हरियाल महाराष्ट्राचा राज्यपक्षी Hariyal amazing state bird of Maharashtra 

हरियाल महाराष्ट्राचा राज्यपक्षी Hariyal amazing state bird of Maharashtra

भारतातील प्रत्येक राज्याने एक पक्षी मानचिन्ह म्हणून ठेवला आहे. महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल हा मानचिन्ह असलेला पक्षी आहे. हरियाल पक्ष्याबद्दल  मी  पक्षी निरीक्षण करून माहिती मिळवलेली आहे. त्याचप्रमाणे काही संदर्भ देऊन  माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहे. हरियाल या पक्षाविषयी आपण माहिती पाहणार आहोत.

हरियाल हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. हरियाल पक्षी संपूर्ण भारतीय उपखंडात आढळतो. उत्तर प्रदेशामध्ये हा पक्षी मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

 • मराठी नाव :- हरियाल, हिरवे कबूतर किंवा हरोळी
 • इंग्रजी नाव:-Common green pigeon
 • शास्त्रीय नाव:- Treron phoenicopteta
 • आकार:- हरियाल पक्षाचे आकारमान 29 ते 33  सेंटिमीटरच्या दरम्यान असते. वजन साधारणतः 225 ते 260 ग्रॅमच्या दरम्यान असते.
 • रंगरूप:-हरियाल हा हिरव्या रंगाचा पक्षी आहे.त्याच्या खांद्यावर जांभळा पट्टा असतो. त्याचे पंख कडेला व टोकाला काळसर असतात.पंखांवर पिवळा चट्टा असतो. पाय साधारणतः पिवळ्या रंगाचे असतात.
 • चोच:- चोच बाराव्या प्रमाणे छोटी आणि बाकदार असते.
 • आवाज :- हरियाल पक्षाचा आवाज म्हणजे त्याने काढलेली मंजुळ शीळ होय.
 • आहार :- हरियाल पक्षी शाकाहारी आहे. तो प्रामुख्याने वड पिंपळ अशा वृक्षांची फळे खातो.
 • अधिवास :- बागेतील किंवा जंगलांमधील उंबर, वड,पिंपळ इत्यादी झाडांवर हरियाल पक्षाचे वास्तव्य आढळून येते. मोठ्या थव्याने हा पक्षी राहतो.
 • प्रजनन :- हरियाल पक्षाचा प्रजनन काळ मार्च ते जून च्या दरम्यान असतो. नर पक्षी विशिष्ट प्रकारे नृत्य करून मादीला आकर्षित करतात. झाडाच्या काड्या आणि पाणी यापासून हरियाल पक्षी घरटे बनवतात.  ह्या घरट्यात  एक किंवा दोन इतकीच अंडी मादी देते.  साधारणतः तेरा दिवसांनंतर पिल्ले बाहेर येतात. नर आणि मादी दोघेही आपल्या पिल्लांची काळजी घेतात. त्यांचे भरण-पोषण करतात. आपली मातापित्यांची भूमिका ते  छान बजावतात.

असे म्हणतात की हरियाल पक्षी कधीही जमिनीवर आपले पाय टेकवत नाही. जेव्हा केव्हा त्याला जमिनीवर उतरायचे असते तेव्हा तो एखाद्या झाडाच्या काडीला धरुन खाली उतरतो मी पुन्हा आकाशात उडतो. ही माहिती फारच रोचक आणि गंमतीशीर आहे.

हरियाल  पक्षी सकाळी सकाळी झाडावर ऊन खात असलेला आपल्याला आढळून येईल पंधरा-वीस पक्ष्यांचा मोठा थवा उंबर वड किंवा पिंपळावर हरियाल आपल्याला दिसून येतो तेव्हा ते दृश्य अतिशय पाहण्यासारखे असते हरियाल आपल्या आकर्षक रंगामुळे लक्ष खेचून घेतो. चमकदार पिवळ्या रंगाचा हा पक्षी ऑलिव्ह (olive) फळाच्या रंगाप्रमाणे आहे. हरियाल किंवा हरोळी मजबूत हिरव्या रंगाचा आणि पिवळसर झाक असलेला पक्षी आहे.

हरियाल पक्षी महाराष्ट्राचा राज्य पक्षी असला तरी या पक्ष्याबद्दल फारच थोडी माहिती लोकांना असते. हरियाल पक्षी हिरव्या रंगाचे कबूतर म्हणूनही प्रसिद्ध आहे. असा हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी त्याला संरक्षण मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण काही शिकारी लोक या पक्ष्यांची शिकार करून त्याचे मांस खातात. काही पक्षी निरीक्षकांच्या मते हरियाल पक्षी हा संकटात सापडण्याची शक्यता असलेला पक्षी आहे.

Share on:

मी श्री.तुकाराम गायकर. मी व्यवसायाने प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

2 thoughts on “हरियाल महाराष्ट्राचा राज्यपक्षी Hariyal amazing state bird of Maharashtra ”

 1. आपण दिलेली माहिती खूप छान आहे. आवडली. आपल्या ब्लॉगमध्ये हरियाल ऐवजी *हरियाणा* हा शब्द टाईप झाला आहे तसेच वर्ड किंवा पिंपळावर *चव्हाण* हा शब्द अतिरिक्त टाईप झाला आहे. शक्य असल्यास दुरुस्ती करून घ्यावी. धन्यवाद.

Leave a Comment