माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध Maza Avadata prani Kutra

माझा आवडता प्राणी कुत्रा, Maza Avadata prani Kutra, १०० शब्दातील निबंध

माझा आवडता प्राणी कुत्रा

कुत्रा माझा सर्वात आवडता प्राणी आहे. कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. कुत्रा प्रामाणिक असतो. त्यामुळे कुत्रा सर्वांना आवडतो. कुत्रा घराची व शेताची एखाद्या पहारेक-याप्रमाणे रखवाली करतो.

कुत्र्याला पोळी भाजी असे शाकाहारी अन्न आवडते. त्याचप्रमाणे दूध भाकरीसुद्धा तो आवडीने खातो. बिस्किटे सुद्धा खातो. मटन मच्छी सुद्धा कुत्र्याला खायला आवडतात.

भारताचे राष्ट्रीय फूल कमळ

कुत्र्याच्या अनेक जाती आहेत.परंतु मला आपल्या भारतातला कुत्रा आवडतो. कुत्र्याच्या ओरडण्याला भुंकणे किंवा भो भो करणे म्हणतात.

कुत्रा हा धोकादायक सुद्धा असतो. पिसाळलेला कुत्रा चावला तर आपल्याला रेबीज नावाचा आजार होतो. त्यासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात.

आमचा मोती कुत्रा खूप हुशार आहे. घराजवळून जाणाऱ्या अनोळखी माणसाला आणि इतर प्राण्यांना तो भुंकून घराजवळ येऊ देत नाही.

माझा आवडता प्राणी कुत्रा, Maza Avadata prani Kutra, २०० शब्दातील निबंध

कुत्रा माझा सर्वात आवडता पाळीव प्राणी आहे. कुत्रा हा उपयोगी असा पाळीव प्राणी आहे. कुत्रा अतिशय प्रामाणिक असतो. त्यामुळे कुत्रा सर्वांना आवडतो. कुत्रा घराची व शेताची एखाद्या पहारेक-याप्रमाणे रखवाली करतो.

कुत्र्याला पोळी भाजी असे शाकाहारी अन्न आवडते. त्याचप्रमाणे दूध भाकरीसुद्धा तो आवडीने खातो. बिस्किटे सुद्धा कुत्र्याला खूप आवडतात. मटन मच्छी सुद्धा कुत्र्याला खायला आवडतात.

माझा आवडता छंद निबंध

कुत्र्याच्या अनेक जाती आहेत. डाॅबरमॅन, जर्मन शेफर्ड बुल डॉग बॉक्सर चाऊ चाऊ अल्सेशियन या कुत्र्याच्या काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय जाती आहेत. भारतामध्ये सुद्धा कुत्रा पाळणे फार फार प्राचीन काळापासून लोकप्रिय छंद आहे.

कुत्र्याच्या ओरडण्याला भुंकणे किंवा भो भो करणे म्हणतात. कुत्र्याचे भुंकणे ऐकून जंगलातील हिंस्र प्राणी घरापासून आपोआपच दूर राहतात. याशिवाय चोरसुद्धा घराकडे सहजासहजी फिरकत नाहीत.

मेंढपाळ लोग कुत्रा अवश्य पाळतात. मेंढ्यांना असणारी लांडगा, वाघ, बिबट्या यापासूनची भीती त्यामुळे कमी होते. कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा कुत्र्याचे संरक्षण करतो.

कुत्रा हा धोकादायक सुद्धा असतो. पिसाळलेला कुत्रा चावला तर आपल्याला रेबीज नावाचा आजार होतो. त्यासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. कुत्र्याचे पिसाळणे हे कुत्र्यासाठी धोकादायक असते.

आमचा मोती कुत्रा खूप हुशार आहे. घराजवळून जाणाऱ्या अनोळखी माणसाला आणि इतर प्राण्यांना तो भुंकून घराजवळ येऊ देत नाही.

कुत्रा हा स्वच्छता ठेवणारा प्राणी आहे.आपल्या शेपटीने तो बसण्याची जागा स्वच्छ करतो. कुत्र्याला स्वच्छता आवडते.

कुत्रा हा इमानदार स्वच्छताप्रिय जागरूक आणि सुंदर प्राणी आहे. त्यामुळे मला तो खूप आवडतो.

माझा आवडता प्राणी कुत्रा, Maza Avadata prani Kutra, ३०० शब्दातील निबंध

माझा आवडता प्राणी कुत्रा

कुत्रा माझा सर्वाधिक आवडता पाळीव प्राणी आहे. कुत्रा हा फार उपयोगी पाळीव प्राणी आहे. अनेक पाळीव प्राणी त्यांच्या उपयोगाप्रमाणे माणूस पाळत असतो. त्यामध्ये गाय, म्हैस, शेळी, गाढव, घोडा, उंट इत्यादी सर्वच प्राणी माणसाला उपयोगी पडतात. पण या सर्वांचे रक्षण पण करण्याची क्षमता कुत्र्यांमध्ये आहे.

कुत्रा हा एक भटका प्राणी आहे. तो सतत भटकत असतो. त्यामुळे त्याला बांधून ठेवले तर तो आक्रमक होतो आणि त्याला पाळणाऱ्या व्यक्तीशी तो अतिशय प्रामाणिकपणे वागतो.

पाळीव प्राणी म्हणून कुत्रा पोळी, भाकरी, दूध, पाव, बिस्किटे असे अन्न खातो. कुत्रा हा मिश्राहारी प्राणी आहे. शाकाहारी यांच्याप्रमाणेच कुत्रा मच्छी, मटन सुद्धा खातो. जंगली कुत्रे सशांसारख्या प्राण्यांना मारून खातात.

कुत्र्याच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी कोळसुंद ही जंगली कुत्र्याची जात आहे.डाॅबरमॅन, जर्मन शेफर्ड, बुल डॉग, बॉक्सर, चाऊ चाऊ, अल्सेशियन या कुत्र्याच्या काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय जाती आहेत. याशिवाय कुत्र्याच्या जगभर अनेक प्रसिद्ध जाती आहेत.

कुत्रा खूप जोरात ओरडतो.कुत्र्याच्या ओरडण्याला भुंकणे किंवा भो भो करणे म्हणतात. कुत्र्याची ओरडणे एक किलो मीटर अंतरापर्यंत जाते.कुत्र्याचे भुंकणे ऐकून जंगलातील हिंस्र प्राणी घरापासून आपोआपच दूर राहतात. याशिवाय चोरसुद्धा घराकडे सहजासहजी फिरकत नाहीत.

मेंढपाळ लोग कुत्रा अवश्य पाळतात. मेंढ्यांना असणारी लांडगा, वाघ, बिबट्या यापासूनची भीती त्यामुळे कमी होते. कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा कुत्र्याचे संरक्षण करतो.

कुत्रा हा धोकादायक सुद्धा असतो. पिसाळलेला कुत्रा चावला तर आपल्याला रेबीज नावाचा आजार होतो. त्यासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. कुत्र्याचे पिसाळणे हे कुत्र्यासाठी धोकादायक असते. मुळे कुत्र्याला हायड्रो फोबिया किंवा रेबीज नावाचा आजार होतो. हा रोग कुत्र्यासाठी जीवघेणा असतो.

प्रयत्नांती परमेश्वर Nothing is impossible

आमचा मोती कुत्रा खूप हुशार आहे. घराजवळून जाणाऱ्या अनोळखी माणसाला आणि इतर प्राण्यांना तो भुंकून घराजवळ येऊ देत नाही. कुत्र्याचे नाक हजारो प्रकारचे वास ओळखू शकते. त्यामुळे पोलीस कुत्र्यांना प्रशिक्षण देऊन गुन्हेगारांच्या शोधासाठी त्याचा वापर करतात.

कुत्रा हा स्वच्छता ठेवणारा प्राणी आहे.आपल्या शेपटीने तो बसण्याची जागा स्वच्छ करतो. कुत्र्याला स्वच्छता आवडते. कुत्रा पाळणारे लोक कुत्र्याला नियमित आंघोळ घालून स्वच्छ ठेवतात.

कुत्र्यांचे प्रदर्शन सुद्धा भरवले जाते. या ठिकाणी विविध जातीचे कुत्रे पहायला भेटतात. कुत्रा हा माणसाचा मित्रासारखा प्राणी आहे.

कुत्रा हा अतिशय इमानदार,स्वच्छताप्रिय जागरूक आणि सुंदर प्राणी आहे. त्यामुळे मला तो खूप आवडतो.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment