महाराष्ट्राचे राज्यपाल Maharashtrache Rajyapal
सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम श्री. रमेश बैस आहेत. भारतातील प्रत्येक घटक राज्याला एक राज्यपाल असतात.राज्यपाल हे केंद्र शासनाचे प्रतिनिधी असतात.राज्यपालांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करत असतात.

महाराष्ट्राचे यापूर्वीचे राज्यपाल श्री भगतसिंग कोशियारी होते. 13 फेब्रुवारी 2023 पासून माननीय श्री. रमेश बैस आहेत.
राज्यपाल हे महाराष्ट्र किंवा कोणत्याही राज्याचा घटनात्मक प्रमुख असतात. राज्याचा कारभार हा राज्यपालांच्या नावे चालू असतो. राज्यपाल हे विधिमंडळाचाच एक भाग असतात.
राज्यपालांना अनेक प्रकारचे अधिकार असतात. राज्यपाल आपल्या सदसद्विवेकबुद्दीला अनुसरून राज्याचा गाडा सुरळीतपणे चालू आहे की नाही यावर लक्ष ठेवतात.
महाराष्ट्राचे राज्यपाल Maharashtrache Rajyapal