निसर्ग मानवाचा मित्र निबंध Nisarg Manvacha Mitra

निसर्ग मानवाचा मित्र निबंध Nisarg Manvacha Mitra

निसर्ग मानवाचा मित्र निबंध Nisarg Manvacha Mitra या विषयावर आपण या ठिकाणी सुंदराचा निबंध पाहणार आहोत

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे,पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सूखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत.”असे संत तुकारामांनी आपल्या कधीही भंग न पाहणाऱ्या अभंगवाणीमधून सांगून ठेवले आहे. हे निसर्गाचे मानवावर मित्र म्हणून असणाऱ्या प्रेमाचे द्योतक म्हणावे लागेल. इतका निसर्ग मानवाचा जवळचा मित्र( Nisarg Manvacha Mitra) आहे.

मानवाला सुखी, संपन्न, कृतार्थ जीवन जगण्याचा मार्ग प्रशस्त करून देणारा निसर्ग हा मानवाचा सर्वश्रेष्ठ मित्र आहे.निसर्ग हा मानवाचा पिता आणि मित्र अशा दोन्ही भूमिकेमध्ये नेहमीच दिसून येतो. पृथ्वीवरील सर्व जिवांचा जन्मदाता निसर्गच आहे.जरी भूकंप, वादळे, महापूर,ज्वालामुखी अशा नाना संकटांनी निसर्गाचा सजीवांना त्रास होत असला तरी निसर्गाची नैसर्गिक आपत्ती निर्माण करून समतोल साधण्याची प्रवृत्ती यामागे दिसून येते. ही प्रवृत्ती एक प्रकारची नैसर्गिक प्रक्रियाच आहे. असे असले तरी निसर्ग हा मानवाचा एक अतिशय जवळचा शक्तिशाली आणि उदार मित्र Nisarg Manvacha Mitra म्हणावा लागेल.

लाखो वर्षांपूर्वी जेव्हा मानव पृथ्वीवर उत्क्रांतीच्या टप्प्यातून तयार झाला तेव्हा तो निसर्गातच आपला अधिवास करत असे. पुढे पुढे अग्नीचा शोध चाकाचा शोध लागला.त्याचप्रमाणे मानवाला वस्ती करून राहण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे छोट्या छोट्या वसाहती करून मानव राहू लागला.असे असले तरी मानवाला त्याही काळात निसर्गावर पूर्णतः अवलंबून राहावे लागत होते. निसर्ग हा त्याचा अन्नदाता आणि रक्षक होता. हानी निसर्ग मानवाचा अतिशय जवळचा सोबती आहे.

हे विश्वची माझे घर निबंध Essay on He Vishwachi Maze Ghar

फार प्राचीन काळी ज्याप्रमाणे मानव निसर्गावर पूर्णतः अवलंबून होता. त्याप्रमाणे आजही माणूस निसर्गावरच अवलंबून आहे. असे असले तरी मानवाने निसर्गाच्या कार्यामध्ये दखल घेण्याइतके लुडबुड केल्यामुळे निसर्गाचे रौद्ररूप माणसाला पुन्हा जागेवर आणत असते. एखाद्या मित्राप्रमाणे निसर्ग माणसाला मदत करतो आणि माणसाच्या चुकीच्या उद्योगाकडे कानाडोळा न करता तो मित्राप्रमाणे त्याच्यावर रागावतो सुद्धा. असे म्हणता येईल.

सजीवांच्या जीवनासाठी हिरवी संपत्ती अतिशय महत्वाची असते. हिरवी संपत्ती म्हणजेच निसर्ग माणसाची भूक भागवतो. त्याचप्रमाणे जिभेचे लाडही पुरवतो.तिखट मिरची,आंबट चिंच, लिंबू,कैरी, रसाळ गोड आंबा,तुरट चवीचा आवळा आणि कडू चवीचा कडुनिंब हे सहा रस हे निसर्गाच्या मैत्रीमुळेच मानवाला चाखायला मिळतात. ही निसर्गाची आपल्यावर म्हणजेच मानवावर असणारी मैत्रीची खूणच म्हणायला पाहिजे.

माणसाला घर बांधायचे असले तरी निसर्गातल्या कितीतरी गोष्टी उपयोगी पडतात. वाळू,सिमेंट,विटा,दगड, लाकूड, लोखंड,पाणी ही निसर्गाचीच वेगवेगळी रूपे आहेत.त्यामुळे माणसाला स्वतःचे घर अगदी पाहिजे तसे बांधता येते आणि त्या घरामध्ये हवे ते त्याला करता येते. घरामुळे माणसाच्या समाधानाचा आणि सुखाचा निर्देशांक उंचावर जातो. निसर्ग रुपी मित्रा शिवाय हे शक्य झाले असते काय?असा माझा प्रश्न आहे आणि याचे उत्तर नाही असेच आहे.

भारतीयांचे आयुर्वेदशास्त्र तर पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. जीवन जगावे कसे तसेच,निरोगी आयुष्य आणि निरामय जीवन जगण्यासाठी आखून दिलेला राजमार्ग म्हणजे आयुर्वेद हा पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून आहे. माणसाच्या सर्दी सारख्या आजारापासून भयानक अशा कर्करोगावरची सर्व औषधे निसर्गाने उपलब्ध करून दिली आहेत. ही औषधे निसर्ग आपल्याला कोणत्याही प्रकारच्या परताव्याशिवाय आणि विनामोबदला देत असतो. इतके काम एका मित्राशी आहे कोणी तरी करेल का?

ताप आला की पुदिना वापरा, सर्दी खोकला झाला की अडुळसा वापरा, तुळस वापरा, उष्णता वाढली की वाळा वापरा, डोक्यासाठी शिकेकाई वापरा, डोके दुखत असेल तर आल्याचा चहा करा आणि प्या, कपडे धुण्यासाठी रिठा वापरा अशा सर्व प्रकारच्या औषधींनी संपन्न असा निसर्ग हा मानवाचा एक प्रकारचा डॉक्टर मित्र आहे असेही म्हणता येईल.

पाणी म्हणजे जीवन. जीवन या शब्दातच पाण्याचे महत्व दडलेले आहे.पाणी ही निसर्ग रूपी मित्राकडून मानव आणि सर्व जीवांना मिळालेली अनमोल अशी भेट आहे. आपल्याला पाण्याची किंमत कळत नसली तरी निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. अर्थात पाण्याचा अपव्यय न करता आपण पाणी वापरले पाहिजे. मित्राने दिलेल्या देणगीचा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर आपल्याला निश्चितच त्याची किंमतही मोजावी लागते. आपल्याला दुष्काळामध्ये पाण्याचे महत्त्व विशेष करून जाणवते. नाहीतर पाणी मिळाले नाही की डोळ्यात पाणी उभे राहते. निसर्ग हा पाण्यासारखे अजब रसायन मानवासाठी सहज उपलब्ध करून देतो. आणि मानवाचे जीवन सुखी आणि समृद्ध होते.पाणी नसते तर शेती चांगल्याप्रकारे पिकली नसती आणि माणसाच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होणे अवघड झाले असते. त्यामुळे माणसाचा अन्नदाता मित्र, निसर्ग मानवावर अनंत प्रकारे विविध वस्तूंची मुक्त उधळण करत असतो.

पृथ्वी, पाणी,आकाश, तेज,वायू ही निसर्गाची पंचमहाभूते आहेत महाशक्तिमान आणि प्रचंड ऊर्जेने भरलेली आहेत. या पाचही महाभूतांचा वापर माणसासाठी अतिशय सुंदर पद्धतीने होऊ शकतो किंवा होत आहे. माणसाचे सर्व जीवन याच पाचही पंचमहाभूतांच्या आधाराने निर्वेधपणे चाललेले असते. ही पंचमहाभूते म्हणजे निसर्गाची पाच प्रकारे अवतीर्ण झालेली रुपेच आहेत. मानवाने मात्र कृतघ्न न होता या पाच निसर्ग रूपांचे पावित्र्य ठेवणे आवश्यक आहे. आधुनिक काळामध्ये जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण, भू प्रदूषण, आकाश प्रदूषण यामुळे मानवाने स्वतःबरोबर इतर सजीव सृष्टीसाठी फार मोठा धोका निर्माण केला आहे. असे खेदाने म्हणावे लागते. याला मानवाचा अति लोभ कारण आहे.

पंचमहाभूते

निसर्ग हा मानवाचा सर्वश्रेष्ठ आणि सर्वकाळ माणसाबरोबर राहणारा मित्र आहे. मात्र मानवाने कृतघ्नपणा सोडला नाही तर हा मित्र त्याचा भयानक शत्रूसुद्धा होऊ शकतो. म्हणून निसर्गाचे केवळ लचके न तोडता त्याच्या ऋणातून मानवाने उतराई होण्यासाठी निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करणे अतिशय गरजेचे आहे. निसर्गाचे मानवा बरोबर असलेले संबंध हे मित्रत्वाचे असल्याने मानवाने ही निसर्गाशी आपले संबंध हे मित्रत्वाचे ठेवणे क्रमप्राप्त आणि मानवतेला शोभणारे आहे.

निसर्ग मानवाचा मित्र Nisarg Manvacha Mitra. हा निबंध आपल्याला कसा वाटला हे खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा. खालील काही निबंध आपल्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील.

प्रदूषण एक गंभीर समस्या Pradushan Ek Gambhir Samasya

राष्ट्रीय विज्ञान दिन वर निबंध 28 February National Science Day

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे निबंध Essay on Vrikshavalli amha soyari vanachare

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment