राहुल बजाज यांचा अल्पपरिचय Rahul Bajaj has passed away

राहुल बजाज यांचा अल्पपरिचय Rahul Bajaj has passed away

पद्मभूषण राहुल बजाज यांचे पुणे येथे रुबी हॉल क्लिनिक या हॉस्पिटल मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी दुःखद निधन Rahul Bajaj has passed away झाले. देश एका महान उद्योगपतीला मुकला.

पद्मभूषण राहुल बजाज बजाज ऑटो समूहाचे माजी अध्यक्ष होते भारताला ऑटोमोबाईल क्षेत्रांमध्ये प्रचंड मोठी भरारी घेण्यामध्ये राहुल बजाज आणि बजाज ऑटो समूहाचे फार मोठे योगदान आहे. अनेक परदेशी कंपन्यांच्या आव्हानाला समर्थपणे सामना देत बजाज आटो समूहाने भारताच्या उद्योग क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली यामध्ये राहुल बजाज यांच्या नेतृत्वाचा फार मोठा वाटा आहे.

Rahul Bajaj

पद्मभूषण राहुल बजाज हे आपल्या स्पष्ट निर्भीड वक्त्तृवासाठी प्रसिद्ध होते. 10 जून 1938 या दिवशी राहुल बजाज यांचा जन्म झाला राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि कायद्यामध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. हावर्ड विद्यापीठामध्ये राहुल बजाज यांनी एमबीए केले.

राहुल बजाज हे एक मुत्सद्दी आणि कार्यकुशल उद्योजकीय नेतृत्व होते. बजाज ऑटोमध्ये त्यांनी 1968 साली मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करत असताना अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन बजाज आटो समूह जगभरात नेला. सन 1972 मध्ये राहुल बजाज यांनी बजाज समोरचे सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली.

आपल्याला सर्वांना बजाज m80 आणि बजाज m50 गाडी आठवतच असेल. या दोन्ही गाड्या संपूर्ण भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा अतिशय लोकप्रिय ठरल्या होत्या. सर्वांना परवडेल आणि आवडेल अशा प्रकारचे बजाज उद्योग समूहाचे हे उत्पादन जगभर लोकप्रिय ठरले.

राहुल बजाज यांना 2001 या वर्षी भारत सरकारने पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरविले होते. पद्मभूषण पुरस्कार काय तर भारतरत्न सारख्या पुरस्काराला ही राहुल बजाज ही व्यक्ती गवसणी घालील की काय असे वाटत असतानाच राहुल बजाज आपल्या सर्वांमधून काळाने हिरावून घेतले.Rahul Bajaj has passed away

राहुल बजाज यांना भारतातील राजकीय सामाजिक आणि सोशल माध्यमातून श्रद्धांजली आणि अभिवादन केले जात आहे. हे त्यांच्या सामाजिक आणि मानवतावादी कार्याचे द्योतक समजले पाहिजे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment