माझा शेजार Maza Shejar
माझा शेजार Maza Shejar हा इयत्ता चौकीतील परिसर अभ्यास मधील एक निबंध आहे.
- माझ्या शेजारी एक पाच माणसांचे पंजाबी कुटुंब राहते.
- शेजारच्या कुटुंबातील सर्व माणसे प्रेमळ आहेत.
- माझ्या शेजारील कुटुंब आमच्या गावात पाचवर्षांपूर्वी आमच्या शेजारी राहायला आले.
- माझ्या शेजारच्या लोकांना आमच्या गावामध्येच चांगला कामधंदा मिळाल्यामुळे ते येथेच राहू लागले.
- शेजारील कुटुंब धर्माने हिंदू असल्यामुळे आमचे आणि त्यांचे सण सारखेच असतात.
- आमच्या शेजारच्या कुटुंबाची भाषा पंजाबी आहे
- आमच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील लोक पंजाबी पद्धतीचे कपडे घालतात.
- वैशाख महिन्यामध्ये असणारा बैसाखीचा सण ते मोठ्या आनंदाने साजरा करतात.
- आम्ही त्यांच्या सर्व सणांमध्ये सहभागी होतो आणि ते सुद्धा आमच्या सर्व सणांमध्ये सहभागी होतात.
- आता आम्हाला त्यांची पंजाबी भाषा थोडी थोडी येऊ लागली आहे आणि त्यांनाही मराठी भाषा बोलता येऊ लागली आहे.
- आमच्या शेजारच्या कुटुंबाचे सणवार, खाद्यपदार्थ आणि चालीरीती वेगळ्या असल्या तरीसुद्धा ती फार प्रेमळ माणसे आहेत.
माझा आवडता नेता लालबहादूर शास्त्री Maza Avadata Neta Nibandh