लोकमान्य टिळक छोटी भाषणे Speeches on lokmanya tilak

लोकमान्य टिळक छोटी भाषणे speeches on Lokmanya Tilak 

भाषण क्रमांक – १

सन्माननीय व्यासपीठ , अध्यक्ष महोदय, गुरुजनवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो !

आज लोकमान्य टिळकांची जयंती आहे. लोकमान्य टिळकांबद्दल मी आपणास चार शब्द सांगत आहे. आपण शांतचित्ताने ऐकावेत अशी विनंती करतो.
लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या ठिकाणी 23 ऑगस्ट 1856 रोजी झाला. लोकमान्य टिळक अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते.त्यांचे बालपणीचे नाव केशव असे होते. परंतु लहानपणी त्यांना सगळेच बाळ म्हणून हाका मारीत. त्यामुळे त्यांचे नाव बाळ पडले. लोकमान्य टिळकांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. सुरुवातीचे शिक्षण आपल्या गावी घेतल्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुढील शिक्षण पुण्यामध्ये घेतले. लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मध्ये उडी घेतली . त्यांनी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली.शिवजयंती व गणेशोत्सव हे उत्सव सुरू केले.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये फार मोठे कार्य केले. अनेक वेळा त्यांना तुरुंगात जावे लागले. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. अशा या लोकमान्य टिळकांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला.  लोकमान्य टिळक यांना अभिवादन करून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद!

जय महाराष्ट्र !!

भाषण क्रमांक – 2

 

आदरणीय अध्यक्ष महोदय, गुरुजनवर्ग, सन्माननीय ग्रामस्थ आणि माझ्या बाल मित्र बंधू-भगिनींनो !
आज आपण येथे लोकमान्य टिळकांचे जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत. लोकमान्य टिळकांचे बालपणीचे नाव केशव असे होते. लोक त्यांना लाडाने बाळ म्हणत आणि हेच बाळ पुढे बाळ गंगाधर टिळक या नावाने  प्रसिद्ध झाले. मोठे होऊन त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी फार मोठे कार्य केले. केसरी व  मराठा सारखी वर्तमानपत्रे सुरू केली. शिवजयंती व गणेशोत्सव सारखे सार्वजनिक उत्सव सुरू केले.  इंग्रजांना आपल्या लेखणीने आणि वाणीने सळो की पळो करून सोडले.  स्वातंत्र्य चळवळीच्या टिळकांच्या काळाला त्यामुळेच टिळक युग असे म्हटले जाते.  अशा या लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीदिनी आदराने विनम्र अभिवादन करतो आणि  मी माझे भाषण संपवतो.

जय हिंद  !

जय महाराष्ट्र !!

 

भाषण क्रमांक – 3

सन्माननीय व्यासपीठ, अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो !
लोकमान्य टिळकांबद्दल असलेल्या आदरामुळे आज आपण त्यांची जयंती साजरी करण्यासाठी याठिकाणी जमलेलो आहोत.  लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. कोकणातील रत्नागिरी जवळच्या चिखली मध्ये त्यांचे बालपण गेले. लोकमान्य टिळक जन्मजात बुद्धिमान होते. लहानपणी त्यांनी त्यांच्या बुद्धीची चुणूक दाखवली. त्यांचे वडील गंगाधरशास्त्री त्यांना संस्कृत शिकवत .संस्कृतसारख्या विषयांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले. त्यांना गणित हा विषय खूप आवडे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते गणित विषयात संशोधन करीत. लोकमान्य टिळक हे शिक्षक म्हणून सुद्धा खूप चांगले काम करीत. लोकमान्य टिळकांनी पुढे जाऊन केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली. शिवजयंती आणि गणेशोत्सव हे उत्सव सार्वजनिक रीतीने साजरे करण्यास सुरुवात केली. इंग्रजांच्या ताब्यातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले.  गीतारहस्य सारखा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा महामंत्र त्यांनी भारतीयांना दिला.एक ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक आपल्याला सोडून गेले.अशा या टिळकांना त्यांच्या जयंतीदिनी मी आदरपूर्वक नम्र अभिवादन करतो.
जय हिंद!

जय महाराष्ट्र!!

भाषण क्रमांक – 4

सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय अध्यक्ष महोदय व गुरुजन वर्ग, येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो!
लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील फार मोठे योगदान देणारे महापुरुष होते.रत्नागिरीतील चिखली या छोट्याशा गावी 23 जुलै 1856 रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यामध्ये डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले. शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. केसरी आणि मराठा सारखी वर्तमानपत्रे सुरू करून इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी रणसिंग फुंकले. आपल्या जहाल वाणीने आणि लेखणीने इंग्रजांना त्यांनी फार मोठे आव्हान दिले. स्वदेशी,स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुःसूत्री त्यांनी भारतीयांना दिली. होमरूल ही चळवळ टिळकांनी नेटाने चालवली. सर्वसामान्यांचे नेते म्हणून लोकमान्य टिळकांनी कार्य केले. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहाल गटाचे नेतृत्व करून इंग्रजांना अर्ज विनंत्या करून भागणार नाही तर त्यासाठी उग्र आंदोलन केले पाहिजे हे त्यांचे ठाम मत होते. आणि त्यानुसारच त्यांनी आपले कार्य केले लोकमान्य टिळक फार मोठे देशभक्त होते. सर्वसामान्य भारतीयांना प्रेरणा देत लोकमान्य टिळकांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. शिवजयंती आणि गणेशोत्सवासारखे सार्वजनिक उत्सव सुरू करून मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आणून त्यांना स्वातंत्र्याबद्दल आंदोलन करण्यासाठी प्रेरित केले. असे हे परमपूजनीय लोकमान्य टिळक मुंबई येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी मृत्यू पावले. त्यांच्या जयंतीदिनी मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे छोटेसे भाषण संपवतो.

जय हिंद!

जय महाराष्ट्र !!

भाषण क्रमांक – 5

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांची आज जयंती. लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत. कोणताही महापुरुष हा विशिष्ट जातीचा नसून तो सर्वसामान्यांसाठी कार्य करीत असल्यामुळे त्याचे कार्य आपण समजून घेतले पाहिजे. त्यांचे गुण आपल्यामध्ये उतरवले पाहिजे असे मला वाटते
लोकमान्य टिळक हे अतिशय करारी, स्वातंत्रप्रिय, स्वाभिमानी,जिद्दी,आत्मविश्वासाने भरलेले राष्ट्रभक्त होते. त्यांचे हे गुण आपण घेतले पाहिजेत. लोकमान्य टिळक हे अतिशय व्यासंगी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. संस्कृत आणि गणित या विषयांची त्यांना खूप आवड होती. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते या विषयांचा सखोल अभ्यास करीत.
त्याकाळी भारत देश एखाद्या थंड गोळ्यासारखा सुस्त पडला होता. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीयांना त्यांनी फार मोठी प्रेरणा दिली. लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृती निर्माण केली. लोकांना स्वातंत्र्य प्रिय बनवले.
अशा या थोर महापुरुषाला यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करतो आणि एवढेच सांगतो की,

“थोर महात्मे होऊन गेले, चरित्रे त्यांची पहा जरा,

आपणही त्यांच्या समान व्हावे,  हाची सापडे बोध खरा,

हाची सापडे बोध खरा.”

जय हिंद !

जय महाराष्ट्र !!

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment