स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी निबंध Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari या विषयावर या ठिकाणी निबंध सादर करत आहोत.स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari या निबंधाचा उपयोग करून आपण निबंध लिहू शकता किंवा आहे तसा निबंध लेखनासाठी वापरू शकता.

जगातील प्रत्येक माणसाच्या मनाचा एक अतिशय संवेदनशील आणि हळवा कोपरा आई या नात्याने व्यापलेला आहे. अनेक कवी, लेखकांनी या नात्याला सुंदर शब्दरूप दिले आहे. मराठी भाषेतील एक प्रतिभावंत कवी यशवंत म्हणतात,

आई’ म्हणोनी कोणी, आईस हाक मारी

ती हाक येई कानी, मज होय शोककारी

नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी

आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारीही

न्यूनता सुखाची, चित्ती सदा विदारी

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी…

आईचे नाते इतके मोठे आहे की जगातील सर्व संपत्ती मिळाली आणि आपण जगाचे सम्राट बनलो आणि जर आपल्याला आईच नसेल तर आपण एखाद्या भिकाऱ्यासारखे निष्कांचन आहोत.

श्यामची आई हे पुस्तक वाचताना आपले डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. कारण साने गुरुजींनी अर्थात श्यामने आपल्या आईची महती या पुस्तकांमध्ये इतक्या सुंदर आणि उत्कट शब्दात सांगितली आहे की मातृप्रेमाचे हे एक महन्मंगल स्तोत्रच आहे की काय असा भास होतो. आचार्य अत्रे यांनी श्यामची आई हा चित्रपट निर्माण केला तेव्हा कवी यशवंत यांच्या आई कुणा म्हणू मी या कवितेचा त्यामध्ये समावेश केला आहे. थोर गायिका आशा भोसले यांनी हे गीत त्या चित्रपटासाठी गायिले आहे.

श्यामची आई देवा घरी जाते तेव्हा आमच्या मनाची ही दुःखद भावावस्था निर्माण झाली; त्याचे वर्णन या गीतांमधून ऐकताना आपल्या डोळ्यांतून अश्रू ओघळल्याशिवाय राहत नाहीत.

स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा Essay on Sant Gadgebaba

आई काय असते? प्रत्येक मुलासाठी ती संपूर्ण विश्व असते. ते आईचे विश्व हे मुलासाठी निर्माण होते आणि मुल या विश्वामध्ये अतिशय स्वाभाविकपणे खेळत बागडत असते. कोणीतरी आई ह्या शब्दाचा अर्थ सांगताना असे म्हटले आहे की आ म्हणजे आपला आत्मा तर ई म्हणजे ईश्वर इतका साधा सोपा अर्थ आणि उत्कृष्ट तत्वज्ञान म्हणजे आपली आई होय.

आईची महती वर्णन करताना कोणीतरी एकजण म्हणाला की आईची महती वर्णन करणे जगात कोणालाही शक्य झाले नाही. कारण समुद्राची शाई केली, हिमालयाची लेखणी केली आणि आकाशाचा कागद केला तरी आईची महती वर्णन होणे केवळ अशक्य आहे.

आई ही आपल्या मुलाची प्रत्येक भावना, प्रत्येक कृती, प्रत्येक विचार जाणत असते. लहानपणी आईचं बोट धरून आपण घेऊन चालायला सुरुवात करतो तेव्हा आणि वय झाल्यानंतर सुद्धा आपल्याला कोणत्याही लाभाशिवाय प्रेम करणारी आणि आशीर्वाद देणारी आईच असते.

जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धारी असे एका कवीने म्हटले आहे. इतिहासाकडे जर नजर टाकली तर या ओळींचा आपल्याला प्रत्यय येतो. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकार केले.त्यामागची प्रेरणा होत्या जिजामाता. जगज्जेता सिकंदर भारतातून परतल्यानंतर प्रथम आपल्या आईचे दर्शन घ्यायचे होते. महात्मा गांधी, संत विनोबा भावे, यशवंतराव चव्हाण या सारख्या थोर व्यक्तींनी सुद्धा आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईला दिले आहे.स्वराज्याची राजधानी रायगडावर गेल्यानंतर हिरकणी बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या बाळासाठी एक बेलाग कडा उतरून जाणारी हिरकणी या मातेची कथा ऐकताना मां तुझे सलाम असंच म्हणावसं वाटेल.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या आईचं तन मन मुलांसाठी काही ना काही करण्यामध्ये सतत गुंतलेले असते. घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे कोणा एका संताने म्हटले आहे हे खरेच आहे. मात्र त्याची जाणीव त्या मुलाला नसते. पण आई मात्र चार दिवस गावाला गेली की तिचं नसणं आपल्या सर्वांना जाणवल्याशिवाय राहत नाही.

आईचं अस्तित्व आपण गृहीत धरलेलं असतं पण तिचं नसणं हे अतिशय पोरकं करणार असतं. त्यामुळे आई म्हणून जर कोणी हाक मारली तरी ती आपल्या कानाला अतिशय शोकदायक असते. इतके आपण पोरके आणि कफल्लक होतो Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari की आपल्याला जाणवते की आपल्या जवळ सर्व काही असून सुद्धा आपण एखाद्या भिकाऱ्यासारखे आहोत. आपण तिन्ही जगांचे स्वामी झालो,राजे झालो तरी आई नसल्याने येणारं पोरकेपण त्या व्यक्तीला भिकारी असल्याची स्वभाव एक जाणीव करून देते. कितीही आर्ततेने आळवणी केली तरी आईची माया मिळाली नाही तर एक शोककारी पोकळी निर्माण होते.

आईसाठी मराठी भाषेमध्ये आणि शब्द आहेत जननी, जन्मदात्री, माया, माता इ. मात्र आई या शब्दाची तुलना इतर शब्दांबरोबर होणे केवळ अशक्य आहे इतकी या शब्दांमध्ये रहस्य दडलेले आहे. आज इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे इंग्रजी मम्मी हा शब्द प्रचलित होत आहे. मात्र मातृभाषा मराठी असल्यावर आई या शब्दाला पर्यायी इंग्रजी असलेला मम्मी हा शब्द अतिशय अपुरा वाटतो. कारण मातृभाषा म्हणजे आईची भाषा होय आणि जर आईच्या भाषेमध्ये आईला हाक मारली नाही तर त्या हाकेला पूर्णत्व येत नाही. काहीतरी कमी वाटते. त्यामुळे आई हा शब्दच आईसाठी योग्य आहे.

आईचं प्रेम म्हणजेच माया… आईचं प्रेम म्हणजेच ममता… आईचं प्रेम म्हणजेच वात्सल्य…आईच्या प्रेमाला उपमा नाही. परमेश्वराच्या प्रेमापेक्षा आईचे प्रेम हे श्रेष्ठ आहे. कारण भगवान श्रीराम असो की भगवान श्रीकृष्ण असो की येशू ख्रिस्त असो भगवान बुद्ध …..तेसुद्धा आईच्या प्रेमाला फार मोठे स्थान देतात. इतके की अनंत ब्रम्हांडाचा स्वामी सुद्धा या प्रेमाला भुकेला असतो आणि त्याच्याजवळ जर हे प्रेम नसेल तर तो कफल्लक भिकाऱ्यासारखा अनुभव करतो.

जगातील कोणत्याही नात्यातील प्रेमापेक्षा आई आणि तिच्या मुलांमधील असलेले प्रेम हेच सर्वोच्च स्तरावरील आहे.म्हणूनच म्हणतात की प्रेमाला उपमा नाही. अर्थात आईच्या प्रेमाला मला उपमा नाही. ते अनुपमेय आहे

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari हा निबंध आपण वाचला आहे. आपल्याला निश्चितच आवडला असेल. आपण खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि असेच निबंध लिहिण्यासाठी मला प्रेरणा देऊ शकता

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

2 thoughts on “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी निबंध Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari”

Leave a Comment