कान्होजी आंग्रे Kanhoji Angre

कान्होजी आंग्रे Kanhoji Angre

सरखेल कान्होजी आंग्रे Kanhoji Angre हे मराठी आरमाराचे प्रमुख होते. त्यांना सरखेल कान्होजी आंग्रे Kanhoji Angre म्हणूनच ओळखले जाते. सरखेल या शब्दाचा अर्थ आरमाराचा प्रमुख असा होतो.

समुद्री मार्गाने व्यापारासाठी येणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा परकीय सत्ताधीशांकडून हिंदवी स्वराज्याला असलेला धोका छत्रपती शिवरायांनी ओळखलेला होता.त्यासाठीच त्यांनी आपल्या स्वराज्याचे पूर्णतः स्वतंत्र असे आरमार उभे केले. या आरमाराची ताकद वाढवण्यासाठी पश्चिम किनारपट्टीवर मराठ्यांचे वर्चस्व आरमाराच्या माध्यमातून प्रस्थापित केले. ज्याचे आरमार त्याचा समुद्र ही छत्रपती शिवरायांची आरमार विषयक रणनीती होती. या रणनीतीला वेगवेगळ्या आरमार प्रमुखांनी खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याच्या दैदीप्यमान इतिहासाला भव्यता निर्माण करून दिली.

Kanhoji Angre on Wikipedia

सन 1698 मध्ये कोल्हापूरकर भोसल्यांनी कान्होजी आंग्रे यांचा पराक्रम पाहून त्यांना दर्यासारंग हा किताब बहाल केला. मुंबईपासून विंगोरिया म्हणजेच आताचे वेंगुर्ल्यापर्यंतच्या समुद्र किनारपट्टीची जबाबदारी दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांच्यावर सोपवली.

सन 1707 मध्ये साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज गादीवर येताच त्यांच्या आदेश अन्वये सेनापती पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजी आंग्रे यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नियुक्ती केली. कान्होजींनी आरमाराचा सर्वत्र भयंकर दरारा निर्माण केला. न जुमानणाऱ्या परकीय सत्ताधीशांना विशेषता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांवर त्यांनी जबरदस्त हल्ले चढवले. मराठा आरमाराचा पराभव करण्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला अपयश आल्याने त्यांनी मराठा आरमारा बरोबर शांततेचा तह केला.

कान्होजी आंग्रे यांनी सागरी किल्ले काबीज केले. किनाऱ्यावरील बंदरे ताब्यात ठेवून जबरदस्तीने स्थानिकांना कामाला लावून आपल्या व्यापारी मालाची ने आण करणाऱ्या परक्यांचा मनसुबा त्यांनी वेळेत जाणला आणि हाणूनही पाडला.

ब्रिटिश आणि पोर्तुगीजांच्या हल्ल्यांना चोख प्रतिउत्तर देण्यासाठी कान्होजींनी सर्व जहाजे कायम शस्त्रसज्ज ठेवली. इंग्रज व्यापाऱ्यांकडून येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांसाठी कर वसुली सुरू केली. कान्होजींनी सुरत पासून गोव्यापर्यंत मराठा आरमाराचे वर्चस्व निर्माण केले. कान्होजी आंग्रे हे इतिहासामध्ये सरखेल कान्होजी आंग्रे किंवा दर्यासारंग म्हणूनच प्रसिद्ध आहेत.

मराठा आरमाराची अशी निष्ठापूर्वक सेवा केल्यानंतर 1729 मध्ये कान्होजी आंग्रे Kanhoji Angre यांचा मृत्यू झाला. आजही अलिबाग या ठिकाणी त्यांची समाधी आहे.

१५ सप्टेंबर १९५१ रोजी भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे नामकरण आय.एन.एस आंग्रे असे आणि स्वतंत्र भारताने कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमावर आणि ऐतिहासिक कामगिरीवर शिक्कामोर्तब केले. कान्होजी आंग्रे यांच्या निर्विवाद कर्तृत्वाचा हा मानबिन्दू आहे. दक्षिण मुंबईतील ओल्ड बॉंबे कॅसल येथील नौदलाच्या आवारात सरखेल कान्होजी आंग्ऱ्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

एप्रिल १९९९ मध्ये भारतीय टपाल खात्याने सरखेल कान्होजी आंग्रेंवर एक तीन रुपयांचे तिकीट जारी केले. त्यात कान्होजी आंग्ऱ्यांच्या काळातील एका जंगी जहाजाचे एक सुंदर असे चित्र आहे.

मुंबईच्या खांदेरी बेटावरील ओल्ड केनेरी दीपगृहाचे कान्होजी आंग्रे दीपगृह असे करण्यात आले आहे.राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायजर्सच्या निवासी कॉलनीचे नाव सरखेल कान्होजी आंग्रे नगर असे ठेवण्यात आले आहे.

सन २००७ च्या “पायरेट्स ओफ द कॅरीबियन – अ‍ॅट द वर्ल्ड्‌स एन्ड” या इंग्रजी चित्रपटात “श्री संभाजी आंग्रिया” हे सर्वकालिक नऊ कुप्रसिद्ध सागरी चाच्यांपैकी एक दाखवले आहेत. दर्या सारंग सारखे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्याच नावावरून वरील नाव उचलण्यात आले यात शंका घेण्यास वाव आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment