World Food Safety Day 2023 जागतिक अन्नसुरक्षा दिन

World Food Safety Day 2023 जागतिक अन्नसुरक्षा दिन

World Food Safety Day 2023 जागतिक अन्न सुरक्षा दिन सात जून रोजी जगभरात साजरा केला जातो. लोकांना दूषित आहाराबद्दल जागरूक करणे हा महत्त्वाचा उद्देश जागतिक अन्नसुरक्षा दिन साजरा करण्यामागे आहे. दरवर्षी जगभरामध्ये लाखो लोक केवळ दूषित अन्न खाल्ल्यामुळे मरण पावतात त्यामुळे अन्नाची सुरक्षितता जाणून घेणे अतिशय जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

International Yoga Day 2023:Why Yoga Day Is Celebrated आंतरराष्ट्रीय योग दिवस का साजरा केला जातो?

जागतिक अन्नसुरक्षा दिन कधी आहे? World Food Safety Day 2023

पाचवा जागतिक अन्न सुरक्षा दिवस (WFSD) 7 जून 2023 रोजी अन्न सुरक्षा, मानवी आरोग्य, आर्थिक समृद्धी, कृषी उत्पादन, बाजारपेठेतील प्रवेश, पर्यटन यामध्ये योगदान देणारे अन्नजन्य धोके रोखण्यासाठी, शोधण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी कृती करण्यासाठी आणि कृती करण्यास प्रेरणा देण्यासाठी 7 जून 2023 रोजी साजरा केला जाईल. शाश्वत विकास साधताना अन्नसुरक्षेचे महत्त्व जागतिक स्तरावर स्पष्ट व्हावे.

A guide to World Food Safety Day 2023: food standards save lives

जागतिक अन्न सुरक्षा दिनाची सुरुवात कधी झाली?

सात जून 2019 रोजी जगातील पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. डिसेंबर 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्याचे घोषित केले. संयुक्त राष्ट्र महासभेच्या अन्न आणि कृषी संघटना व जागतिक आरोग्य संघटना कार्यरत आहेत. या दोन्ही संघटनांना एकत्र घेऊन संयुक्त राष्ट्र महासभेने अन्नसुरक्षा बाबत काही मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत त्यानुसार जागतिक अन्नसुरक्षा दिन सात जून 2019 पासून दरवर्षी साजरा केला जातो.

प्रत्येक व्यक्तीला पुरेशा प्रमाणात पौष्टिक आणि सुरक्षित अन्न मिळावे हा महत्त्वाचा उद्देश जागतिक अन्नसुरक्षा दिनाचा निमित्ताने निश्चित केला आहे. दूषित अण्णा खाल्ल्यामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. ही एक गांभीर्याने घेण्याची बाब आहे दूषित अन्न खाल्ल्यामुळे जी अन्नातून विषबाधा होते. ती अतिशय घातक असून अनेक आजारांना आमंत्रण देणारी आहे. इतकेच नाही तर मृत्यूलाही कारणीभूत होणारी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेनुसार जगातील दहा पैकी एक व्यक्ती दूषित अन्न खाते आणि गंभीर आजारांना बळी पडते. दूषित अन्नामध्ये अनेक प्रकारचे भयंकर जिवाणू आणि विषाणू असतात त्याचप्रमाणे ते अन्न कमी पौष्टिक असते.

World Food safety Day 2023 Theme

Food Standards Save Lives. जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम आहे .अन्न मानके जीव वाचवतात.7 जून 2023 रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन अन्न मानकांकडे लक्ष वेधून घेईल. अन्नजन्य रोग दरवर्षी जगभरातील 10 पैकी 1 व्यक्तीवर परिणाम करतात आणि आपण जे खातो ते सुरक्षित आहे हे सुनिश्चित करण्यात अन्न मानके मदत करतात.

अन्नसुरक्षा महत्त्वाची का आहे?

जागतिक आरोग्य संघटनेने पुढे दिलेल्या आकडेवारीवरून अन्नसुरक्षा महत्त्वाची काय आहे हे आपल्या लक्षात येईल.

16,000,00 सरासरी एका दिवसात असुरक्षित अन्नामुळे लोक आजारी पडतात.
३४० एवढी ५ वर्षांखालील मुले सरासरी दररोज, प्रतिबंध करण्यायोग्य अन्नजन्य रोगांमुळे मरतात.
२००असुरक्षित अन्नामुळे होणारे रोग, अतिसारापासून कर्करोगापर्यंत अनेक रोग होतात.

जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यामागे असलेला उद्देश लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने आपण जे अन्न खातो ते सुरक्षित आहे का? त्याचप्रमाणे पौष्टिक आणि आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे का? हे जाणून घेऊनच घेतले पाहिजे. अन्नाबाबत सुरक्षितता असणे हे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे अन्नसुरक्षित ठेवणे आणि सुरक्षित अन्न आपल्या आरोग्यासाठी खाणे हितकारक आहे.World Food Safety Day 2023

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment