सुविचार संग्रह suvichar Sangrah in Marathi

सुविचार suvichar Sangrah

सुविचार suvichar Sangrah

श्रम न करता जगणे हा जीवनातील सर्वात मोठा गुन्हा आहे.

संगीत हे दुःखावरील उत्तम औषध आहे.

परिश्रमाने जीवनाचे नंदनवन बनते.

आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.

नाव ठेवणे सोपे असते, परंतु नाव कमावणे फार कठीण असते.

जीवांच्या सेवे परता कोणत्याही धर्म मोठा नाही.

हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे, परंतु एक दोष दूर करणे कठीण.

निस्वार्थीपणा हीच धर्माची खरी कसोटी होय.

दुसऱ्याचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच दया.

बल बल हे जीवन दुर्बलता म्हणजे मृत्यू

वाचनासाठी वेळ द्या, कारण तो ज्ञानाचा पाया आहे.

सदगुणांद्वारे सुखप्राप्ती करणे हे खरे ध्येय असावे.

परिस्थितीच्या आधीन होण्यापेक्षा त्यावर मात करावी

महान व्यक्तीचे मुख्य लक्षण म्हणजे त्याच्या अंगी असलेली नम्रता व शील होय.

वात्सल्य आणि क्षमाशीलता या दोन गुणांचा मूर्त अविष्कार म्हणजे आई.

उच्चारावरून विद्वत्ता आवाजावरून नम्रता व वर्तुणकीवरून शील समजते.

मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरुपी पाण्याचे सिंचन लागते.

जीवांची सेवा हीच ईश्वराची सेवा

न्यायाने वागणाऱ्याचे वैभव कमी होत नाही; ते पिढ्यानपिढ्या टिकून राहते व वाढत जाते.

आदान प्रदान हाच संस्कृतीचा व निसर्गाचा नियम आहे.

कोण खरे आहे ही गोष्ट महत्त्वाची नाही तर काय खरे आहे हे महत्त्वाचे आहे

ढोंगी माणसापेक्षा स्पष्टवादी नास्तिक बरा. – स्वामी विवेकानंद

आपल्या नियतीचे मालक बना, परिस्थितीचे गुलाम बनू नका.

बदल हा निसर्गाचा नियम आहे.

जो बदलाला यशस्वीपणे सामोर जातो तोच यशस्वी होत असतो.

प्रत्येक मनुष्याला आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण विकास करता आला पाहिजे.

जे पेराल ते उगवेल जे रुजवाल ते रुजेल तसे जे शिकवाल ते शिकेल.

आंधळेपणाने श्रद्धा ठेवल्यामुळे माणसाचा अधःपात होतो.

जीवन हा हास्य आणि अश्रूंचा सुंदर मिलाफ आहे.

विकास म्हणजे जीवन संकोच हाच मृत्यू

जीवनाच्या खडतर प्रवासात संस्कारांची शिदोरी नेहमीच उपयोगी पडते.

स्वतःच स्वतःचे भविष्य ठरवा.

कोणताही महान माणूस आपल्याला संधी मिळाली नाही म्हणून तक्रार करीत नाही.

परिश्रम म्हणजे जीवनाच्या साफल्याचे रहस्य होय.

कोणत्याही कर्तव्याला कमी लेखणे योग्य नव्हे.

आपण चिंतनशील आणि विवेकी व्हायला पाहिजे.

स्वतंत्र व्हा स्वतंत्र बुद्धीने निर्णय घेण्यास शिका

श्रमाच्या वेलीला यशाची सुंदर फुले येतात.

भित्रे लोक कधीच विजय होत नाहीत.

प्रत्यक्ष कार्य सुरू केले म्हणजे मदत मिळतेच असे ज्यांना वाटते त्यांच्याच हातून कार्य होत असते.

अन्याय करू नका. अत्याचार करू नका. करवतील तेवढे उपकार करा.

नवनव्या मौलिक कल्पना शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे.

मनुष्याची सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे त्याचे उत्तम चारित्र्य.

शरीर आणि मन या दोघांचा विकास बरोबरच व्हावयास हवा.

आपली दुर्बलता हाच आपल्या जीवनातील अत्यंत वाईट दोष आहे.

सुखाला सोबत लागते पण दुःखाला एकटेपणानेच जगावे लागते.

दृष्ट लोकांबरोबर मैत्री न ठेवलेली बरी.

सामर्थ्य हा मनुष्याचा सर्वश्रेष्ठ गुण आहे

जीवन म्हणजे फुलांची सुखद शयन असून एक समरभूमी आहे.

खरा वीर पुरुष गाजावाजा न करता शांतपणे कार्य करीत राहतो

माणूस व्हा. उठा आणि सारा दोष स्वतःवर घ्या. आधी स्वतःमध्ये सुधारणा करा.- स्वामी विवेकानंद

मत्सर व कपटी वृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन चांगले काम करा

कृतज्ञता हे उत्तम संस्कारांचे फळ आहे

उत्साहाचा अतिरेक नको सर्व बाबतीत संयम असावा.

प्रेम हे साध्य आहे त्याला वेगळ्या विषयाची अपेक्षा नाही.

जे ज्ञानाचा उपयोग आचरणात करता तेच लोक खरे बुद्धिमान असतात.

एकावेळी एकच गोष्ट करा आणि ती करत असताना आपले सर्वस्व त्यात ओता.

चुक न करण्यात गौरव नाही तर झालेली चूक सुधारणे यातच गौरव आहे.

गती आणि वाढ हेच जीवनाचे एकमेव चिन्ह आहे. म्हणून विस्तारासाठी सदैव प्रयत्न करीत राहा.– स्वामी विवेकानंद

संगीत हे दुखावरील उत्तम औषध आहे.

जगात भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले जाते परंतु कर्तव्य पाठीमागे भावनेचे शुद्धता असावी.

प्रेम सर्वांवर करा विश्वास थोड्यावर ठेवा आपण द्वेष मात्र कोणाचाच करू नका.

धर्माचे रहस्य प्रत्यक्ष आचरणात आहे .

खरा मित्र तोच जो तोंडावर कटू बोलतो; परंतु पाठीमागे आपली स्तुती करतो.

प्रेमाने जग जिंकता येते

विश्वास हा असा पक्षी आहे जो एकदा उडाला की पुन्हा बसणे कठीण असते.

माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे यालाच माणुसकी म्हणतात आणि हाच खरा धर्म आहे.

प्रत्येक व्यक्तीचे सुख हे सर्व समाजाच्या सुखावर अवलंबून असते.

आज आपल्याला पोकळ भाषणापेक्षा प्रामाणिक कार्याची अधिक गरज आहे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी संधीची वाट पहा पण ती आल्यावर हातातून सुटू देऊ नका

International Day for Biological Diversity 22 May जैवविविधता दिन 22 मे

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment