डोमिसाईल सर्टिफिकेट कसे काढाल How to Get Domicile Certificate

डोमिसाईल सर्टिफिकेट कसे काढाल How to Get Domicile Certificate

डोमिसाईल सर्टिफिकेट कसे काढावे? How to Get Domicile Certificate?हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थी व पालकाच्या मनात असतोच. कारण पासपोर्टपासून इतर अनेक कामासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट अत्यावश्यक असते.

How to Get Domicile Certificate

डोमिसाईल प्रमाणपत्र म्हणजे काय? अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय?

डोमेसाईल याचा अर्थ आपण विशिष्ट राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र होय. यासाठी आपण राज्यात राहत आहोत; याचे वेगवेगळे पुरावे आपल्याला द्यावे लागतात.

महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्येही डोमिसाईल सर्टिफिकेट आवश्यक असते.डोमिसाईल सर्टिफिकेट कसे काढाल How to Get Domicile Certificate ही माहिती या लेखात दिली आहे.

डोमिसाईल सर्टिफिकेट कुठे मिळते?

डोमिसाईल सर्टिफिकेट कुठे मिळते कसे काढतात हे आपण माहिती करून घेणार आहोत. डोमिसाईल सर्टिफिकेट जिल्हाधिकाऱ्यांच्या सेतू केंद्रात, महा-ई-सेवा केंद्रात, ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने मिळते. पूर्वी डोमिसाईल प्रमाणपत्र फक्त कोर्टामध्ये मिळत असे.

डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्याची पद्धत काय आहे?

डोमिसाइल सर्टिफिकेट काढण्यासाठी जिल्हाधिकार्यालयातील शेती कार्यालयात जाऊन आपण अर्ज देऊन डोमिसाईल सर्टिफिकेट मिळवू शकतो. दुसरी पद्धत म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या “आपले सरकार” या महाऑनलाईनच्या माध्यमातून ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जातो आणि डोमिसाईल सर्टिफिकेट मिळते.

महाराष्ट्र राज्य सरकारने आपले सरकारच्या माध्यमातून विविध प्रमाणपत्रे करण्यासाठी जनतेला सुविधा उपलब्ध करून दिली आहे.या माध्यमातूनही डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला काढता येते. यासाठी पुढील

https://aaplesarkar-mahaonline-gov-in

संकेतस्थळावर जाऊन लॉगिन आयडी घेऊन आवश्यक ती प्रमाणपत्रे शुल्क भरून आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट मिळवता येते.

‘आपले सरकार’च्या माध्यमातूनच महाऑनलाइनच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने मुंबईभरसह अनेक महासेवा केंद्राची उभारणी केली आहे. महा ई सेवा केंद्रावर आवश्यक कागदपत्रांच्या मदतीने आणि अर्जदारांच्या माहितीने भरलेल्या पूर्ण अर्जाच्या सहाय्याने हे अर्ज करता येणार आहे.

डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

ओळखीचा पुरावा : पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र, ‘आरएसबीवाय’कार्ड, वाहनचालक परवाना

पत्त्याचा पुरावा : पासपोर्ट, वीज देयक, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, वाहनचालक परवाना, मालमत्ता नोंदणी उतारा, ७/१२ आणि ८ अ चा उतारा

वयाचा पुरावा : जन्माचा दाखला, बोनाफाइड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा, सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी)

रहिवासाचा पुरावा : रहिवासी असल्याबाबत तलाठ्यांनी दिलेला दाखला, रहिवासी असल्याबाबत कलेक्टर यांनी दिलेला दाखला, रहिवासी पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला

इतर आवश्यक कागदपत्रे

वीज देयक, भाडेपावती, रेशनकार्ड, दूरध्वनी बिल, विवाहाचा दाखला, पाणीपट्टी पावती, मालमत्ता करपावती, मतदार यादीचा उतारा, मालमत्ता नोंदणी उतारा, पतीच्या रहिवासाचा दाखला

डोमिसाइल सर्टिफिकेट काढण्यासाठी किती वेळ लागतो?

साधारणपणे अर्ज केल्यानंतर अर्जदारांना १५ दिवसांनंतर डोमेसाइल प्रमाणपत्र मिळते. १५ दिवसांच्या कालावधीत प्रमाणपत्र मिळाले नाही, तर त्यासंदर्भात त्या त्या अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपील करण्याची सोय अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

चला वाचू आनंदे Chala Vachu Anande

डोमेसाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारा वेळ पाहता आपण अगोदरच कोण कोणती कागदपत्रे लागतात. ते पाहून तयारी करावी म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही व आपल्याला पाहिजे त्या गोष्टीसाठी डोमेसाईल प्रमाणपत्राचा उपयोग होईल.

डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यास अडचणी आल्यास कुठे संपर्क करावा?

महाऑनलाइनद्वारे उपलब्ध करून दिलेल्या प्रक्रियेत अडचणी आल्यास support@mahaonline.gov.in या ईमेल आयडीवर किंवा ०२२-६१३१६४०० या क्रमाकांवर संपर्क साधून आपण आपली अडचण सोडवू शकतो.

नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट एकच आहे का?

नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे राष्ट्रीय प्रमाणपत्र आणि डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र ही दोन वेगवेगळी प्रमाणपत्रे आहेत. परंतु जर आपल्याला एकाच प्रमाणपत्रात दोन्हीही गोष्टी उल्लेख करून राष्ट्रीयता आणि अधिवास प्रमाणपत्र दिले असेल; तर उमेदवाराने एकच प्रमाणपत्र दोन्ही ठिकाणी अपलोड करणे किंवा देणे आवश्यक होते.

डोमिसाईल सर्टिफिकेट कसे काढाल How to Get Domicile Certificate ही माहिती वाचून आपल्याला नक्कीच मदत होईल अशी अपेक्षा आहे.

Share on:

मी श्री.तुकाराम गायकर. मी व्यवसायाने प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment