पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध Pandit Jawaharlal Nehru Marathi Nibandh

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध Pandit Jawaharlal Nehru Marathi Nibandh

मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध Pandit Jawaharlal Nehru Marathi Nibandh या विषयावर निबंध वाचणार आहोत.

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध Pandit Jawaharlal Nehru Marathi Nibandh

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल सर्वच भारतीयांना आदरआहे. त्यांचा जन्मदिन १४ नोव्हेंबर हा भारतामध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो. १४ नोव्हेंबर १८८९, रोजी पंडित नेहरूंचा उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे जन्म झाला.

त्यांचे घराणे काश्मिरी पंडितांचे होते. मोतीलाल नेहरु हे त्यांच्या वडिलांचे नाव. त्यांनी आपल्या मुलाला इंग्रजी शिक्षण भाषा शिकविणारे शिक्षक नेमले. त्यांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातले. ब्रिटनमध्ये हॅरो येथे त्यांना शिक्षणासाठी पाठवले. तेथे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते भारतात परत आले. पण तेथील जीवनाचा अणि मूल्यांचा त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. जेव्हा त्यांना सत्ता मिळाली,तेव्हा तेथील नितीचा स्वीकार त्यांनी केला.

माझा आवडता नेता लालबहादूर शास्त्री Maza Avadata Neta Nibandh

राजकीय क्षेत्रात कार्य :१९१९ साली उत्तर प्रदेश काँग्रेसतर्फे चालविल्या जाणाऱ्या इंडिपेंडेंट या मुखपत्राचे संपादन करण्यात त्यांनी मदत केली. रौलेक्ट बिलाविरुध्द चाललेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. त्यावेळी भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधी करीत होते.महात्मा गांधीच्या सत्याग्रह,अहिंसा,स्वदेशी, असहकार आंदोलन याचा फोर मोठा परिणाम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मनावर झाला. उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनातही त्यांनी भाग घेतला. ते स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते होते.

पंडित जवाहरलाल नेहरू

असहकार आंदोलनात भाग घेतल्यामुळे जवाहरलालजींना तुरुंगवास भोगावा लागला होता.१९२४ मध्ये उत्तर प्रदेश म्युनिसपल काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. आपल्या उत्तम चारित्र्याने आणि प्रामाणिकपणामुळे त्यांनी उत्तरप्रदेशाच्या म्युनिसिपाल्टीत उत्तम कार्य केले. १९२६ ते २७ वर्ष ते पत्नी कमला व मुलगी इंदिरा यांना घेऊन युरोपला गेले. तेथील राजकीय कार्यकर्ते व चळवळी यांच्याशी त्यांचा संपर्क आला.

युरोपात जे पाहिले, ऐकले आणि वाचले, ते सिध्दान्त भारताला कसे लागू पडतील आणि अनुकूल ठरतील याचा विचार त्यांनी सुरु केला. युरोप खंडातील देश जसे स्वतंत्र विचारांची पुरस्कर्ते आहेत आणि सार्वभौम आहेत त्याप्रमाणे आपला देश स्वतंत्र आणि सार्वभौम असावा असे पंडितजींना वाटू लागले.

पंडितजींच्या मनात देशप्रेम प्रखर होते. ब्रिटिशांनी भारतावरील सत्ता दूर करुन, ब्रिटिशांची गुलामगिरी नष्ट करून भारत स्वतंत्र कसा होईल याचा ते अहोरात्र विचार करीत.ते समाजवादी आणि लोकशाहीवादी विचारांचे पुरस्कर्ते होते. शेतीत अथवा कारखान्यात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला निश्चित वेतन मिळाले पाहिजे आणि त्यांचे कामाचे तास निश्चित झाले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता.

काँग्रेसमध्ये आर्थिक प्रश्नांवर जागृती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले.१९३० सालच्या गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. ब्रिटिश सरकारने त्यांना पकडले आणि उत्तरप्रदेशातील नैनी तुरुंगात (६महिन्यासाठी) पाठविले. तुरुंगात असतांना त्यांनी इंदिरेस पत्र लिहिली ती इंदिरेस पत्रे या नावे प्रसिध्द आहेत. त्यातील मुख्य विषय होता, मानवाचा इतिहास.

१९३६ साली त्यांची पत्नी कमला हिचे निधन झाले. त्यानंतर नेहरूचे आत्मचरित्र प्रसिध्द झाले. १९३६ साली काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. भारताचा सर्वांगिण विकास होण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय योजनेची कल्पना मांडली. त्यात सर्वअर्थव्यवस्था ही मानवी कल्याणशी जोडली गेली. असहकार आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना पुन्हा १९४२ ते ४५ या काळात तुरुंगात जावे लागले. तेव्हा त्यांना अहमदनगरच्या तुरुंगात ठेवले होते. तेथे त्यांनी Discovery of India (भारताचा शोध) हे पुस्तक लिहिले. ते पुस्तक म्हणजे भारताचा सांस्कृतिक इतिहास आहे.

१९४५ साली दुसरे महायुध्द संपले. पंडितजीचा कारावासही संपला. भारत स्वतंत्र व्हावा हे त्यांचे ध्येय होते. मोहम्मद अली जिना यांच्या दुराग्रहामुळे भारताची फाळणी झालीआणि १५ ऑगस्ट १९४७ लाभारत स्वतंत्र झाला. भारत आणि पाकिस्तान असे दोन देश जगाच्या नकाशावर आले.स्वतंत्र भारताचे नेहरु पहिले पंतप्रधान झाले.स्वतंत्र भारताच्या भौतिक विकासाला प्राधान्य देत असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.

भारताची नवीन राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली त्या घटनेनुसार 1950 मध्ये निवडणुका झाल्या. त्यामध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले आणि पंडित नेहरू पुन्हा देशाचे लोकशाही मार्गाने पंतप्रधान झाले पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये विरोधी पक्षांचे नेते सुद्धा मंत्री म्हणून कार्यरत होते.पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीन बरोबर पंचशील करार केला. मात्र पुढे चीनच्या नेत्यांनी या कराराला हरताळ फासत हिंदी चिनी भाई भाई असे म्हणत भारतावर आक्रमण केले. या युद्धामध्ये भारताचा दारुण पराभव झाला. या आक्रमणामुळे पंडितजी व्यथित झाले आणि त्यांच्या मनाला ही गोष्ट लागल्यामुळे त्यातच पुढे २७ मे १९६४ मध्ये त्यांचे निधन झाले.

पंडित नेहरूंच्या विचाराला व्यापक वाचन आणि सखोल चिंतन याचा आधार होता. त्यांनी तयार केलेल्या धोरणांना नितीचा आधार होता. ते एक स्वप्नद्रष्टे होते. एकता, लोकशाही नागरिक स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक व आंतरराष्ट्रीय दृष्टी आणि समाजवादाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेल्या योजना, हे त्यांचे विशेष होते. त्यांनी भारतीला एक समृध्द आणि अनेक पैलू असलेली सामाजिक नित्तिमत्ता दिली. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी ठरतील.

घोषवाक्य – आराम हराम है।

निसर्ग आपला शिक्षक निबंध Nisarg Apala Shikshak Nibandh

इंटरनेटचे महत्त्व Internet’s vital importance

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध Pandit Jawaharlal Nehru Marathi Nibandh हा निबंध आपल्याला कसा वाटला. याबाबत निश्चितच प्रतिक्रिया आपण खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा.धन्यवाद !

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment