राष्ट्रीय विज्ञान दिन वर निबंध 28 February National Science Day

भारत देशामध्ये 1987 पासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन National Science day म्हणून साजरा केला जातो. 1987 यावर्षी प्रसिद्ध शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते. त्यांनी भारतभर एक वैज्ञानिक वातावरण तयार व्हावे यासाठी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी प्रयत्न केले.

27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन 27 February Marathi Bhasha Gaurav Din

28 फेब्रुवारी 1928 या दिवशी डॉक्टर सी. व्ही. रामन यांनी आपला शोध निबंध रामन परिणाम जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकाकडे छापण्यासाठी पाठवला होता. पुढे त्यांना 1930 साली भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी 28 फेब्रुवारी हा दिवस या घटनेच्या स्मरणार्थ ठरविण्यात आला आहे.

राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होऊ लागल्यापासून त्यानिमित्ताने अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशभर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करणाऱ्या संस्थांनी व्यक्तीने विज्ञान पुरस्कार या निमित्ताने दिला जातो. यानिमित्ताने विज्ञान प्रदर्शन भरविणे व्याख्याने आयोजित करणे रेडिओवर मालिका चालवून लोकांपर्यंत सोप्या भाषेत विज्ञान पोहोचवणे, दूरदर्शनवरील विविध वाहिन्यांच्या माध्यमातून विज्ञान विषयक कार्यक्रम प्रसारित करणे, विज्ञानावरील पुस्तके छापणे, प्रकाशित करणे, विविध खगोलीय घटनांच्या निमित्ताने लोकांना खगोलशास्त्राकडे आकर्षित करणे, विज्ञानावरची मासिक चालवणे, निबंध स्पर्धा आयोजित करणे इत्यादी कार्यक्रमांची भारतभर रेलचेल असते.

५ सप्टेंबर शिक्षक दिन भाषणे Speeches on Teachers’ Day in Marathi

या दिवशी सर्व शाळा महाविद्यालय विद्यापीठ या ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन करून विज्ञान विषयक वातावरण निर्माण केले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे,वैज्ञानिक मूल्ये रुजवणे यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी डॉक्टर सी. व्ही. रामन यांच्या कार्याची आठवण संपूर्ण भारतभर ठेवून त्यांना आदरांजली वाहिली जाते. डॉक्टर सी व्ही रामन यांनी भारत पारतंत्र्यात असतानासुद्धा विज्ञान विषयक जी कामगिरी करून दाखवली आहे हे खूप महत्त्वाचे आहे.

राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी विविध प्रकारच्या विज्ञान संस्था सर्वांसाठी पाहण्यासाठी खुले असतात या ठिकाणी नागरिकांनी आपल्या मुलांना शालेय विद्यार्थ्यांना अवश्य घेऊन जावे. त्यामुळे विविध प्रकारचे विज्ञानविषयक संशोधन कार्य कसे चालते, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना मिळेल. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या प्रदर्शन ठिकाणीसुद्धा विद्यार्थ्यांना भेट दिली तर त्यांच्या विज्ञानविषयक संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यास त्यांना सोपे जाईल.

विज्ञान हे आधुनिक युगातील फार मोठे आणि महत्त्वाचे साधन आहे.विज्ञानाने माणसाच्या आयुष्यामध्ये फार मोठी क्रांती घडवून आणली आहे. विज्ञान विषयक दृष्टीकोन बाळगणे हे प्रत्येक जागृक नागरिकाचे कर्तव्य आहे.त्याच वेळी अध्यात्मिक आणि धार्मिक प्रवाह यांचा अनादर न करता विज्ञान विषयक मूल्यांची जोपासना करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment