माझा आवडता सण दिवाळी Maza Avadata San Diwali

माझा आवडता सण दिवाळी Maza Avadata San Diwali

दिवाळी हा माझा सर्वांत आवडता सण आहे.( माझा आवडता सण दिवाळी Maza Avadata San Diwali)प्रत्येक वर्षी दिवाळीची मोठी सुट्टी पडली की आम्हा विद्यार्थ्यांना खूप आनंद होतो. आम्ही दिवाळीच्या सुट्टीची वाटच पाहत असतो. दिवाळीमध्ये आम्ही मजेने दिवाळीचा फराळ खाणे, फटाके उडवणे, इकडे तिकडे फिरायला जाणे यातून आम्ही खूप मजा घेत असतो.

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. दिवाळी सणांचा राजा आहे. दिवाळीच्या दिवसात सर्वत्र दिव्यांची आरास केली जाते. दिवे लावले जातात. प्रकाशाची पूजा केली जाते.अंधारावर प्रकाशाचा विजय होतो. दिवा पाहून लक्ष्मी येते आणि सर्वत्र दुःख, दरिद्रता यांचा नाश होतो. म्हणून मला दिवाळी हा सण खूप आवडतो.

दिवाळी

माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध Essay on Shrawan month in Marathi

अश्विन वद्य एकादशी झाली की दुसरा दिवस म्हणजे वसुबारस. या दिवसापासून दिवाळी सुरू होते. अश्विन वद्य द्वादशीला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोरज मुहूर्ताला अर्थातच संध्याकाळच्या वेळेला गाय वासराची पूजा करायची असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय हा अतिशय पूज्य मानलेला प्राणी आहे.

सुवासिनी स्त्रिया उपवास करतात.तळलेले किंवा तव्यावर केलेले पदार्थ या दिवशी खायचे नसतात. गायीचे दूध,दही, तूप, ताक इत्यादी पदार्थ जेवायला असतात. गाय वासराची पूजा करून त्यांना उडदाचे वडे, भात, गोड पदार्थ खाण्यास देण्याची पद्धत आहे. गाय आणि वासराच्या पूजनाने दिवाळीची सुरुवात होते.

गणेशोत्सव निबंध मराठी Essay on Ganeshotsav in Marathi

गाय हा अत्यंत उपयुक्त आणि पवित्र अशा प्राणी आहे. असे म्हणतात की गायीच्या शरीरामध्ये तेहतीस तीस कोटी देव असतात. गाईपासून मिळणारे गोमूत्र, दूध, दही, तूप या वस्तू अतिशय पवित्र आणि आरोग्यदायी असतात. गाईपासून शेतीला बैल मिळतात. त्यामुळे शेती होते. म्हणूनच गाईला लोकमाता मानली गेलेली आहे. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने गाय-वासराची पूजा करण्याची पद्धत रूढ झालेली आहे. भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने गाय आणि वासरू यांची पूजा अधिकच अर्थपूर्ण वाटते.

वसुबारसे नंतरचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी होय. आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. धनतेरस असेसुद्धा म्हटले जाते.या दिवशी यमराजाला प्रसन्न करायचे असते. यासाठी दीपदान करतात. संध्याकाळी पणतीमध्ये तेल घालून ती प्रज्वलित करतात. दक्षिणेकडे तोंड करून ठेवतात. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. यालाच यमदीपदान असेही म्हणतात. आपल्या घरात लक्ष्मी नांदावी, सर्व सुखांचा लाभ व्हावा , घरादारावर मंदिरावर उंच जागी तेलाचे दिवे लावले जातात.

या दिवशी संध्याकाळी भगवान विष्णू, कुबेर, गणेश, नाग व धनद्रव्य यांची पूजा करायची असते. आपल्या संस्कृतीत लक्ष्मीला आई समजून तिला पूजनीय आणि वंदनीय मानले आहे म्हणून या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करावयाची असते.

धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करायचे असते. अर्थातच या दिवशी सगळीकडे दिवे लावायचे असतात.आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार म्हणजे फारच महत्त्व आहे. पणती म्हणजे दिवा. आनंद,उत्साह व प्रसन्नता, मांगल्य, पावित्र्य, दूर्वासनांचा नाश हे सगळं या दिव्यांच्या प्रकाशामुळे होत असते.हे सगळे लक्षात घेऊन हा सण साजरा केला तर आपल्या जीवनातील खरा आनंद आल्याशिवाय राहणार नाही.

अश्विन वद्य चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी होय.या दिवशी दिवाळीमध्ये नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला असल्यामुळे जगावरील एक खूप मोठे संकट दूर झालेले होते. या आनंद उत्सवानिमित्त दीपोत्सव करावयाचा असतो. या दिवशी घरातील सर्वांनी भल्या पहाटे उठून सुगंधी उटणे, तेल लावून, गरम पाण्याने स्नान करायचे असते. नंतर घरातील देवांची मोठ्या थाटात पूजा करायची असते.

देवाला स्नान घालून आपण स्वतः स्नान करून दिवाळीसाठी केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवायचा असतो. सर्वांनी फराळ करायचा असतो. या दिवशी नवीन स्वच्छ कपडे घालायचे. फटाके उडवायचे. खूप मजा असते. अतिशय आनंदात हा दिवस साजरा करायला आपल्याला सर्वांना खूप अशी चांगली संधी या निमित्ताने मिळत असते. नरकासुराचा सारख्या दुर्जनांचा नाश या दिवशी झालेला असल्यामुळे वाईट प्रवृत्ती वर सत्प्रवृत्तीने मिळवलेला विजय या गोष्टीच्या स्मरणार्थ हा दिवस दीप उत्सव अर्थात दिवाळी म्हणून साजरा केला जातो.

यानंतरचा पुढचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस होय. अश्विन आमावस्या हा दिवाळीच्या सणातील अतिशय मुख्य मानलेला दिवस व याच दिवशी लक्ष्मी पूजन करायचे असते. भगवान विष्णूने कुबेर आणि इतर देवांना बळीच्या बंधनातून मुक्त केलेले असल्यामुळे तो क्षीरसागरात जाऊन सुखाने झोपला. त्याची आठवण म्हणून या दिवशी संध्याकाळी सर्वांनी लक्ष्मी पूजन करायचे असते. या दिवशी लक्ष्मीपूजन केल्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी सदैव आनंदात येईल. दुःख ,दारिद्र्य दैन्य यांची आपल्याला बाधा होत नाही अशी एक श्रद्धा आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये सुशोभित केलेल्या ठिकाणी लक्ष्मी, विष्णू, इंद्र,कुबेर यांची पूजा करायची असते. सगळीकडे दिवे लावायचे. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे यांचा लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखवायचा आणि तो प्रसाद सर्वांना वाटायचा असतो. या दिवशी लक्ष्मी आपल्या घरी येणार म्हणून घरातील सर्वांनी रात्री जागरण करावयाचे असते.

मध्यरात्री सुपे व दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला म्हणजेच दारिद्र्याला हाकलून लावायचे. आपल्या घरातील, बोलण्यातील, विचारातील,अशुभ अमंगल गोष्टींना घालवून द्यावयाचे असते आणि लक्ष्मीचा संचार सर्वत्र झाला की आपल्या निवासासाठी योग्य ठिकाणी लक्ष्मी येते.तिथे आनंद आणि शोभा हे पवित्र अशा ठिकाणी लक्ष्मी घरात प्रवेश करते.म्हणून तिच्या स्वागतासाठी आपले घर नीटनेटके, पवित्र, स्वच्छ ठेवायचे असते. लक्ष्मी देवीची मोठ्या प्रेमाने स्वागत करायचे असते.

दिवाळीच्या वेळी घराच्या समोर उंचावर आकाशकंदील लावला जातो. यामध्येही विजेचे दिवे लावण्याची प्रथा आहे. त्यामुळे आकाश कंदील अधिकच सुंदर दिसतो. शाळेमध्ये आकाश कंदील बनवण्याचे उपक्रम सुद्धा यानिमित्ताने शिक्षक घेत असतात.

विविध रंगाच्या पणत्यांची आरास करून सुंदर असा प्रकाशाचा रंगीबिरंगी साज दिवाळीला चढवला जातो. त्यामुळेच लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरी कायमची राहण्यासाठी येते.

दिवाळीच्या दिवसात घरोघर विविध प्रकारचे फराळ केले जातात. लाडू,करंज्या, शंकरपाळे,अनारसे, चिवडा, चकल्या या अशा प्रकारचे देशी पदार्थ अर्थात फराळ हे तर माझ्या खूपच आवडीचे आहेत. आम्हा सर्वच मुलांना हे पदार्थ खूप आवडतात. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा फराळ घरोघर होत असतो.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment