक हवामान संघटनेची स्थापना केली.

🌏जागतिक हवामान दिन कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो? जागतिक हवामान दिन सन 1961 पासून आपल्या स्थापना दिनाच्या स्मृती प्रित्यर्थ साजरा केला जात आहे.

🌏जागतिक हवामान दिनाची सन 2023 ची थीम काय आहे? जागतिक हवामान दिन 2023 ची थीम “जागतिक अन्न प्रणालीला समर्थन देणारी मोजमाप Measurements supporting the global food system” आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment