20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांसाठी ‘शिक्षण सारथी’ योजना Shikshan Sarthi Yojana

20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांसाठी ‘शिक्षण सारथी’ योजना Shikshan Sarthi Yoajna

20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांसाठी ‘शिक्षण सारथी’ योजना Shikshan Sarthi Yojana आणण्याच्या विचारात महाराष्ट्र शासन आहे.

शिक्षण सारथी योजना Shikshan Sarthi Yojana कोणत्या शाळांसाठी आहे?

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये 20 पटसंख्या असणाऱ्या शाळांची संख्या सुमारे 12500 पेक्षा जास्त झाली आहे. या शाळांवर एक किंवा दोन शिक्षक कार्यरत असतात. त्याचप्रमाणे भौतिक सुविधा ही पुराव्या लागतात. शासनाला आर्थिकदृष्ट्या ही गोष्ट परवडणारी नाही. त्यामुळे शासन 20 पटसंख्या पेक्षा कमी असणाऱ्या शाळांवर शिक्षण सारथी योजना आणण्याच्या विचारात आहे.

शिक्षण सारथी योजना Shikshan Sarthi Yojanaअंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर नेमले जाणार

जास्त पटाच्या शाळांवर शिक्षक संख्या कमी असल्याने या ठिकाणी शिक्षकांच्या कमतरतेचा अभाव निर्माण होऊन शालेय गुणवत्ता ढासळत आहे. 20 पटसंख्या कमी असणाऱ्या शाळांवर त्या गावातील किंवा भागातील सेवानिवृत्त शिक्षकांना वीस हजार रुपये दरमहा मानधनावर नियुक्त केले जाणार आहे.

Shikshan Sarthi Yojana

सदर शाळांतील शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याचा विचार शालेय शिक्षण विभाग गांभीर्याने करत आहे. शालेय शिक्षण आयुक्त कार्यालयाने याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवला असल्याचा समजते.

वीस पटा पेक्षा कमी असणाऱ्या शाळांवरील शिक्षकांचे समायोजन कुठे होणार?

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तीस हजाराहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याची समजते. वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद न करता त्या मानधनावर चालवायला देऊन ज्या ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे त्या ठिकाणी त्यांचे समायोजन केले तर शालेय गुणवत्ता राखण्यास ते सहाय्यक होईल. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे घरांसाठी पेव महाराष्ट्रात फुटले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेविषयी ओरड होत आहे. त्या दृष्टीने शासनाने हा विचार केला असावा.

क्लस्टर स्कूल प्रकल्प माहिती

शिक्षण सारथी (Shikshan Sarthi Yojana) योजनेला सेवानिवृत्त शिक्षक प्रतिसाद देणार का?

सेवानिवृत्त झालेले शिक्षण या शाळांवर नियुक्त करण्याचा शासनाचा विचार असला तरी सेवानिवृत्त शिक्षक यासाठी किती प्रतिसाद देतील याबाबत निश्चितच शंका आहे.या ऐवजी तरुण शिक्षकांना किंवा डीएड पदवी प्राप्त शिक्षकांना या ठिकाणी नेमले तर त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न मिटू शकतो. परंतु एकदा केलेला कर्मचारी पुढे कायमस्वरूपी होण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यांना व्यवस्थेमध्ये सामावून घ्यावे लागते. हा शासनाचा पूर्वानुभव विचारात घेता शासन एक दोन वर्षे नुकतेच नियुक्त झालेले जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना या ठिकाणी नियुक्त करू इच्छिते.

20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांसाठी ‘शिक्षण सारथी’ योजना Shikshan Sarthi Yojana महाराष्ट्र शासनाच्या विचारात असली तरी शिक्षक संघटनांकडून या योजनेला विरोध होऊ शकतो.त्यामुळे शासन याबाबत गांभीर्याने विचार करीत असले तरी निश्चितच जपून पावले टाकील अशीच शक्यता आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment