राष्ट्रीय पक्षी मोर National bird Peacock

राष्ट्रीय पक्षी मोर Indian National bird Peacock

प्रत्येक देशाला राष्ट्रीय प्रतीके असतात. आपल्या भारत देशाची सुद्धा खूप छान अशी काही राष्ट्रीय प्रतीके आहेत. यापैकी राष्ट्रीय पक्षी मोर याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर सुंदरसे मोराचे पीस पाहिले; की श्रीकृष्णाचे सौंदर्य कसे खुलते हे श्रीकृष्णाच्या प्रतिमेमध्ये आपण पाहिले आहे.

सर्व पक्ष्यांमध्ये मोर हा अतिशय सुंदर असा पक्षी आहे. मोराची सुंदरता, मोराचा रंग आणि त्याच्या आकर्षित करणारा मोहक पिसारा यामुळे अधिकच वाढते. मोर हा पक्षी संपूर्ण भारतात आढळणारा पक्षी आहे.मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात. लांडोर तीन ते पाच अंडी देते. ही अंडी कोंबडीच्या अंड्यांपेक्षा थोडी मोठी असतात. या अंड्यांमधून मोराची पिल्ले बाहेर येतात. मोर हा कुक्कुटवर्गीय पक्षी आहे.
मोर या पक्ष्याबद्दल आपण पुढील मुद्द्यानुसार माहिती घेऊया.

1)मराठी नाव :- मोर, मोराला मयूर असेही म्हणतात मोराच्या मादीला लांडोर म्हणतात.
2)इंग्रजी नाव :- Peacock / peofowl
3)शास्त्रीय नाव:-Pavo critstatus
4)आकार:- नर हा 100 ते 115 सेंटीमीटर, मादी 95 ते 97 सेंटिमीटर असते.
5)रंगरूप:– नर मोराच्या शेपटीभोवती सुंदर रंगीत पिसारा असतो. मादीमध्ये असा पिसारा नसतो. मोराचा पिसारा 90 ते 120 सेंटीमीटरचा असतो. त्यामध्ये सुमारे दोनशेच्या आसपास पिसे असतात. त्यांचा रंग बिरंजी हिरवा असतो. पिसावर असणारा डोळा जांभळट, निळ्या, काळ्या रंगाची हृदयाकृती दिसून येते. काही मोर पांढऱ्या रंगाचे सुद्धा आढळून येतात. मोराचे सौंदर्य हे पंधरा वेगवेगळ्या रंगांपासून बनलेले आहे.
6)चोच:- छोटी, सरळ, शक्तिशाली, कडक असते.
7)आवाज:- म्याऊ म्याऊ असा मोराचा आवाज असतो. मोराच्या आवाजाला केकावली किंवा केकारव असे म्हणतात.
8)खाद्य:- धान्य, कोवळी पाने, किडे, साप,सरडे इ.
9)प्रजनन:- विणीचा हंगाम जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान असतो. झाडाझुडपात मादी तीन ते पाच अंडी घालते पिल्लांना मादी अन्न भरवत नाही. ती स्वतः खातात.
10)अधिवास:– पानगळ, शुष्क जंगलातील झाडावर किंवा जमिनीवर मोर राहतात. दाट अशा पानांच्या वृक्षावर मोरांचे अधिवास असतात.
11)आयुष्यमान:– मोर साधारणता वीस वर्ष पर्यंत जगतात.
मोराची सुंदरता त्याचा खूप सुंदर असा रंग आणि मनमोहक असा पिसारा फुलला की दिसून येते. मोराच्या पाठीवरील पिसारा घेऊन मोर अतिशय डौलदारपणे चालतो. आपली मादी लांडोर व पिल्ले यांना सोबत घेऊन अन्नाच्या शोधात चाललेला मोर पाहणे हे खूप मजेदार दृश्य असते.

खरेतर यामुळेच मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी ठरला आहे. पूर्वीच्या काळी भारतभर भरपूर मोर असत. परंतु आता मोरांची संख्या जंगल तोडीमुळे कमी झाली आहे. असे असले तरी काही ठिकाणी मोरांचे संवर्धन फार काळजीपूर्वक केले जात आहे. पुणे जिल्ह्यातील मोराची चिंचोली याठिकाणी मोराचे संवर्धन केले जाते. शिरूर तालुक्यातील या गावातील लोक मोरांचे अधिवास टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील दिसून येतात.
राष्ट्रीय पक्षी मोर तळ्यामध्ये

एक नर आणि तीन ते पाच माद्यांसमवेत राहताना दिसून येतो. मोर जंगलाशेजारील शेतांमध्ये, वस्त्यांमध्ये अगदी माणसाच्या भीतीचा विचार न करता छानपणे वावरतो. मोर हा पक्षांचा राजा जरी नसला तरी निसर्गाने त्याला बहाल केलेले सौंदर्य एखाद्या सुंदर रुबाबदार राजासारखेच आहे. असे म्हटले तरी वावगे ठरू नये. मोराच्या डोक्यावर सुंदर तुरा दिसून येतो.

काळे काळे ढग जमून येतात. ढगांचा गडगडाट होतो वारे वाहू लागतात. त्यावेळी मोर सुद्धा ते वातावरण पाहून आनंदी होतात. आपला संपूर्ण पिसारा फुलवून तीन नाचू लागतात. मोरांचे हे पिसारा फुलवून केलेले नृत्य पाहूनच,
” नाच रे मोरा, आंब्याच्या बनात,
नाच रे मोरा नाच,”
ही कविता सुचली असावी. हे गाणे आणि लहान मुलांनी त्यावर केलेले बहारदार नृत्य मला खूप आवडते.

पावसाळ्याच्या सुरुवातीला कोकिळेचे कुहू कुहू पावसाचे पडता हो पडता हो आणि मोराचे मियाव मियाव ऐकणे ही एक पर्वणीच असते.
प्रियाआराधनेत मादीला आकर्षित करण्यासाठी निसर्गाने नर मोराला मोहक व सुंदर पिसारा बहाल केलेला आहे. मोराच्या पिसांसाठी अनेक शिकारी लोक मोरांची शिकार करताना दिसून येतात.  मोराच्या पिसांपासुन आकर्षक अशा वस्तू बनवल्या जातात. काही लोक मोरांची शिकार त्यांच्या मांस भक्षणासाठी करतात. परंतु त्यासाठी मोरांना मारणे योग्य नाही. मोरांची अशी शिकार करण्यावर कायद्याने बंदी आहे.खरेतर जंगलातील सर्व प्राण्यांच्या शिकारीवर सरकारने बंदी आणलेली आहे.ही बंदी पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी आवश्यक आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यासाठी पशु पक्ष्यांपासून बनवलेल्या वस्तू आपण घेऊ नयेत. म्हणजे त्या पशु आणि पक्षांचे संरक्षण होण्यास मदत होईल.

मोरांना दाट झाडीत राहणे आवडते. तसेच मोकळ्या मैदानावर अन्न शोधत फिरणे सुद्धा आवडते. जंगलांचे संवर्धन झाले; तर आपोआपच मोरासारख्या सुंदर पक्ष्याचे संवर्धन केल्यासारखे होईल.वाघ, कोल्हा, रानमांजर हे मोराचे नैसर्गिक शत्रू आहेत. वाघ व बिबट्या यासारखे प्राणी शिकारीसाठी बाहेर पडले की मोर विशिष्ट आवाज काढून इतर प्राण्यांना सावध करतात.हिंदू देवदेवतांचे वाहन बनण्याचा मान मोराला मिळाला आहे. भगवान शंकराचा पुत्र कार्तिक स्वामी किंवा कार्तिकेय याचे वाहन मोर आहे. त्यामुळे मोर हिंदूंच्या पुराणकथांमध्ये स्थान मिळालेला पक्षी आहे.

सरस्वती या देवीचे वाहन हंस आणि मोर असे दोन पक्षी आहेत.
महाराष्ट्रातील पैठण आणि येवला या ठिकाणी निर्माण होणारी पैठणी यावर मोराने आढळस्थान निर्माण केले आहे प्रत्येक पैठणीवर मोराचे नक्षीकाम असतेच त्यामुळे ती पैठणी अधिकच खुलून दिसते.
विविध ठिकाणी केलेल्या आकर्षक नक्षी कामामध्ये सुद्धा मोराचे स्थान आवश्यक मानले गेले आहे.

चित्रकारांना मोर या पक्षाबद्दल खूपच आकर्षण दिसून येते. अनेक चित्रकारांची चित्रकारिता मोर या पक्ष्यापासून सुरू झालेली दिसून येते. महाराष्ट्राचा देशी पारंपरिक खेळ लेझीम यामध्ये एक मोर चाल असते ही गोष्ट मोराच्या सुंदर अशा चालण्याचे पद्धतीवरून घेतली आहे.
लहानपणापासून मोराचे चित्र काढणे, मुलांना खूप आवडते. संकल्पचित्र या चित्र प्रकारात मोराचे चित्र अतिशय वैविध्यपूर्ण रीतीने काढलेले आढळून येईल.

अनेक कवींना मोरावर कविता करण्याचा मोह अगदी प्राचीन काळापासून आवरलेला दिसून येत नाही. इतका मोर हा पक्षी लोकप्रिय पक्षी दिसून येतो. मोराइतकी लोकप्रियता इतर कोणत्याही पक्ष्याला लाभल्याचे आपल्याला दिसून येणार नाही.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment