माझा आवडता खेळाडू महेंद्रसिंग धोनी Maza Avadata kheladu

माझा आवडता खेळाडू- महेंद्रसिंग धोनी Mahendrasing Dhoni  Maza Avadata kheladu

माझा आवडता खेळाडू महेंद्रसिंग धोनी Maza Avadata kheladu

Maza-Avadata-kheladu

प्रत्येकाला खेळाची आवड असते. परंतु प्रत्येक माणसाला तो खेळ खेळता येतोच असे नाही. तो खेळ मात्र त्याला अतिशय आवडत असतो. तसेच माझे झाले आहे. क्रिकेट cricket हा माझा अतिशय आवडता खेळ आहे. परंतु मला मात्र क्रिकेट खेळण्याची कला किंवा कसब अवगत नाही.

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी

असे असले तरी लहानपणापासून मला क्रिकेटची अतिशय आवड आहे आणि त्यातल्या त्यात क्रिकेट खेळणारे खेळाडू यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा मला असते. सर्वच क्रिकेटर आपापल्या परीने निश्चितच आपले सर्वोत्तम योगदान खेळताना देत असतात. कारण त्यांच्यामधील जिंकण्याची जबरदस्त इच्छा त्यांना खेळत असते. सर्वच क्रिकेटर मला आवडतात; परंतु महेंद्रसिंग धोनी Mahendrasing Dhoni हा माझा अतिशय आवडता असा खेळाडू आहे.

माझा आवडता खेळाडू विराट कोहली Maza Avadata kheladu Virat Kohli

महेंद्रसिंग धोनी याचे पदार्पण भारतीय संघामध्ये झाले, तेव्हा त्याची छाप होती; म्हणजे प्रथम दर्शनी पडलेली छाप अतिशय जबरदस्त त्याचे ते खांद्यापर्यंत वाढवलेले केस. त्याचा तो आक्रमक बाणा, त्याची ती अतिशय वेगळी शैली, आत्तापर्यंतच्या भारतीय क्रिकेटर्समध्ये मला दिसली नव्हती. त्याचा तो हेलिकॉप्टर शॉट आणि बिनधास्तपणे दे दणादण फटके मारण्याची खतरनाक क्षमता मला अतिशय आवडत.

तक्षशिला जगातील पहिले विद्यापीठ World’s First University Taxila

आपल्या भारत देशात अनेक क्रिकेटर्स ही जगातील बहुतांश सर्वच मैदाने आपल्या भीम पराक्रमाने गाजवलेली आहेत. कपिल देव, सुनील गावस्कर ,बिशनसिंग बेदी, सचिन तेंडुलकर खेळाडू सुद्धा माझे आवडते खेळाडू आहेत. परंतु ते माझ्या काळात होऊन गेले नाहीत आणि त्यांचा खेळ ही मला पाहता आला नाही. पण महेंद्रसिंग धोनी म्हणजेच एम. एस. धोनी , त्याचा खेळ अगदी पहिल्या मॅचपासून मी पाहिला आहे. त्यामुळे मला तो अतिशय आवडतो.

महेंद्रसिंग धोनी झारखंड राज्यातील रांचीचा खेळाडू असून क्रिकेटमध्ये करिअर करण्यापूर्वी रेल्वेमध्ये त्याने काम केले. त्याचे आई-वडील हे मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. महेंद्रसिंग धोनीने आपले करिअर क्रिकेटमध्ये करावी; अशी त्याच्या वडिलांची तरी इच्छा नव्हती.

त्यांच्या वडिलांना वाटत होते की महेंद्रसिंगने खूप अभ्यास करावा आणि कुठेतरी एखादी चांगली नोकरी मिळवावी. परंतु धोनीला काहीतरी वेगळे करून दाखवायचे होते. त्यामुळे त्याचे अभ्यासात फारसे मन कधीच लागले नाही. परंतु असे असले तरी त्याने आपल्या वडिलांना कधीही दुखावले नाही. कारण आपल्या इच्छा-आकांक्षा जरी आपल्या मुलाने पूर्ण केल्या नसत्या तरी आपल्या मुलावर त्यांचे खूप प्रेम होते. त्याचे शरीर मजबूत असावे यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता.

क्रिकेट खेळता खेळता धोनीने आपल्या वर्तणुकीतून एक वेगळा आदर्श सर्व जगातील क्रिकेटर्स पुढे ठेवला आहे. त्याचे ते शांतपणे प्लॅनिंग करणे; कुठल्याही वेळी संघ अडचणीत असला तरी कूल माईंड हे महेंद्र सिंग धोनीचे प्रमुख अस्त्र ठरलेले आहे. वेगवेगळ्या संघातील खेळाडू खेळताना बरेचदा पुढील संघातील खेळाडूंना डिवचत असतात आणि त्यांची खेळातील लय आणि एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करतात.

परंतु महेंद्रसिंग धोनी यांचा बाप निघाला. कारण थंड डोक्याने विचार करून अफलातून नियोजन करून कोणत्याही अडचणीत असलेल्या आपल्या खेळाडूंना शांत ठेवून; त्याने क्रिकेट जगतावर आपली हुकूमत प्रस्थापित केलेली होती हेच दिसून येते.

महेंद्रसिंग धोनी नुसताच एक चांगला बॅट्समन नसून तो जगातील क्रमांक 1 चा ठरलेला निष्णात विकेटकीपर आहे.आपला बॉलर जेव्हा जीव तोडून बॉलिंग करतो . त्यावेळी त्याला शांत ठेवून विशिष्ट अशा त्याच्या सिक्रेट भाषेत त्याला तो बॉलिंग करायला सांगतो.

अश्यावेळी त्याने खेळत असलेल्या बॅट्समनचे चांगले निरिक्षण करत त्याचे कमकुवत आपल्या गरुडा सारख्या नजरेने हेरलेले असतात आणि अशा निरीक्षणातून त्या खेळाला बाद करण्याचा गनिमी कावा धोनीने शोधलेला असतो यातूनच महेंद्रसिंग धोनी ची बुद्धी किती गतीने काम करते हे आपल्याला दिसून येते आणि आपल्या संघासाठी हे योगदान निर्णायक विजय देणारे असते. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी माझा आवडता क्रिकेटर बनला.

महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेट, एक दिवसीय सामने, ट्वेंटी-ट्वेंटी सामने यामध्ये आपला भीम पराक्रम गाजवला आहे. महेंद्रसिंग धोनीचे क्रिकेट मधील विक्रम आपल्याला निश्चितच माहीत असतील. महेंद्रसिंग धोनीने कपिल देव नंतर स्वतःच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून दिला आणि तमाम भारतीयांचे स्वप्न की जे कित्येक दिवस भारतीयांनी मनाशी बाळगलेले होते ते पूर्ण केले. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला नसता तरच नवल.

महेंद्रसिंग धोनी हा संपूर्ण जगात प्रचंड लोकप्रियता लाभलेला एक महान खेळाडू बनला. याचे निश्चितच कौतुक आणि अभिमान एकूण एक भारतीयाला आहे.

महेंद्रसिंग धोनीने केवळ क्रिकेट खेळून ही लोकप्रियता कमावली असे नाही. तर त्याच्यामध्ये असलेले दैवी गुण असे म्हणता येईल असे काही गुण आणि खेळातील नैपुण्य याने ही उंची त्याने गाठली आहे.

त्याचा निगर्वी स्वभाव, शांतपणे विचार करण्याची दुर्मिळ क्षमता, मैदानावर पाय रोवून शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळविण्याची महत्त्वाकांक्षा, त्याच्या मध्ये असलेली जबरदस्त लढाऊ वृत्ती, स्वतः स्थिर मन ठेवून आपल्याबरोबरच्या खेळाडूंना शांत मनाने प्रेरणा देऊन नेतृत्व करणे, सर्व खेळाडूंना मनाने एक ठेवणे, वेळ पडल्यास एक हाती काम करून विजय, खेचून आणण्याची अफाट आणि अचाट क्षमता हे सर्व गुण निश्चितच धोनीचे नेतृत्व पुढे नेण्यास कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळेच महेंद्रसिंग धोनी हा माझा आवडता क्रिकेटपटू बनला.

महेंद्रसिंग धोनीला लोक माही अशा लाडक्या नावाने सुद्धा हाक मारतात. मला सुद्धा त्याचे माही हे नाव खूप आवडते. मी त्याचा नेहमी माही असा उल्लेख करतो. जेव्हा एखादा सामना चालू असतो, महेंद्रसिंग धोनी खेळत असतो, तेव्हा लोक माही माही असे मोठमोठ्याने ओरडत असतात. फारच मजेशीर आणि जबरदस्त वातावरण तयार होत असते.

धोनीच्य महेंद्रसिंग धोनी  हा क्रिकेटपटू घडविण्यासाठी वडिलांनी आणि आईने खूप काही कष्ट केले असणार यात वादच नाही. कोणतेही आई-वडील आपल्या मुलासाठी अपार कष्ट करतात वेगवेगळ्या आशाआकांक्षा त्याच्याकडून ठेवल्या जातात धोनीने सुद्धा त्याच्या आई-वडिलांच्या खूप मोठ्या आशा-आकांक्षा क्रिकेटच्या विश्व विजेतेपदाला गवसणी घालून पूर्ण केलेले आहेत. असे माझे मत आहे.

महाराष्ट्रातील सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांचा मी चाहता आहे. हे दोन्ही क्रिकेटपटू सुद्धा मला खूपच आवडतात. सचिन तेंडुलकरचा सुद्धा खेळ मी पाहिलेला आहे. सुनील गावस्करचा खेळ बघितलेला नाही. धोनी इतकाच सचिन तेंडुलकरही मला आवडतो. धोनीच्या यशामध्ये सचिन तेंडुलकरचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. सचिनचे मार्गदर्शन धोनीला नेहमीच असते. अर्थात सचिन धोनीला गुरुसारखा मानतो.

भारत हे तर क्रिकेटपटूंची खाणच आहे.  भारतामध्ये एकापेक्षा एक वरचढ क्रिकेटपटू निर्माण झालेले आहेत.डाॅन  ब्रॅडमन या ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूशी केली जाणारा सचिन तेंडुलकर हा महान खेळाडू भारताने जगाला दिलेला आहे. सचिन तेंडुलकर आणि धोनीची तुलना करायची झाल्यास सचिन हा उत्कृष्ट बॅट्समन म्हणून गणला जातो. तर महेंद्रसिंग धोनी हा उत्कृष्ट कर्णधार आणि विकेटकीपर म्हणून गणला जातो.

भारतामध्ये क्रिकेट हा खेळ अगदी गल्लीबोळात असून खेळला जातो. कुठेही जा मुले क्रिकेट खेळताना दिसतात. क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड आहे. यासाठी एखादी फळी साधा बाॅल असला तरी मुले खेळतात.मुलांना क्रिकेट खेळा असे सांगायला लागत नाही.त्यामुळे भारतामध्ये क्रिकेटपटू निर्माण होणे सहज शक्य आहे.

आयपीएल सारख्या सामन्यांमधून क्रिकेटचे वेड भारतीय लोकांमध्ये अधिकच विणलेले आपल्याला दिसून येईल. क्रिकेटचा सामना लोक रेडिओवरून सुद्धा ऐकतात. टीव्हीच पाहिजे असे नाही.

थोडक्यात काय तर, महेंद्र धोनी सारखा अतिशय उच्च दर्जाचा क्रिकेटपटू भारतात निर्माण होण्यासाठी अतिशय अनुकूल असे वातावरण आहे. येथून पुढेही अनेक सचिन तेंडुलकर,महेंद्रसिंग धोनी,कपिल देव, सुनील गावस्कर या भारत भूमीमध्ये निर्माण होतील यात शंकाच नाही.

धोनी माझा अतिशय आवडता असलेला क्रिकेटपटू आहे.  त्या क्रिकेटपटूच्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून उदंड शुभेच्छा व्यक्त करतो. धोनीने केवळ क्रिकेटपटू न राहता आता इतर क्रिकेटपटूना, उदयोन्मुख खेळाडू म्हणून वावरत आहेत;त्यांना उच्च दर्जाचे मार्गदर्शन करावे अशी माझी एक साधी अपेक्षा आहे. धोनी निश्चितच त्याचे हे कार्य करील असे मला वाटते.

महेंद्र सिंग धोनीच्या पुढील कारकिर्दीसाठी सुद्धा मला यानिमित्ताने शुभेच्छा व्यक्त कराव्या वाटतात. माझ्यासारख्या चाहत्यांच्या शुभेच्छा धोनीपर्यंत प्रत्यक्ष पोहोचत नाहीत; परंतु या लेखाद्वारे त्या निश्चितच पोहोचतील.

असा हा माझा आवडता खेळाडू अजूनही क्रिकेटच्या मैदानावर पाय रोवून नेतृत्व देत आहे. खेळत आहे त्याचा खेळ पाहण्याची संधी अजूनही आपल्याला आहे. त्याच्या जिद्दीला आणि खिलाडूवृत्तीला सलाम !!!

माझा आवडता खेळाडू महेंद्रसिंग धोनी Maza Avadata kheladu

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

3 thoughts on “माझा आवडता खेळाडू महेंद्रसिंग धोनी Maza Avadata kheladu”

  1. Nice and motivational information.
    खूपच उपयुक्त माहिती दिली आहे.

  2. आपल्या या ब्लोग मुळे मला खूप मदत झाली, या मुळे मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो.

Leave a Comment