Mother’s Day in Marathi मातृदिनाचे महत्त्व

जागतिक मातृदिन माहिती Mother’s Day In Marathi

Mother's day in Marathi

जगातील सर्व मातांच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभर जागतिक मातृदिन (Mother’s Day in Marathi)साजरा केला जातो. मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची प्रथा अमेरिकेत सुरुवात झाली आणि जगभरातील अनेक देशांमध्ये ती आता चालू झालेली आहे.

मातृदिन 2023

यावर्षीचा मातृदिन 14 मे 2023 रोजी आहे. काही देशांमध्ये ही तारीख वेगळी आहे.परंतु त्या ठिकाणीही ह्याच एकाच उद्देशाने मातृदिन साजरा केला जातो.

मातृदिन कधी असतो?

मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करतात.

भारतीय संस्कृतीमध्ये आईला देवता मानलेले आहे. त्यादृष्टीने मातृदेवो भव ही भारतीय संस्कृतीची ओळख संपूर्ण विश्वात आहे. भारतीय संस्कृतीमध्ये माता ही देवतेसमान असून आईची पूजा ही एखाद्या देवतेप्रमाणे केली जाते. आईला माता, माऊली, जननी, जन्मदात्री इत्यादी शब्द मराठी भाषेमध्ये आहेत आईसाठी असणाऱ्या समानार्थी शब्दांना एक वेगळ्या अशा आशयाची खोली आहे.

Aaji Ajoba Diwas Grandparents Day आजी आजोबा दिवस माहिती

आईचे प्रेम जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानले आहे.भारतीय संस्कृती प्रत्येक स्त्रीकडे आईच्या दृष्टिकोनातून पहावे हे शिकवते. आई ही मायेचा सागर आहे. समुद्राची शाई केली, हिमालयाची लेखणी केली आणि आकाशाचा कागद केला तरी आईची महती वर्णन करणे शक्य होणार नाही असे म्हटले जाते. फुलात फूल जाईचे आणि जगात प्रेम आईचे हे तर अगदी प्रसिद्ध वाक्य आहे. परमेश्वराने जणू काही आपल्या मुलांच्या उत्तम संगोपनासाठी आणि प्रेमाची शिकवण देण्यासाठी आईला या जगामध्ये पाठवून दिले आहे. असे म्हटले जाते की आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर इतकी आई या शब्दाची थोरवी भारतीय संस्कृतीने गायली आहे.

जागतिक मातृदिनाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

मातृदिन का साजरा केला जातो?

मध्ययुगीन काळामध्ये जे लोक आपल्या घरापासून काही निमित्ताने बाहेर गेलेले असतात. त्यांनी मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी आपल्या प्रांतात जाऊन आपल्या आईला भेटण्याची प्रथा सुरू केली. त्या दृष्टीने मे महिन्यातील हा दिवस आईला सन्मान देण्याचा दिवस आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फियाच्या अॅना जार्विस Anna Jarvis यांच्या आईने स्त्रियांचे आरोग्य आणि परस्परांमधील मैत्री वाढवण्यासाठी महिला गटांचे आयोजन केले होते. यामध्येच मातृदिनाच्या उगमाचे मूळ आहे. अॅना जार्विस यांच्या आईच्या मृत्यूनंतर तिने आपल्या आईच्या स्मरणार्थ मातृदिन सुरू केला. पुढे लवकरच बाजूच्या जवळ जवळ पाच राज्यांमध्ये ही प्रथा प्रसार पावली आणि मातृदिन सुरू झाला.

मातृदिन कसा साजरा केला जातो?

सन 1914 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मातृदिनासाठी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली.मातृदिनाच्या दिवशी सामान्यपणे आईला भेटकार्ड आणि भेटवस्तू देऊन तिचा आशीर्वाद घेण्याची प्रथा सुरू झालेली आहे. भारतातही आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये मातृदिन पश्चिमेकडून आला आणि जोरदारपणे सुरू झाला असे म्हणावे लागते. कारण अमेरिकेसारख्या पश्चिमात्य देशांमध्ये ज्याप्रमाणे आईच्या सन्मानार्थ मातृदिन साजरा केला जातो तशी आधुनिक पद्धत भारतात नव्हती.

मातृदिनाचे महत्त्व (Mother’s Day in Marathi)

भारतामध्ये वेगवेगळ्या माध्यमांतून सण आणि उत्सवातून आईचा आशीर्वाद घेणे तिला सन्मान देणे हे मात्र प्राचीन काळापासूनच सुरू आहे.एखाद्या बाळाला नऊ महिने पोटामध्ये ठेवणे आणि त्यानंतर जन्म देणे ही काही सामान्य गोष्ट नाही. केवळ जन्मच नाही तर पुढे उत्तम पालनपोषण करून संस्कार देऊन त्या मुलाला चांगले उत्तम प्रतीचे शिक्षण देऊन आई आपल्या मुलाला केवळ देहच देत नाही तर सुंदर असे मनही देत असते.

जगभरातील हजारो कवींनी आईचे महत्व आपल्या सुंदर अशा काव्यमय शब्दांतून वर्णन करून ठेवले आहे.21 वे शतकामध्ये मातृदिनाचे महत्त्व तर अधिकच स्पष्टपणे जाणवते. कारण आजच्या आधुनिक काळामध्ये आई-वडिलांचे प्रेम मिळणे ही गोष्ट कठीण होऊ लागली आहे. आई-वडिलांनी प्रेम देऊन वाढवलेली मुले पुढे त्याच आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून देतात; तेव्हा त्यांच्या जीवाला किती यातना होत असतील याची कल्पनाही आपण करू शकत नाही.

आईने दिलेला प्रेमाचा वसा आणि ममतेचा वारसा मुलांनी विसरला तर संपूर्ण जगाची प्रचंड मोठी सांस्कृतिक हानी होईल या दृष्टीने मात्र दिनाच्या दिवशी आईचे थोर उपकार आठवून आपल्या आईकडे जावे.आईला काय पाहिजे असेल ते विचारावे. तिला काय आवडते ते तिला द्यावे. प्रेमाने बोलावे. सुसंवाद ठेवावा आणि आईचे आशीर्वाद घ्यावेत. आपल्या मुलांनी आईकडे पुन्हा यावे आणि आपल्या मातेच्या माया ममतेच्या सागरामध्ये स्वतःला लावून घ्यावे आईला अभिमान वाटेल असे काहीतरी आपल्या हातून घडावे यासाठी काहीचे आशीर्वाद हे जगातील सर्वश्रेष्ठ असे आशीर्वाद असतात.

मातृदिनMother’s Day In Marathi हा प्रत्येक घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये साजरा होण्याची गरज आहे. या दिवशी सार्वजनिकरित्याही संपूर्ण गावातील मातांना बोलावून त्यांचा गौरव केला जावा. जगातील प्रसिद्ध अशा पौराणिक, ऐतिहासिक कर्तृत्ववान मातांना आठवावे, त्यांचे कार्य आठवावे, त्यांचा गुणगौरव करावा आणि सध्या असलेल्या मातांनाही ते स्थान आपापल्या परीने प्रत्येक मुला मुलीने द्यावे; हेच त्या दिवशीचे येथे प्रत्येक मुला-मुलीचे कर्तव्य आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment