गुगल बार्ड देणार चॅट जीपीटीला टक्कर Will Google Bard Face ChatGPT?

गुगल बार्ड देणार चॅट जीपीटीला टक्कर? Will Google Bard Face ChatGPT?

गुगल बार्ड देणार चॅट जीपीटीला टक्कर? Will Google Bard Face ChatGPT? हा प्रश्न आता तंत्रज्ञान प्रेमी आणि तंत्रस्नेही युजर्सला पडला आहे.आज टेक्नोसेवी जगामध्ये सर्व युजर्स AI चा वापर करत आहेत. E.content चा विविधांगी वापर लक्षात घेता गुगलने आणलेले गुगल बार्ड हे चॅट जीपीटी या ओपन AI च्या सोर्सशी टक्कर कशी देणार? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. अर्थात गुगल आपले कोणतेही काम अगदी सफाईदारपणे करतो आणि ते यूजर फ्रेंडली असते. हा गुगलचा इतिहास पाहता नक्कीच गुगलचे हे सर्वांग सुंदर फीचर असणार.

Will Google Bard Face ChatGPT?

Open AI चॅट जीपीटी ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणारी सिस्टीम जगात जोरदार धुमाकूळ घालत असतानाच गुगलने Google Bard मध्ये एक नवीन पिक्चर आणले आहे. त्यामुळे गुगल आता ओपन एआयच्या चॅट जीपीटीला जोरदार टक्कर देणार हे निश्चित झाले आहे. AI हा आत्ताच्या संगणकीय जगातील परवलीचा शब्द बनला आहे. काय आहे हे गुगल बार्ड नवीन वैशिष्ट्य?… जाणून घेऊया या लेखात.

जगाचा प्रवास ए आय च्या दिशेने सुरू, स्पर्धा प्रचंड जोरात सुरू

आत्ताच्या घडीला जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम सगळीकडे नवे नवे फीचर्स देऊन संगणक वापरकर्त्याला अधिकाधिक तांत्रिक सोयी देत आहेत.आपण विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर काही सेकंदाच्या आत उपलब्ध करून देणाऱ्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ChatBot सिस्टीमने जगाची तंत्रज्ञानाची दिशाच अगदी 360 कोनामध्ये फिरवून टाकली आहे.

Google Bard

Google Bard देणार Open AIच्या ChatGPTला जोरदार टक्कर

Open AI सिस्टीमने चॅट जीपीटी हा एक ओपन माहितीचा सोर्स निर्माण करून वापरकर्त्याच्या हाती खूप सुंदर आणि अतिशय उपयोगी तांत्रिक वैशिष्ट्य असणारे असणारे फीचर दिले. संपूर्ण जगभरात चाललेल्या तांत्रिक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असणाऱ्या गुगलच्या नजरेतून ही गोष्ट चुकेल असे होणार तरी कसे? परिणामी गुगलनेही कोणालाही सुगावा लागून देता गुगल बार्ड ही सिस्टीम पुढे आणली आणि Open AI ला आता जोरदार टक्कर मिळणार हे स्पष्ट झाले.

चॅट जीपीटीचे फायदे व तोटे Advantages and Disadvantages Of ChatGPT

गुगल बार्ड काय आहे? What is Google Bard?

गुगलच्या LLM, PaLM2 द्वारे BARD ने 40 हून अधिक भाषांचा समावेश असणारे फीचर आणले आहे. यामध्ये 20+ पेक्षा जास्त प्रोग्रामिंग लँग्वेज समाविष्ट आहेत. गुगल बार्ड हे एक चॅटबोट आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम Chatbot AI System आहे. हे गुगलच्या LaMDA फॅमिलीमधील Large Language वर आधारित आहे.180+ देशांमध्ये गुगल बार्ड सिस्टीम सुरू होणार आहे.

केवळ वापरकर्त्याच्या प्रश्नांना उत्तरे देणे एवढेच नाही तर कोडिंग Coding,Debugging,Advanced Maths, Reasoning skills,Data Feed images making यासारख्या गोष्टी क्षणार्धात उपलब्ध करून देणारे हे वैशिष्ट्य अगदी जबरदस्तच म्हणावे लागेल. या फिचरची तपासणी सध्या सुरू आहे.

गुगल बार्ड आणि चॅट जीपीटी मध्ये काय फरक आहे? What is difference between Google BARD and ChatGPT?

गुगल बार्ड आणि चॅट जीपीटी या दोघांमधील समानता म्हणजे दोन्हीही मानवाप्रमाणे वार्तालाप करून परंतु टेक्स्ट स्वरूपामध्ये उपलब्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या सिस्टीम आहेत. दोन्ही सिस्टीम वापरकर्त्याशी चॅटिंगच्या स्वरूपामध्ये वार्तालाप करत असतात. त्यामध्ये जी पी टी ही तिन्ही अक्षरे महत्त्वपूर्ण आहेत.

Bard म्हणजे स्टोरी टेलर. कोणत्याही विषयावर विचारलेल्या प्रश्नांची भाताप्रमाणे उत्तरे हा बार्ड देऊ शकतो.उत्तरे देण्यासाठी जगभरातील इंटरनेटवर असणारी सामग्री अर्थात E. Content चा वापर अतिशय प्रभावीपणे आपल्या कोडिंग लँग्वेजच्या आधारे करून तो userला देऊ शकतो.

ChatGPT 2023 मधील डाटा जुना आहे. मात्र google Bard मध्ये कायम नवनवीन डाटा दिला जाणार असल्यामुळे Google Bard अधिक प्रभावी ठरेल. वापरकर्त्यांसाठी त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो.

GPT म्हणजे नक्की काय?

ChatGPT मानवाप्रमाणे वार्तालाप करणारे ChatBot सिस्टम आहे.या तिन्ही अक्षरांचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.

G:- Generative म्हणजे निर्माणकर्ता. Audio, Code,Image text निर्माण करणे.

P:- Pre-Trainned. पूर्व प्रशिक्षित. कोणत्याही प्रकारची AI सिस्टीम शिकण्यासाठी प्रशिक्षित केलेली गुणवैशिष्ट्य असणारे फीचर.

T:- Transformer ट्रान्सफॉर्मर हे एक प्रकारचे लैंग्वेज मॉडेल आहे.

Some FAQs

1)Google Bard काय आहे?

Google Bard हे चॅटबोट सारखे कन्वर्सेशनल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे.

2)Google Bard कशावर आधारित आहे?

Google Bard हे LaMDA Family of Large Language वर आधारित आहे.

3)Google Bard फ्री आहे का?

होय. फ्री आहे.

4) Google Bard हे ChatGPT सारखे आहे का?

Google Bard हे ChatGPT सारखेच आहे.

5)Google Bard किती देशात चालणार आहे?

Google Bard 180+ देशात चालणार आहे.

Share on:

मी श्री.तुकाराम गायकर. मी व्यवसायाने प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment