कचरा कामगाराचे आत्मकथन Kachara Kamgarache Atmakathan

कचरा कामगाराचे आत्मकथन Kachara Kamgarache Atmakathan

दिसेल तो कचरा आपल्या झाडूने साफसूफ करणे, कचराकुंडीत भरणे आणि सगळं काही लख्ख करणे हेच माझे काम. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे चाललेले असते. होय, अगदी बरोबर मी एक कचरा कामगार बोलतोय. मला सफाई कामगार सुद्धा म्हणतात. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय.

स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा

होय, माझी व्यथा आणि कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. माझे काम आहे सकाळी उठून हातामध्ये खराटा घ्यायचा, कचरा गाडी घ्यायची, रस्ते झाडायचे, गोळा केलेला कचरा, कचरा गाडी टाकायचा आणि एका मोठ्या कचराकुंडी पर्यंत तो पोचवायचा. मग तो कचरा कोणता आहे? कशाचा आहे किती घाण आणि दुर्गंधीयुक्त आहे? याचा विचार करण्याचा जणू काही अधिकार मला नाही.

रस्त्याने येता जाता कुठे दुर्गंधी दिसली,अस्वच्छता असल्यास की लोक आपला रुमाल नाकाला लावतात. आपली नजर दुसरीकडे वळतात आणि पटकन त्या ठिकाणावरुन निघून जातात, ज्याने दुर्गंधी येते तो कचरा आणि आपल्याला अस्वच्छ वाटते तोच कचरा गोळा करण्याचे काम आम्ही कचरा कर्मचारी अर्थात सफाई कर्मचारी करत असतो.

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्तवर मराठीत निबंध

रोज सकाळी रस्त्यावरील पडलेला कचरा, तुमच्या सोसायटीच्या कचरा, कुंडीतील कचरा, बसस्थानकावरील कचरा किंवा रेल्वेस्थानकावरील कचरा आम्ही गोळा करून घेऊन जातो. तेव्हा जो सगळीकडे स्वच्छ आणि सुंदर परिसर आपल्याला दिसतो, तो सर्वांना हवाहवासा वाटतो. परंतु त्यामागे आम्हा कचरा कामगारांचे कष्ट आहेत.

एक कचरा कामगार म्हणून म्हणून मी जेव्हा नोकरीला लागलो, तेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी मलाही नोकरी एक संधी आहे असे वाटले. माझ्या चरितार्थासाठी आवश्यक असणारा पैसा मला मिळत आहे. परंतु जेव्हा लोक रस्त्याने येतात जातात; तेव्हा आमच्याकडे पाहण्याचा लोकांचा तुच्छभाव माझ्या नजरेस पडतो. रस्त्यावर कचरा फेकणारे लोक तोच कचरा वेचणाऱ्या कामगारांकडे इतक्या तुच्छ गावाने का पाहत असतील? असा मला प्रश्न पडतो.

कचरा गोळा करणे हे काम प्रतिष्ठेचे काम नाही असे लोकांना वाटते.परंतु हा एक गैरसमज आहे. असे म्हणतात की, श्रीकृष्णाने धर्मराजाच्या यज्ञामध्ये पत्रावळी उचलण्याचे काम केले होते. मग इतकी प्रतिष्ठा श्रीकृष्णाने जर या कामाला दिली असेल तर लोक तुच्छ भावाने का बघत असतील की हा त्यांच्या विकृत मनोवृत्तीचा दोष तर नसेल? असे असले तरी मला माझे काम प्रामाणिकपणे करणे आवडते.

सकाळी उठले की असे वाटते की लोक इतका कचरा का करत असतील? लोकांना साध्या स्वच्छतेच्या सवयी केव्हा लागणार? मी पेपरला वाचले होते की आपला देश महासत्ता होणार? पण कचरा कुठे टाकावा इतकी साधी चांगली सवय जर आपल्याला नसेल तर आपला देश महासत्ता भविष्यात केव्हाही होणार नाही हा माझा अनुभव मला सांगतो.

आम्ही जेव्हा कचरा गोळा करतो, तेव्हा तो आमच्या आरोग्याशी तू चाललेला एक मोठा खेळ असतो. बरेचदा आमचे कामगार आजारी पडतात. अनेक जीवघेणे आजार आम्हाला होतात. दुर्गंधीने आमचे आरोग्य वारंवार धोक्यात येते. असे असले तरी आमच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही हे काम प्रामाणिकपणे करत राहतो.

मला माझ्या कर्तव्याची पूर्णपणे जाणीव आहेच. आणि जर मी एक जरी दिवस सुट्टी घेतली, तर खूप अडचण निर्माण होऊ शकते. सणासुदीला सुद्धा आता आम्हाला आमचे कर्तव्य पार पाडावे लागते. जर आम्ही आमच्या कर्तव्याला प्रामाणिकपणे पार पाडली नाही, तर कोणताही सण कोणालाही आनंदाने आणि उत्साहाने साजरा करणे शक्य होणार नाही. परंतु सर्वांसाठी कमी पगार असला तरी आम्ही आमचा सण आमच्या कर्तव्याबरोबर साजरा करणे आनंदाचे समजतो.

माझ्यासारखे लक्षावधी कचरा कामगार जगभर आहेत. तुम्ही जेव्हा शाळेत जाता,तेव्हा तुमच्या शाळेत शिपाई तुमची बेंच, खुर्च्या, टेबल, वर्ग, मैदान, कार्यालय स्वच्छ ठेवतो. तोही आमचाच भाऊबंद आहे. जेव्हा तुमची आई तुमचे घरदार अगदी स्वच्छ आणि सुंदर ठेवते, तेव्हा ती सुद्धा आमची भगिनी ठरते. रेल्वेतील कर्मचारी असो की बसस्थानकावरील सफाई कामगार आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत.

गांधीजी मनात की नई तालीम सफाई से शुरू होती है. आम्हीसुद्धा दररोज सफाईने आमच्या दिवसाची सुरुवात करतो आणि सर्वांसाठी प्रसन्नतेचे वातावरण निर्माण करतो.आमचा उदरनिर्वाह यावर असला तरी हे काम करणे आनंददायक समजतो. पण इतकेच वाटते की या व्यवसायाला सर्वांनी प्रतिष्ठा द्यावी.

संत गाडगेबाबांनी महाराष्ट्रभर फिरून स्वच्छतेचे महत्व सर्वसामान्य माणसाला पटवून दिले.गाडगेबाबांच्या नावाने महाराष्ट्राचे स्वच्छता अभियान सुरु आहे. प्रत्येकाच्या हातात खराटा आहे. पण हे सर्व काही बरेचदा देखाव्यासारखे असते. आणि पडद्यामागचे खरे कर्तव्य पार पाडणारा मी सफाई कामगार असतो.

सफाई कामगार रस्त्याने आम्हाला फारसे वेतन मिळत नाही. आमच्या दैनंदिन गरजा आमच्या पगारातून भागतातच असे नाही.आमच्यापुढे आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहतो. घरामधील कौटुंबिक प्रश्न सुद्धा आम्हाला भेडसावत असतात. मुलांकडे फारसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा मन विषण्ण होते.

अनेक अडचणी असल्या तरी जीवनाचा सामना आम्ही आनंदाने करतो. कारण स्वच्छतेचे कार्य हे जगाला सुंदर करण्याचे कार्य आहे, हे आम्ही जाणून आहोत.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment