डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार Quotes of Dr.Ambedkar

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार Quotes of Dr.Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारवंत, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञावंत, व्यासंगी ग्रंथलेखक, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ,सच्चे समाजसुधारक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही प्रेरणादायी विचार या ठिकाणी देत आहोत. आपण ते वाचाल आणि आपल्या जीवनाचा कायापालट करणारे विचार आपल्या जीवनात मुरवाल ही अपेक्षा.

शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा.!

 1. माझे असे ठाम मत आहे की विद्यार्थीदशेत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी राजकारणात भाग घेता कामा नये. कारण अभ्यास सोडून ते जर राजकारणात पडले तर शिक्षणाचे मोठे नुकसान होते.
 2. स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्त्वे ज्या जीवनात आहेत, ते जीवन म्हणजेच लोकशाही.
 3. लोकशाही यशस्वी व्हावयाची असेल तर प्रथम समाज व्यवस्थेत विषमता नसली पाहिजे.
 4. जो समाज पारतंत्र्यात जखडला गेला असेल त्या समाजाने स्वातंत्र्यासाठी अहर्निश लढा दिलाच पाहिजे.
 5. जीवन पवित्र राखणे हाच धर्म होय, नैतिकता हाच धर्म होय, सील सदाचार हाच धर्म !
 6. विद्या ही तलवारीसारखी आहे.तिचे महत्त्व तिला धार करणार्‍यावर अवलंबून आहे.
 7. विद्या हे मात्र दशील नसेल तर, असा इसम विद्येच्या शस्त्राने दुसऱ्याचा घात करेल.
 8. विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थीदशेत विद्या प्राप्त करण्यासाठी कसून झटावे.
 9. लोकशाही म्हणजे अशी शासन व्यवस्था जिच्यात शांततापूर्ण मार्गाने हिंसाचाराचा अवलंब न करता समाजव्यवस्थेत क्रांतिकारी परिवर्तन आणता येते. हीच लोकशाहीची खरी परीक्षा आहे.
 10. आपण नुसत्या राजकीय लोकशाहीवर कधीही संतुष्ट राहू नये… राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीचा आधार असल्यापासून ती कधीही टिकू शकणार नाही.
 11. आपल्या सामाजिक राजकीय आयुष्याचा पाया बुद्धिवाद हाच असला पाहिजे
 12. समाजात संघटना शील व शिस्त वाढवावा व समाज उन्नती त्याचा फायदा द्या
 13. शिक्षित व्हा, संघटित व्हा,आत्मविश्वास बाळगा आणि कधीही धीर सोडू नका.
 14. लोकशाही जिवंत राहिली तर तिची फळे नक्कीच आपणास लाभतील. लोकशाही मेली तर तो आपला विनाश आहे. यासंबंधी शंकाच नको.
 15. एखाद्या समाजाची खरी प्रगती किती झाली हे त्यातील स्त्रियांची प्रगती किती झाली यावरून मोजता येते.
 16. आपले अस्तित्व स्वतंत्रपणे राखल्याशिवाय दुःखाला तोंड पडता येणार नाही.
 17. दीर्घोद्योग व कष्ट करण्यास यशप्राप्ती होते.
 18. आम्हाला कोणाचीही परक्यांची किंवा स्वकीयांची गुलामगिरी पत्करायची नाही. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे. परंतु त्याचबरोबर आम्हाला लोकशाही देखील पाहिजे आहे.
 19. नुसत्या पदव्या मिळविल्याने काही होणार नाही. कारण पदव्या म्हणजे ज्ञान नसून शिक्षकांच्या मदतीशिवाय ज्ञानार्जन करण्यास जमवलेली साधनसामग्री होय.
 20. कोणताही मनुष्य सतत दीर्घ उद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो.
 21. विद्येबरोबर आमच्यात शील पाहिजे. शीलाशिवाय विद्या फुकट आहे.
 22. सरकारची नेहमीच कसोटी घेत राहिल्याशिवाय लोकशाही सुरक्षित राहणे शक्य नाही.
 23. राजकीय सत्ता हे एक प्रभावी शस्त्र आहे.
 24. दूरदृष्टी आणि काटकसर हे वैभव भावी पिढीने टिकविले पाहिजे
 25. स्वातंत्र्य माणुसकी आणि समान हक्क मिळतील तेच स्वराज्य.
 26. स्वाभिमान सोडून साधलेली उन्नती ही कुचकामी आहे.
 27. या देशात इतक्या जाती आणि इतके पंथ असूनही आपण सारे लोक एकत्र होऊ होऊ या विषयी माझ्या मनात मुळीच शंका नाही.
 28. माझा ग्रंथसंग्रह हा माझा प्राण आहे.
 29. अनाठायी वेळ घालवायला, मौजमजा करायला किंमत जैन करायला माझ्याकडे वेळच नाही.
 30. विद्येशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. ती महासागरासारखी विशाल आहे.माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे तशीच विद्येचीही.
 31. आदर्श समाजाला लवचिक असायला हवा.
 32. लोकशाही हा काही निव्वळ राजसत्तेचा प्रकार नाही.लोकशाही ही प्रथम सामाजिक सहजीवनाची व्यवस्था आहे.
 33. आदर्श समाज रचनेत विविध गटांच्या सुखदुःखात प्रत्येक गट जाणीवपूर्वक सहभागी होतो
 34. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा
 35. मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो.
 36. हक्क मागून मिळत नसतो त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो
 37. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
 38. नशीबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा.
 39. आयुष्य मोठं नाही तर महान असावं.
 40. माणूस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे.
 41. महान व्यक्ती ही नेहमी प्रतिष्ठित व्यक्ती पेक्षा वेगळी आहे. करण महान व्यक्ती समाजाचा पाईक होण्यासाठी सदैव तयार असते.
 42. शिक्षक हा शालेय असो, महाविद्यालयीन असो की विद्यापीठीय असो त्याचे कर्तृत्त्व उत्तुंग आणि विद्यार्थ्यांना अनुकरणीय वाटले पाहिजे.
 43. किती अंतर चालून गेलात यापेक्षा आपण कोणत्या दिशेने चालत आहात हे अधिक महत्त्वाचे आहे.
 44. आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्यात ठरवीत असतील तर माझे मनगट आणि मेंदू काय कामाचे आहेत आहे
 45. बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे.
 46. स्वतःची लायकी विद्यार्थीदशेत वाढवा
 47. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे , जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
 48. तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणी जाणार नाही.
 49. आपल्याला कमीपणा येईल असा पोशाख करू नका.
 50. लोकांत तेज व जागृती निर्माण होईल असे राजकारण हवे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले निबंध मराठी Essay on Savitribai phule in Marathi

माझा आवडता खेळाडू महेंद्रसिंग धोनी Maza Avadata kheladu

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment