पुरस्कार ! लेखक संजय गवांदे Puraskar Lekhak Sanjay Gawande

पुरस्कार ! लेखक संजय गवांदे Puraskar Lekhak Sanjay Gawande

पुरस्कार ! लेखक संजय गवांदे Puraskar Lekhak Sanjay Gawande

शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलं….. कारण हे प्रकरणच तसं अचंबित करणारं आहे. तुम्ही किती गुणवंत आहात हे… हे पुरस्कार ठरवतात. पुरस्काराची टिकली दिसली की… हळदीकुंकू समारंभात जसं हळद कुंकूवावर हळदीकुंकू लावून लावून बिचारीचं कपाळ जसं भरुन जातं तसंच या पुरस्काराचं आहे. एखादा मिळाला की दाद मिळते. ती वाढते. प्रसार होतो. पुरस्कार मिळालेला न्हावून निघतो. त्याला तो पुरस्कार मिळाला म्हणून मग पुन्हा हा दिला. संख्या वाढत जाते.

आदर्श शिक्षक पुरस्कार… राष्ट्रीय आहे . तो राज्यस्तरीय आहे. जिल्हास्तरीय आहे. तालुका स्तरावर आहे. गावपातळीवर आहे. रोटरीचा आहे. पक्षांचा आहे. मंडळाचा आहे. शाळेतूनही निवडतात.शब्द एकच आदर्श शिक्षक!

बरं यात ज्यांचा नंबर लागला ते राष्ट्राचे भाग्यविधाते मानले तर बाकीचे कोण?

त्यांचे काहीच योगदान नसते का? प्रयोगशील शिक्षक पुरस्कार… असं एकवेळ ठीक. पण थेट आदर्श बिरुद चिकटवून आपण साधतो काय?

माणूस आहे.. तो चुकणार आहे. प्रिय अप्रिय जगणार वागणार आहे. हे लक्षात ज्यावेळी येईल तेव्हा आदर्श शब्दाला टाळून नेमकं विशेषण वापरात येईल. पण हे तसं होणार नाही.

झुंज फक्त कोंबड्यांची प्राण्यांचीच लावली जाते असे नाही. असे हे पुरस्कारही झुंजवतात. पुरस्कार देणारे कितीही असोत. घेणाऱ्यानेच जागे रहाणे गरजचे आहे.

आता एक किस्सा सांगतो – राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार दुसऱ्या दिवशी होता. जे जे आदर्श आहेत त्यांची सोय पंचतारांकित हॉटेलमध्ये शासनाकडून करण्यात आली होती. व्यवस्था करण्यात मलाही संधी मिळाली होती. एक शिक्षक कुटुंब कबिल्यासह आले. एवढ्यांची सोय करणं अवघड होतं. त्यांना समजावलं. ते संतापले. म्हणाले – तुम्हाला माहित आहे का? मी आदर्श शिक्षक आहे. मला उद्या सन्मानित केलं जाणार आहे. माझी आणि बरोबरच्या सर्वांची सोय करा. अन्यथा मी बघून घेईल.

तुम्ही तिघे वघळता.. इतरांची सोय होईल पण त्यांचे पैसे तुम्ही परस्पर हॉटेलला भरा. रुम बुक करा. – आम्ही. (कारण वरीष्ठांनी आम्हाला तसं सांगितलं होतं.)

एक रुपया भरणार नाही. काय समजता तुम्ही?…. ते सर्वांमध्ये चमकून घेत होते.

आम्ही पदरचे पैसे देऊन त्यांची सगळी जेवणाची सोय केली. कुटुंब सोडून कबिलल्याला नातेवाईकांकडे रहाण्याची सोय करायला सांगितले. दुसऱ्या दिवशीही सभागृहात ते प्रचंड रागानेच आमच्याकडे बघत राहिले. कार्यक्रम झाल्यावर बाहेर आम्ही जिथे उभे होतो तिथे अनेकांबरोबर फोटो काढून आदर्श बिरुद मिरवू लागले.

न राहून मी त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी झटकुन लावले. सोहळा संपला. पण माझ्या स्वभावामुळे तो मनात रेंगाळत राहिला. कशी आणि का निवड झाली असेल यांची?

शिक्षक पुरस्कार,शिक्षक आणि वशिलेबाजी Shikshak Puraskar

मग मनात येतं… पुरस्काराने कधी सिद्धता येत नाही. आपल्याला क्षणोक्षणी सिद्ध करावं लागतं ते मुलांसमोर. त्यांच्या टाळ्या… त्यांचं हास्य आणि आनंद… त्यांना लावलेली अभ्यासाची शाळेची ओढ… हे जो कोणी शिक्षक करु शकेल तो तो शिक्षक खूप श्रेष्ठ दर्जाचा आहे. कारण पानाआड फूल दडलं तरी सुगंध आल्याशिवाय रहात नाही. येतोच. हीच मूलं पुढे अशाच शिक्षकांना आठवणीत ठेवतात. तोच खरा पुरस्कार ठरतो.

©संजय गवांदे

पुरस्कार ! लेखक संजय गवांदे Puraskar ! Lekhak Sanjay Gawande आपण वाचलात. आपल्याला हा लेख निश्चितच आवडला असेल. आपण आपल्या प्रतिक्रिया खाली प्रतिक्रिया या बॉक्समध्ये लिहून कळवाल अशी अपेक्षा.

Share on:

Leave a Comment