भारताचे राष्ट्रीय फूल कमळ National flower of India

भारताचे राष्ट्रीय फूल कमळ National flower of India

National-flower-of-India

भारताचे राष्ट्रीय फूल कमळ National flower of India

भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?

प्रत्येक देशाची काही राष्ट्रीय प्रतीके असतात. आपल्या भारत देशाची सुद्धा काही राष्ट्रीय प्रतीके आहेत.उदाहरणार्थ जनगणमन हे आपले राष्ट्रगीत आहे.त्याचप्रमाणे वंदे मातरम हे आपले राष्ट्रीय गीत आहे. राष्ट्रीय फळ आंबा,राष्ट्रीय प्राणी वाघ,राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय वृक्ष वड अशी काही आपल्या देशाची राष्ट्रीय प्रतीके आहेत. यापैकी आपण राष्ट्रीय फूल कमळ याची माहिती या लेखात पाहणार आहोत.

कमळ फुल पाहिले की प्रत्येकाला हवेहवेसे वाटते. कमळ हे फूल सहसा इतर फुलांप्रमाणे सर्व यांना पाहायला किंवा वापरायला मिळत नाही. परंतु कमळ फुलाची काही याची वैशिष्ट्ये आहे की ज्यामुळे कमळ भारताचे राष्ट्रीय प्रतीक बनले.

कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे.कमळ ही एक जलवनस्पती आहे. या वनस्पतीची फुले सुगंधी असतात. कमळाची फुले एकेकटी मोठी आकर्षक व लांब देठाची असतात. फुलांमध्ये श्वेत कमल व नीलकमल अशा दोन जाती आहेत.

कमळ ही वनस्पती भारताबरोबरच व्हिएतनाम देशाचे सुद्धा राष्ट्रीय प्रतीक आहे.

कमळ ही एक जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा असे आहे.इंग्रजीत कमळाला इंडियन लोटस असे म्हणतात.सिक्रेड लोटस असा शब्द सुद्धा आढळतो.

इको फ्रेंडली गणेशोत्सव

कमळ हे सामान्यतः गोड्या आणि व उथळ पाण्यामध्ये वाढलेले दिसून येते. कमळाचा वेल जाड असतो. पाने मात्र पसरट आणि तेलकट असतात. कमळाच्या पसरट पानांमुळे कमळाचे सौंदर्य अधिकच वाढते.ते अतिशय खुलून दिसते.

लाल रंगाचे कमल पुष्प सर्वत्र आढळते. भारतामध्ये हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत कमळ पुष्प आढळते. मार्च महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत कमल पुष्पांचा मोसम असतो. कामाला शेन जाण्यासारखी टपोरी बीजे येतात.त्याला कमळगठ्ठा असे म्हणतात.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे निबंध

कामाच्या बियांचा उपयोग करून माळा तयार केल्या जातात. या माळा हिंदू धर्मीय लोक जपमाळ म्हणून वापरतात. कमळाच्या वनस्पतीचे सर्व भाग आयुर्वेदाची औषधे बनवण्यासाठी वैद्य वापरतात. त्याच प्रमाणे या वनस्पतीचा भाजी म्हणूनही उपयोग केला जातो.

कमळाचा देठ सोलून त्याची भाजी बनवून खाल्ली जाते. कमळाच्या या देठाला कमल काकडी असे ही म्हटले जाते. कमल काकडीची बाजारात फार मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने शेतकरी आता कमळाची शेती करू लागले आहेत.

भारतामध्ये कमळाचे धार्मिक महत्त्व फार मोठ्या प्रमाणावर प्राचीन काळापासून आहे. त्यामुळे कमळाच्या फुलांना फार मोठी मागणी असते पूजेचे साहित्य म्हणून कमळाचे फूल लोकांना हवे असते.

कमळात औषधी गुणधर्म आढळतात. कमळाचा मध गुणकारी असतो. भारतीय शिल्पकला व चित्रकलेत कमळाला खूप महत्त्व आहे. भारतात उगम पावलेल्या सर्व धर्मांमध्ये कमळाला महत्त्व दिले आहे.

भारतातील संस्कृत व इतर भाषेतील ग्रंथांमध्येही कमळाला अतुलनीय महत्त्व आहे देवी लक्ष्मी माता कमळावर बसलेली आहे त्यामुळे तिला कमलजा असेही म्हणतात. कमलजा मातेची मंदिरे महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात.

भगवान विष्णूच्या हातात कमलपुष्प असल्याने त्याला पद्माकर, कमलाकर अशी नावे आहेत. लक्ष्मी मातेचे एक नाव कमला असे असल्याने विष्णू देवाचे नाव कमलाकांत असे पडले आहे.

कमळाची पाने मोठी व पसरट असतात. शिवाय एक तेलकट थर त्यावर असतो. त्यामुळे ती पाण्यावर तरंगतात आणि तेलकट असल्याने ती सडत नाही की त्यावर पाणी चिकटून राहत नाही. श्रद्धांजल

कमळाला पद्म, पंकज, राजीव, नीरज अशी काही समानार्थी नावे आहेत. माणसाने विशिष्ट पद्धतीने पायावर पाय ठेवले की एक योगासन तयार होते. त्याचा आकार कमलपुष्पाप्रमाणे असल्याने त्याला पद्मासन असेही म्हणतात. पद्मासनालाच कमलासन असेही म्हणतात.

कमळासाठी असलेले बरेच शब्द संस्कृत भाषेतून आले आहेत. पंक म्हणजे चिखल.चिखलात जन्म पावते म्हणून कमळाला पंकज असे म्हणतात. कमल, पद्म,पंकज, पंकजा,राजीव, कमलाकर, पद्माकर, कमला, नीरजा ही विशेषनामे कमळाच्या नावामुळेच ठेवली जातात.

भारतामध्ये पद्म पुरस्कार दिले जातात. पद्म पुरस्कार म्हणजे प्रत्येक पुरस्कारांमध्ये पद्म शब्द आलेला आहे. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण ही नावे पाहिली की कमळाचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.

कमळ आणि कुमुदिनी या दोन वेगवेगळ्या वनस्पती आहेत. दोन्ही जलवनस्पती आहेत. यामध्ये काही सूक्ष्म फरक आहेत.ते लक्षात घेतले तर आपल्याला कमळ कसे असते हे सहज लक्षात येईल.

कृष्ण कमळ आणि ब्रह्मकमळ

कमळ फुला बद्दल सर्वांनाच आकर्षण असते आपण कृष्ण कमळ आणि ब्रह्मकमळ हे शब्द ऐकले असतील. कृष्णकमळ ही एक वेल आहे.ती पाण्यात येत नाही. ती जमिनीत उगवते आणि ब्रह्मकमळ हे तर एक निवडुंगाचा प्रकार आहे ब्रह्मकमळ आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान फुले येतात. ही फुले रात्रीच उमलतात परंतु भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून जे कमळ गणले जाते ते हे कमळ नव्हे.

कृष्ण कमळ आणि ब्रह्मकमळकमळाला ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. योगशास्त्रानुसार माणसाच्या शरीरामध्ये जी सात चक्रे असतात त्या चक्रांना कमळे म्हणून उल्लेख केलेले आहे. कमळ आणि कीटक यांचे नाते फार वेगळे आहे. कमळावर भुंगे नेहमी फिरत असतात. कमळाचा मंद सुगंध त्यांना हवा असतो.कमळाची पाने कोमल असतात. पण कोणताही कीटक ही पाने कुरतडत नाही.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment