संविधान दिन Sanvidhan Din

संविधान दिन Sanvidhan Din

आधुनिक युगामध्ये ज्या महामानवाने मानवतेचा वसा आणि वारसा सांगणारी राज्यघटना Sanvidhan Din आपल्या प्रचंड अभ्यास आणि व्यासंगाच्या बळावर निर्माण केली, त्या महामानवाचे नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय.

डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या अपार मेहनतीने बनवलेली राज्यघटना अर्थात संविधान देशाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी अर्पण करण्यात आली. या दिवसाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर 2015 पासून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो.

भारताच्या विविधतेत दिसत असलेली एकता म्हणजे भारताचे संविधान होय.’बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय’ हा अखंड मानवाचे कल्याण ज्यात  सामावलेले आहे असे ब्रीद सार्थ ठरविले ते भारतीय संविधान. देशातील उच्चवर्णीय ते तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक,सांस्कृतिक आणि राजकीय विकासाची समान संधी उपलब्ध करून देणारे शस्त्र म्हणजे भारतीय संविधान.

संविधान दिन निबंध Essay on Sanvidhan Din

भारतीय संविधान संरचना, उद्देशिका,त्यात सामावलेली परिशिष्टे व कलमे ही सर्वसामान्य नागरिकांना मिळालेली कवच कुंडले म्हणता येतील.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून  शिवाजी महाराजांचे सुराज्य ही संकल्पना पुनश्च साकार केली. आपल्याकडील असलेल्या विद्वत्तेचा सुयोग्य वापर आणि घटना समितीत केल्याला अभ्यासपूर्ण व मुद्देसुद भाषणांच्या जोरावर त्यांना संविधान सभेत  घेऊन मसुदा समितीचे अध्यक्ष बनवून घटनेचा प्रारूप  बनविण्याची जबाबदारी बाबासाहेबांबरोबर सोपविली ही विशेष बाब होती.

भारतीय राज्यघटना पीडीएफ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

Constitution Of India

बाबासाहेबांनी पण आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून  उत्तम, समावेशक असा घटनेचा मसुदा 21फेब्रुवारी 1948 साली घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सादर करून, जवळ जवळ आठ महिने इतकी मुदत देऊन,त्यावर  सभासदांची मते  मागवण्यात आली. अनेकवेळा झालेल्या विचार मंथनातून  तसेच घटना समितीच्या सभासदांनी मसुदारूप घटनेत असलेली राज्यहीताची व जनहिताची जी वैशिष्ट्ये बाबासाहेबानी  मांडली,  त्यावर  व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया हेच सिध्द करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच स्वतंत्र व सार्वभौम भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार होते.

अनेक समस्यांना सामोरे जात बाबासाहेबानी 30ऑगस्ट 1947ते 21 फेब्रुवारी1948या सहा महिन्याच्या कालावधीत अविश्रांत परिश्रम घेऊन मसुदा रूप घटना सुस्वरुपात तयार केली. अखेरीस 26जानेवारी 1950रोजी देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊन भारताचा सामावेश लोकशाहीप्रधान देशात झाला.बाबासाहेबांनी आपल सर्वस्व अर्पून लिखीत  जे संविधान नेहरूंना दिले. त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु त्याचबरोबर काळजी, भीती दिसत होती. याचा प्रत्यय आपल्यात त्यांनी लिहिलेल्या writing and speeches वाचताना येतो.

भारतीय संविधानाची निर्मितीच मुळात देशातील  नागरिकांना अभिप्रेत असलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता तत्वांना स्वीकारून केली आहे. त्यामुळे कधीच कोणताच नागरिक, समाज,पंथ,घटक विकासापासून वंचित राहू शकत नाही. सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून घेऊन सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,राजकीय विकास साधायचा असेल तर  केवळ राजकीय स्वार्थापोटी समाज कंटकाकडून होणारी  संविधान तत्वाची पायमल्ली थांबवून संविधान जागर करणे काळाची गरज आहे असे वाटते.

“मजहब को ऐसे चलाया जाय

जैसे इंसान को इंसान बनाया जाय

प्यार का खून क्यू हूआ

ये समझने के लिये हर अंधेरे को उजले में लाया जाय

जैसे तेरे आसू मेरे पलकोंपे उठाया जाय.. “

प्रा. सचिन वाघ,साक्री

ग्रंथपाल,सी.गो.पाटील महाविद्यालय साक्री,

तालुका :- साक्री, जिल्हा:- धुळे

Share on:

1 thought on “संविधान दिन Sanvidhan Din”

Leave a Comment