स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे मराठी Speeches on Independence day in Marathi

स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे मराठी Speeches on Independence day in Marathi

 

दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणांची आवश्यकता असते. स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्रीयसणानिमित्त विद्यार्थी शाळेत भाषणे करतात.या माझ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही काही सुंदर भाषणे याठकाणी देत आहोत. आपण ती भाषणे 15 ऑगस्टच्या कार्यक्रमानिमित्त लिहून घेऊन सादर करू शकता.

भाषण क्रमांक – १

आदरणीय अध्यक्ष महोदय,गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू-भगिनींनो;
आज स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आपण येथे जमलेला आहोत. 1947 सालच्या 15 ऑगस्ट या मंगलदिनी भारताला स्वातंत्र्य मिळाले. दीडशे वर्षे इंग्रजांच्या ताब्यात असलेला आपला देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अगणित देशभक्तांनी आपल्या जीवाचे रान केले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, वल्लभभाई पटेल, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद इत्यादी देशभक्तांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. त्यामुळे आज आपला देश स्वतंत्र आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या सैन्याने आपला देश आजवर सुरक्षित ठेवला आहे. स्वातंत्र्य मिळविताना देशभक्तांनी देशाविषयी चांगली स्वप्ने पाहिली होती.या देशभक्तांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण सर्वजण पण बांधील आहोत.

भारताचे स्वातंत्र्य हे तळागाळातील सर्वांच्या न्याय व हक्कासाठी मिळालेले आहे. स्वातंत्र्य हा आपला हक्क असतो आणि ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी केलेली प्रत्येक कृती हे आपले कर्तव्य असते. म्हणून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केवळ न्याय आणि हक्कांचा विचार न करता आपले देशाविषयी असलेले कर्तव्य बजावण्याची प्रतिज्ञा आपण करुया.                                                       जय हिंद!  जय महाराष्ट्र !!

लोकमान्य टिळक छोटी भाषणे

भाषण क्रमांक- २

आदरणीय अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो,
15 ऑगस्ट 1947 या पवित्र दिनी भारतमाता स्वतंत्र झाली. इंग्रजांच्या जुलमी सत्तेच्या जोखडातून देश स्वतंत्र झाला. तो पावन दिवस म्हणजेच स्वातंत्र्यदिन होय.
दीडशे ते दोनशे वर्ष इंग्रजांच्या अन्यायकारक सत्तेविरुद्ध भारतीय जनता वेगवेगळ्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी लढत होती. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कोणी लोकशाही मार्गांचा अवलंब केला; तर कोणी हातात शस्त्र घेऊन क्रांतीच्या मार्गाचा अवलंब केला. मार्ग कोणताही असो, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपले जीवन झिजवणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला आदरणीय आहे. स्वातंत्र्य हे तमाम भारतीयांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मिळवलेले आहे. देशभक्तांच्या स्वप्नातील भारत आपण घडवूया. आणि त्या सर्व स्वातंत्र्य प्रिय देशभक्तांना आज आपण विनम्र अभिवादन करूया .
जय हिंद!
जय महाराष्ट्र!!

लोकमान्य टिळक भाषण

भाषण क्रमांक -३

आदरणीय अध्यक्ष महोदय गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो
आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपल्या देशात स्वातंत्र्य दिन. यानिमित्ताने मी तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयीच्या कार्याविषयी माहिती देत आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे 23 जानेवारी 1956 रोजी झाला त्यांचे बालपणीचे नाव केशव असे होते. परंतु सगळेच त्यांना बाळ म्हणत.त्यामुळे ते बाळ या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते.
आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन कामी लावण्याची शपथ घेतली. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी केसरी आणि मराठा सारखी वर्तमानपत्रे सुरू केली. शिवजयंती आणि गणेशोत्सव सारखे उत्सव लोकांना एकत्रित करण्यासाठी सुरू केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण केला. पुण्यामध्ये प्लेगची साथ सुरू असताना त्यांनी केसरीच्या अग्रलेखातून इंग्रजांविरुद्ध कोरडे ओढले. “राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे”, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” अशा अग्रलेखांनी इंग्रज सरकार चिडले.इंग्रजांनी टिळकांना मंडालेच्या तुरुंगात देशाबाहेर नेऊन ठेवले. तिथेही लोकमान्यांनी गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहिला.
जुलमी इंग्रजी सत्ते विरुद्ध लढताना टिळकांना अनेकदा तुरुंगात जावे लागले. आपल्या जहाल वाणीने आणि लेखणीने त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.
अखेर 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक अनंतात विलीन झाले. लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य दिनाच्या या पवित्र दिवशी आपण विनम्र अभिवादन करूया.
जय हिंद !
जय महाराष्ट्र!!

महात्मा गांधीं वर मराठी निबंध व भाषणे

 

भाषण क्रमांक – ४

आदरणीय अध्यक्ष महोदय,गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो,
आज पंधरा ऑगस्ट हा फार पवित्र दिवस आहे.याच दिवशी 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यलढ्यामध्ये महात्मा गांधीजींनी केलेल्या कार्याविषयी मी तुम्हाला माहिती देत आहे. महात्मा गांधींचा जन्म पोरबंदर हे ठिकाणे 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. त्यांचे नाव मोहनदास, वडिलांचे नाव करमचंद , आईचे नाव पुतळीबाई, तर पत्नीचे नाव कस्तुरबा असे होते. लोक गांधीजींना प्रेमाने बापू म्हणत. स्वामी श्रद्धानंद यांनी प्रथम त्यांचा उल्लेख महात्मा असा केला. इंग्लंडमध्ये बॅरिस्टरची पदवी घेतल्यानंतर सुमारे एकवीस वर्ष महात्माजी दक्षिण आफ्रिकेमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने राहिले.
पुढे भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले योगदान देण्याचा त्यांनी विचार केला आणि ते भारतात परतले. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले नेतृत्व दिले. सत्य, अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने त्यांनी आपला लढा चालवला. सविनय कायदेभंग, असहकार आंदोलन, छोडो भारत चळवळ अशी मोठी आंदोलने त्यांनी केली. सत्याग्रहाचे हत्यार सर्वसामान्य जनतेला घेऊन इंग्रजांविरुद्ध वापरले. आयुष्य आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेचले.
कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा दिली. सर्वसामान्य माणूस स्वातंत्र्यलढ्यासाठी उभा केला.पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही धर्माधर्मात सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केले. एका माथेफिरु व्यक्तीने या महात्म्याला 30 जानेवारी 1948 रोजी मारले.
महात्मा गांधीजींनी केवळ भारतालाच नाही तर जगाला लोकशाही मार्गाने अन्याय विरुद्ध कसे लढावे याची दिशा दिली.  त्यांचे विचार कोणीही मारू शकले नाही. त्यांचे विचार आजही जगभरात अभ्यासले जातात आणि त्यानुसार लोक चालतात. महात्मा गांधीना या स्वातंत्र्यदिनी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!!

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment