माझी वसुंधरा माझी जबाबदारी निबंध Mazi Vasudhara Mazi Jababdari

माझी वसुंधरा माझी जबाबदारी निबंध Mazi Vasundhara Mazi Jababdari

माझी वसुंधरा माझी जबाबदारी निबंध Mazi Vasundhara Mazi Jababdari

आपण ज्या पृथ्वीवर जन्माला आलो त्या पृथ्वीला आपण आपली माता मानतो. तिला भुमाता असे म्हणतो.पृथ्वीला वसुधा, वसुंधरा, भूमी, जमीन, मेदिनी, धरणी, धरती, धरित्री अशी विविध नावे मराठी भाषेत आढळतात. मला यामध्ये पृथ्वीचे वसुंधरा हे नाव खूप आवडते.

पृथ्वी म्हणजे वसुंधरा, माझी माता आहे आणि मी तिचे लेकरू आहे. हा सहसंबंध म्हणजे एक प्रेमाचा भावनिक धागा आहे ज्या ठिकाणी अपत्य प्रेमाला आणि मातृप्रेमाला प्रचंड मोठी जागा आहे. पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये मानव हा सर्वात बुद्धिमान आणि विवेकी प्राणी आहे. त्यामुळे पृथ्वीच्या संरक्षणाची जबाबदारी एक बुद्धीशील प्राणी म्हणून माणसावर येऊन पडली आहे. “माझी वसुंधरा ही माझी जबाबदारी आहे” ही भावना प्रत्येक मनुष्याची झाली पाहिजे; हाच याचा मतितार्थ होय.

ग्लोबल वार्मिंग

जसे आपण आपल्या आईला आपले म्हणत राहतो; त्याप्रमाणे पृथ्वीलाही आपण आपले म्हटले पाहिजे. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाला वेगवेगळ्या मार्गाने मोठे करण्यात प्रेमपूर्वक गुंतलेली असते;त्याप्रमाणे वसुंधरा माता तिच्या प्रत्येक अपत्यासाठी अतिशय प्रेमपुर्वक योगदान देत असते. पृथ्वी माता जर माणूस आणि सर्व प्राण्यासाठी योगदान देत असेल तर आपणही आपले योगदान देणे गरजेचे आहे.

आज पृथ्वीवर असणाऱ्या सर्व प्राण्यांना पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास ही आजची ज्वलंत समस्या आहे. हा विषय फक्त पर्यावरणवाद्यांचा नसून प्रत्येक व्यक्तीचा आहे कारण पृथ्वी सर्वांचीच आहे. पर्यावरणाच संरक्षण करणे मे आणि संवर्धन करणे; ही प्रत्येक व्यक्तीची न टाळता येण्यासारखे जबाबदारी आहे हे ध्यानात घेतले पाहिजे.

निसर्ग मानवाचा मित्र निबंध Nisarg Manvacha Mitra

जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीला फार मोठा धोका निर्माण झाला असून या विषयाकडे युद्ध पातळीवर गांभीर्याने लक्ष देऊन समस्येचे निराकरण होणे गरजेचे आहे. तापमान वाढीमुळे अंटार्टिका वरील बर्फ वितळू लागले आहे. वाऱ्यांच्या दिशा बदलू लागली आहे. तापमान वाढीमुळे विविध ठिकाणी दररोज वादळी होत असतात आणि मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी होत असते. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जैविक विस्कळीतपणा येत असतो. पृथ्वीवरील पुढील पिढ्यांना आरोग्यदायी वातावरण, पर्यावरण ठेवायचे असेल तर मानवाने आपला हव्यास कमी केला पाहिजे. पर्यावरण संरक्षण हा मुद्दा प्राधान्याने हाती घेतला पाहिजे.

माझ्या वसुंधरेची जपणूक करण्यासाठी माझी म्हणून काही ती जबाबदारी आहे ती मी कधीही झटकणार नाही. ही पृथ्वी निरंतर सुंदर राहावी म्हणून मी सतत काम करेन. सूर्यमालेमध्ये एकमेव ग्रह पृथ्वी असा आहे की ज्यावर जीवसृष्टी आहे आणि या जीवसृष्टीमध्ये मानव हा सर्वाधिक बुद्धी असलेला प्राणी असल्यामुळे पृथ्वीचे संवर्धन, संरक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे.

पृथ्वीवर वायूप्रदूषण जलप्रदूषण ध्वनि प्रदूषण किरणोत्सार यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आले आहे. मानव आपल्या हव्यासासाठी पृथ्वीचे लचके तोडत आहे की काय असे दृश्य सर्वत्र दिसत आहे. जल प्रदूषणामुळे पाण्यातील जैविक विविधता धोक्यात आली आहे. वायू प्रदूषणामुळे प्रत्येक प्राण्याला मुक्तपणे श्वास घ्यायला पृथ्वीवर जागा राहिली नाही असे खेदाने म्हणावे लागते. कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डाय ऑक्साईड, मिथेन, इथेन या वायूंच्या अतिरिक्त उत्सर्जनाने मोठा अनर्थ पृथ्वीवर वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओझोन थराला पडलेले भगदाड हे त्याचे द्योतक आहे. ध्वनी प्रदूषणामुळे शांततेचा प्रचंड भंग झाला आहे. किरणोत्सर्गामुळे कर्करोगासारखे भयानक रोग होत आहेत. प्रत्येक प्राणी आणि वनस्पती या विविध प्रकारच्या प्रदुषणांचा बळी आहे.

पृथ्वीवर जीवसृष्टी आहे आणि या जीवसृष्टीमध्ये प्रचंड मोठी जैवविविधता काळाच्या ओघात निर्माण झाली आहे. ही जैवविविधता धोक्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी माणूस प्रवेश करून विनाकारण निसर्गामध्ये हस्तक्षेप करत आहे. वैयक्तिक लोभापायी आणि लालसेपोटी असे करणे संपूर्ण वसुंधरेच्या दृष्टीने धोकादायक आहे. जसे माणसाला वाटते की आपण जगावे; तसेच प्रत्येक प्राण्याला वाटत असते. हा विचार माणूस कधी करणार आहे? पृथ्वी ही केवळ माणसाची भोगाची वस्तू नसून संपूर्ण जीवसृष्टीची ती माय माऊली आहे. हे आपण कधी देणार घेणार आहोत? हा प्रश्न मला नेहमीच पडतो.

सूर्य उगवला नाही तर निबंध Surya Ugavala Nahi tar

22 एप्रिल 1992 पासून जागतिक स्तरावर वसुंधरा दिन पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जगामध्ये पृथ्वीवरील वातावरण, पर्यावरण, भूपृष्ट याबाबत अनेक उपक्रम राबवले जातात. विविध उपक्रम, परिषदा, परिसंवाद यामधून पृथ्वीच्या संरक्षणाविषयी जाणीव जागृती होत असते.

पृथ्वीवर चालणारा विध्वंस पाहता हा नाश थांबवा, भूमातेचे तनमन जळते आहे, ही वसुंधरा लोभाच्या आणि प्रदूषणाच्या भाराने जळत. आहे असे म्हणावे वाटते.

पृथ्वी आपल्याला काय देत नाही? आपल्याला शरीर देते; आपल्याला अन्न देते; आपल्याला हवा देते; पाणी देते; ऊर्जा देते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व ती कोणत्याही अपेक्षा न ठेवता देत असते. तिचे हे देणे कधीही संपत नाही. पृथ्वी आपल्याला इतकी देते की आपण तिच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नाही. वसुंधरेची असलेला हा ऋणानुबंध सुंदर नात्यातून प्रकट झालेला आहे.

माझी वसुंधरा ही माझी आता जबाबदारी झाली पाहिजे. वसुंधरेची जपणूक जबाबदारीने करणे ही माझी केवळ शपथ न राहता ती भीष्मप्रतिज्ञा व्हायला पाहिजे. या प्रतिज्ञेचा अखंड जागर जागरुकतेने झाला पाहिजे.

Mazi Vasundhara Mazi Jababdari

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

1 thought on “माझी वसुंधरा माझी जबाबदारी निबंध Mazi Vasudhara Mazi Jababdari”

  1. छान उपक्चाछाउपक्रम, मुलांसाठी तर खूपच छान, आणि मराठीतून असल्यामुळे आणखी छानन

Leave a Comment