पुणे जिल्ह्याची माहिती Pune District Information in Marathi

पुणे जिल्ह्याची माहिती Pune District Information in Marathi

Pune District Information in Marathi

●पुणे शहर हे तत्कालीन मराठा साम्राज्याची अर्थात संपूर्ण हिंदुस्तानची एकेकाळची राजधानी म्हणून ओळखली जात होती.

●पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध शहर आहे.

●पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी जन्म झाला.

इको फ्रेंडली गणेशोत्सव

●पुणे जिल्ह्यातील खानवडी तालुका पुरंदर हे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे जन्मगाव आहे.

●पुणे व पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले शैक्षणिक व समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांनी स्थापन केलेल्या शाळा व संस्था आजही या ठिकाणी पहावयास मिळतात.

●पुणे जिल्ह्यातील नाणेघाट येथे मराठी भाषेतील ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहे. मराठी भाषेबाबत सर्वात जुना पुरावा आहे.

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्तवर मराठीत निबंध

●पुणे जिल्ह्यात अष्टविनायकांपैकी पाच मंदिरे आहेत त्यामध्ये ओझरचा विघ्नहर्ता, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, रांजणगावचा महागणपती, थेऊरचा चिंतामणी, मोरगावचा मोरेश्वर यांचा समावेश होतो.

●पुणे जिल्ह्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदी येथे आहे. संत ज्ञानेश्वरांची ही संजीवन समाधी असून दरवर्षी आषाढी-कार्तिकीला या ठिकाणी यात्रा भरते. पालख्या येतात.

●पुणे जिल्ह्यातील देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे मंदिर असून इंद्रायणी नदीच्या काठी गाथा मंदिर बांधण्यात आलेले आहे. त्यामध्ये संत तुकाराम महाराजांचे सर्व अभंग संगमरवरामध्ये कोरलेले आहेत.

●पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या पश्चिम घाटावर लोणावळा आणि खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. या ठिकाणी पावसाळ्यात ट्रेकिंगचे प्रमुख आकर्षण असते. भुशी डॅम, वळवण डॅम,तुंगार्ली तलाव, कोरीगड किल्ला या ठिकाणी सहारा लेक सिटी प्रसिद्ध आहे.

●पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी मळवली स्टेशन जवळ कार्ले भाजे लेण्या आहेत. एकूण 18 लेण्या असून इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील त्या लेण्या प्रसिद्ध आहे तिथे एकवीरा आईचे मंदिरही आहे.

●जेजुरी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कुलदैवत खंडेरायाचे मंदिर आहे. या ठिकाणी सोमवती अमावस्येच्या दिवशी मोठी यात्रा भरते लक्षावधी लोक यात्रेसाठी येतात.
●जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीच्या सान्निध्यात असलेले लेण्याद्रीचे अष्टविनायकांपैकी श्री गिरिजात्मक गणेशाचे स्वयंभू मंदिर आहे. मंदिराला 383 पायऱ्या आहेत. या ठिकाणी लेण्यांचा खूप मोठा समूह आहे. तो पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक येतात.

●पुणे जिल्ह्यात आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेले एक स्थान भीमाशंकर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी हजेरी लावतात. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात हे दर सोमवारी मोठी यात्रा भरते.

●भीमाशंकर अभयारण्य हा मोठा परिसर असून या ठिकाणची जैवविविधता खूप मौलिक आहे. याच अभयारण्यामध्ये महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू खार वास्तव्य करून असते.

●आंबेगाव तालुक्यातील अवसरी घाट हे एक निसर्ग रम्य ठिकाण आहे. या ठिकाणी 130 औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्यात आले आहे. हे ठिकाण वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने निर्माण केलेले एक उद्यान आहे.
पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर हे क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थान आहे.

●क्रांतिकारक हुतात्मा बाबू गेनू यांची समाधी आंबेगाव तालुक्यामध्ये आहे.

●पुणे जिल्हा लोकसंख्येच्या घनतेचे नुसार महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे.

●पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. पुढीलप्रमाणे जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ,मुळशी, वेल्हे, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, हवेली, पुणे शहर.

●पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण एम विश्वेश्वरय्या यांचे प्रसिद्ध स्थापत्य शास्त्रज्ञांनी बांधलेले आहे. या धरणाला स्वयंचलित दरवाजे आहेत.

●पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात विशेषतः जुन्नर तालुक्यात कुकडी प्रकल्प निर्माण केला असून यामध्ये पाच कारणांचा समावेश होतो माणिकडोह, डिंभे, पिंपळगाव जोगा, वडज, येडगाव ही ती धरणे आहेत.

●पुणे जिल्ह्यामध्ये खडकवासला, पानशेत, मुळशी, वरसगाव, भाटघर, चासकमान ,पवना, टेमघर, डिंभे, पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी ही धरणे प्रसिद्ध आहेत.
उरुळी कांचन तालुका हवेली येथे महात्मा गांधींनी स्थापन केलेले प्रसिद्ध निसर्ग उपचार केंद्र आहे.

●जुन्नर तालुक्यामध्ये जी. एम. आर. टी.खोडद ही आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिन असून या ठिकाणी अवकाश संशोधनाचे कार्य चालते.

●पिंपरी येथे हिंदुस्तान एंटीबायोटिक्स लिमिटेड हा पेनिसिलीनचा कारखाना असून तो भारतातील पहिला कारखाना आहे.

●पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही संशोधन संस्था असून पंडित नेहरूंनी त्याचे भूमिपूजन केले होते.

●जुन्नर तालुक्यामध्ये आर्वी या ठिकाणी भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र अर्थात रडार यंत्रणा आहे.

●राजगुरुनगर तालुका खेड या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे कांदा लसून संशोधन केंद्र आहे.

●पुणे विद्यापीठ परिसरात आयुका ही अवकाश संशोधन करणारी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी सुरु केलेली संस्था आहे.

●शिरूर तालुक्यात पाबळ याठिकाणी सुप्रसिद्ध विज्ञान आश्रम आहे.

●वढू याठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे.

●जुन्नर तालुक्यात आळे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले त्या रेड्याची समाधी आहे.

●कात्रज या ठिकाणी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालय आहे.

●बालेवाडी या ठिकाणी महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी असून या ठिकाणी राष्ट्रीय खेळ संपन्न झाले होते.

●सासवड या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची समाधी आहे.

●पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड हा किल्ला आहे.

●पुणे जिल्ह्यात अनेक इतिहास प्रसिद्ध किल्ले आहेत त्यामध्ये शिवनेरी, सिंहगड,राजगड, पुरंदर,चाकणचा संग्रामदुर्ग,जीवधन, चावंड,हडसर, नारायणगड,लोहगड, विसापूर,राजमाची हे किल्ले प्रसिद्ध आहेत.

●पुरंदर या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. त्याच प्रमाणे दिलेरखानाशी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणारा मुरारबाजी यांची समाधी आहे.

●हवेली तालुक्यामध्ये कोंढाणा अर्थात सिंहगड हा किल्ला आहे. याच किल्ल्यावर सन 1670 मध्ये मोगलांचा सेनापती उदेभान व स्वराज्याचे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्यात घनघोर युद्ध झाले. या युद्धात सुभेदार तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. अतिशय इतिहासप्रसिद्ध किल्ला म्हणून सिंहगड प्रसिद्ध आहे.

●पुणे शहरामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांनी बांधून घेतलेला लाल महाल आहे.

●वानवडी याठिकाणी महादजी शिंदे यांची समाधी आहे.

●पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे.

●पुणे या ठिकाणी पेशव्यांनी बांधलेला सुप्रसिद्ध शनिवार वाडा आहे त्याच्यासमोर थोरले बाजीराव पेशवे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.

●बारामती हे क-हा नदीच्या काठावर वसलेले प्राचीन नगर असून थोर कवी मोरोपंत यांचे ते वास्तव्याचे ठिकाण होते. त्याच प्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व भारत देशाचे संरक्षण मंत्री शरद पवार यांचे त्याठिकाणी जवळच काटेवाडी हे गाव आहे. बारामती चा परिसर औद्योगिक व शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध परिसर आहे.

●पुणे येथे लोहगाव या ठिकाणी विमानतळ आहे.

Pune District Information in Marathi

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment