स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन Swatantryaveer Savarkar Gaurav Din in Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन Swatantryaveer Savarkar Gaurav Din in Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन का साजरा करण्यात येणार आहे?

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस २६ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन Swatantryaveer Savarkar Gaurav Din म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे.माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला. उद्योग मंत्री माननीय मंत्री उदय सामंत यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी,त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव होण्यासाठी हा विशेष दिन साजरा होणार आहे.

Swatantryaveer Savarkar Gaurav Din

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार जनमानसात अजूनही पाहिजे तितक्या पद्धतीने रुजलेले नाहीत. ही एक खंत प्रत्येक हिंदुत्व प्रेमी माणसाला जाणवल्याशिवाय राहत नाही. सावरकरांचा जन्मदिन हा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन Swatantryaveer Savarkar Gaurav Din म्हणून साजरा करण्यात येणार ही अतिशय स्वागतार्ह आणि आनंदाची आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्यकर्तृत्व सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजे. ही आजच्या काळाची एक नितांत गरज आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर एकदा म्हणाले होते की,” माझी मार्सलिसची उडी तुम्ही विसरलात तरी चालेल पण मी दिलेली हिंदुत्वाची विचारसरणी कधीही विसरू नका.”संपूर्ण महाराष्ट्रातील जनता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रेम करीत आलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्व प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला अतिशय उद्बोधक आणि प्रेरणादायी ठरत आले आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भरतखंडामध्ये मान्यता पावलेले हे आदर्श क्रांतिकारी बुद्धीप्रामाण्यवादी, विज्ञानवादी, हिंदुत्ववादी पुरोगामी विचारसरणीचे अतिशय जाज्वल्य निदर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. सावरकरांची बदनामी आजच्या काळात अनेक लोक करताना दिसून येतात. परंतु त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर एका अक्षरानेही समजले नाहीत असे खेदाने म्हणावे लागते.

स्वातंत्र्यवीर सावरकर विकिपीडिया अधिक माहितीसाठी क्लिक करा.

भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवरायांसारखा भारतमातेला स्वातंत्र्याचा राज्याभिषेक करेल किंवा मारिता मारिता मरेन असा निश्चय केला होता. घरातील भगवती देवीसमोर तशी त्यांनी आपल्या बालपणीच प्रतिज्ञा केली होती आणि त्यानंतर आपले संपूर्ण जीवन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारत मातेच्या चरणी वाहिले. दोन जन्मठेपेची शिक्षा होऊनही स्वातंत्र्यवीर सावरकर कधीही डगमगले नाहीत की आपल्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीला त्यांनी मुरड घातली नाही. अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आज नको त्या वाईट प्रचाराला बळी पडावे लागते ही एक अतिशय दुर्दैवी बाब आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी असामान्य धैर्य दाखवून भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी पद्धतीने लढा दिला. 1857 चे स्वातंत्र्यसमर, काळे पाणी, जोसेफ मॅझिनी यासारखे महान ग्रंथ लिहून त्यांनी भारतीय क्रांतिकार्याला फार मोठी चालना दिली होती. आपल्या तेजस्वी आणि ओजस्वी वक्तृत्वाने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तत्कालीन भारतीय समाजाला भारावून टाकले होते. कमला, गोमांतक यासारखे महाकाव्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अद्भुत अशा प्रतिभेतून स्फुरली होती. मराठी भाषा ही इंग्रजीपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि आपण इंग्रजी शब्द किंवा परभाषी शब्द विनाकारण न वापरता आपल्या भाषेतच आपल्या उत्पत्तीकोशात नवीन शब्दांची भर टाकून आपण स्वभाषा या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे. याचे स्वातंत्र्यवीर सावरकरांना महत्त्व पटले होते आणि त्यांनी मराठी भाषा शुद्धी चळवळ राबवली होती.

“स्वतंत्र भारत हा अखंड भारत असला पाहिजे”या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी सर्वांनाच भारावून टाकले होते. परंतु अतिशय दुर्दैवी पद्धतीने भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. अखंड भारत हे स्वातंत्र्याचे स्वप्न स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पाहिले होते. केवळ अखंड भारतच नव्हे तर बलशाली भारत, समृद्ध आणि सामर्थ्यशाली भारत असण्याचे स्वप्नही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पाहिले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अतिशय पुरोगामी विचाराचे समाज सुधारक देखील होते. त्यांनी रत्नागिरीला असताना पतीत पावन मंदिर सुरू करून हिंदू धर्माच्या प्रगतिशील सुधारणेला चालना दिली. हिंदू धर्मातील सात बेड्या किंवा शृंखला तोडून हिंदू धर्माने आपले आधुनिक रूप सिद्ध केले पाहिजे असे स्वातंत्र्यवीर सावरकर वाटत होते. त्या दृष्टीने त्यांनी लिहिलेला जात्युच्छेदक निबंध हा ग्रंथ अभ्यासण्यासारखा आहे.

हिंदुत्व ही विचारसरणी स्वातंत्र्यवीर सावरकरांची देणगी आहे. स्वतंत्र वीर सावरकरांनी हिंदूपदपादशाही आणि हिंदुत्व असे दोन ग्रंथ लिहिले. काश्मीरच्या नंदनवनापासून तर केरळच्या चंदनवनापर्यंत हिंदुस्तान हिंदूंचा आहे आणि भारत राष्ट्र हे हिंदू राष्ट्र व्हावे अशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची मनोमन इच्छा होती. त्या दृष्टीने त्यांनी आपल्या ओजस्वी आणि तेजस्वी वाणीने खूप प्रचार आणि प्रसार केला. त्याचप्रमाणे हिंदूंची एकजूट होऊन भारतराष्ट्र हे हिंदूराष्ट्र व्हावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू महासभा नावाचा एक पक्ष ही सुरू केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञानवादी विचारांचे पुरस्कर्ते होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ग्रंथप्रामाण्यवाद मंजूर नव्हता. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बुद्धी प्रामाण्यवादी व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जो बुद्धीप्रमाण्यवाद सांगितला किंवा विज्ञानवाद सांगितला त्याची भारत देशाला 21व्या शतकात तितकीच मोठी गरज आहे. या दृष्टीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समग्र वांङ्मय अभ्यासण्यासारखे आहे.

आजी आजोबा दिवस सेलिब्रेशन कसे करावे Grandparents Celebration In School

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अतिशय दूरदृष्टी असलेले विचारवंत होते. हिंदूंना हिंदुस्थान सोडला तर दुसरा जगात कोणताही देश नाही. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जाणले होते त्यामुळे हिंदूंची एकजूट हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिशय आवश्यकता असलेली बाब वाटत होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि त्यांचे कार्यकर्तृत्व जनसामान्यांपर्यंत पुन्हा पोहोचणे; ही आजच्या काळाची नेतांत गरज आहे. या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने घेतलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मदिनी “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन” Swatantryaveer Savarkar Gaurav Din साजरा करणे ही घोषणा किंवा निर्णय अतिशय स्तुत्य आहे.

हेही वाचा.

विश्व पर्यावरण दिवस 2023 थीम, यजमान देश World Environment Day 2023 Theme And Host Country

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment