जागतिक ग्राहक दिन 2022 Jagtik Grahak Din 2022

जागतिक ग्राहक दिन 2022 Jagtik Grahak Din 2022

दरवर्षी जागतिक ग्राहक दिन 15 मार्च रोजी साजरा केला जातो. Jagtik Grahak Din 2022

जागतिक ग्राहक दिन (World Consumer Rights Day 2022 why celebrate on 15 March know details) विषयी जाणून घ्या. वस्तूची गुणवत्ता आणि वाजवी किंमत या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा निर्माण केला गेला आहे. पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात अनुचित व्यापार होत असे. त्यातून ग्राहकांची फसवणूक होत असे. अशा फसवणुकीला आळा बसणे गरजेचे होते. प्रत्येक वस्तूला तिच्या गुणवत्तेनुसार किंमत निर्धारण करून ग्राहकाला ती वस्तू वाजे किंमतीत मिळाली पाहिजे. हे नैसर्गिक न्यायाला धरून आहे.

जागतिक ग्राहक दिन 2022 थीम World Consumer Rights Day Theme 2022 “Fair Digital Finance”

जागतिक ग्राहक हक्क दिनाचे आयोजन कंझ्युमर इंटरनॅशनल, जागतिक ग्राहक संघटनांच्या महासंघाद्वारे केले जाते. Consumer International ने जागतिक ग्राहक हक्क दिनाची Jagtik Grahak Din 2022 वार्षिक थीम देखील घोषित केली आहे. 2022 मध्ये “फेअर डिजिटल फायनान्स” “Fair Digital Finance “ची थीम केंद्रीय थीम म्हणून निवडली गेली आहे.योग्य किंमत आणि वस्तूची गुणवत्ता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे. या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो. यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळात व्यावसायिकांच्या व्यवहारात होणारी हेराफेरी लक्षात घेऊनच हा कायदा बनवला गेला.

राष्ट्रीय ग्राहक दिन

दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन Jagtik Grahak Din 2022 साजरा केला जातो. तर भारतात दरवर्षी 24 डिसेंबरला ‘National Consumer Day’ अर्थात ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो.

(World Consumer Rights Day 2022 why celebrate on 15 March know details)जागतिक ग्राहक दिनअमेरिकेच्या (USA ) काँग्रेसमध्ये 15 मार्च 1962 रोजी त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकारांबद्दल पहिल्यांदा भाषण करून ग्राहकांच्या हक्कांबद्दल निवेदन केले होते.

28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 February National Science Day

ग्राहक हक्कांबद्दल Consumer Rights भाष्य करणारे ते जगातील पहिले नेते ठरले होते. ग्राहक हक्कांची चळवळ चालवणाऱ्या जगभरातील जगभरातील नागरिकांनी सन 1983 मध्ये पहिल्यांदा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यास सुरुवात केली. जाॅन केनेडी या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या 15 मार्च 1962 च्या भाषणाचा संदर्भ घेऊन जागतिक ग्राहक दिन हा आतंरराष्ट्रीय पातळीवर 15 मार्चला साजरा केला जातो.

जागतिक ग्राहक दिन 2021 थीम

“Tackle Plastic Pollution” 2021 या वर्षाची जागतिक त्रास दिनासाठी होती. जगभरात प्लास्टिक मुळे पर्यावरणाचा धोका वाढला आहे. एक ग्राहक म्हणून स्वच्छ पर्यावरण प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे. मागील वर्षी प्लॅस्टिक विषयी Tackle Plastic Pollution ही थीम जागतिक ग्राहक दिनानिमित्त स्वीकारण्यात आली होती.राष्ट्रीय ग्राहक दिन 24 December National Consumer Dayभारतात सन 1986 मध्ये 24 डिसेंबरला ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला. तर, सन 1991 आणि 1993 मध्ये या कायद्यात काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली. या कायद्याचा जास्तीत जास्त वापर केला जावा म्हणून डिसेंबर 2002 मध्ये सुद्धा पुन्हा या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. नंतर 15 मार्च 2003पासून या कायद्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली. असे असले तरी, या कायद्यातसुद्धा 1987मध्ये सुधारणा करण्यात आली होती. परंतु, 5 मार्च 2004 रोजी याची संपूर्ण अधिसूचना देण्यात आली.

ग्राहक हक्क

ग्राहकांचे मुख्य अधिकार ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक ग्राहकाला काही विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत.त्यापैकी काही मुख्य अधिकार पुढीलप्रमाणे सांगता येतील.

  • सुरक्षिततेचा अधिकार
  • माहितीचा अधिकार
  • निवड करण्याचा अधिकार
  • समस्या निराकरण करण्याचा अधिकार
  • ग्राहक शिक्षणाचा अधिकार

महात्मा गांधी म्हणतात…

ग्राहक हे आमच्याकडे आलेले सर्वात महत्त्वाचे अभ्यागत आहेत, ते आमच्यावर अवलंबून नाहीत आणि आम्ही त्यांच्यावर अवलंबून आहोत. ते आमच्या कामात अडथळा आणत नाहीत. त्यामागे त्यांचा उद्देश आहे. ते आमच्या व्यवसायात बाहेरचे नाहीत. ते त्याचा भाग आहेत; त्यांची सेवा करून आम्ही त्यांच्यावर उपकार करत नाही आहोत. तशी संधी देऊन ते आमच्यावर उपकार करत आहेत.” …………महात्मा गांधी

जागतिक ग्राहक दिन 2022 Jagtik Grahak Din 2022

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment