आजी आजोबा दिवस सेलिब्रेशन कसे करावे Grandparents Celebration In School

आजी आजोबा दिवस सेलिब्रेशन कसे करावे? Grandparents Celebration In School

आजी आजोबा दिवस सेलिब्रेशन कसे करावे?Grandparents Celebration In School. याबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे.

आजी आजोबा दिवस शाळेत साजरा होणार Grandparents Celebration In School.

महाराष्ट्र राज्यात सर्व शाळेत आजी आजोबा दिवस साजरा होणार आहे. या संदर्भात निर्णय घेऊन तशा सूचना शासनाने जारी केल्या आहेत.शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली. संस्कारक्षम वयात नातवंडना मिळणारा आजी-आजोबांच्या प्रेमळ सहवासाचे महत्त्व वृद्धिंगत व्हावी. त्याचप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीत असणारा आजी-आजोबांचा सहवास आणि त्याचे महत्त्व मुलांबरोबर नातवंडानाही लक्षात यावे या दृष्टीने आजी-आजोबा दिवस खूप महत्त्वाचा आहे.

आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा उद्देश काय आहे?

आजी-आजोबा हे मुलांच्या संस्कारक्षम वयात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात पालक कामधंद्याच्या निमित्ताने जवळ नसले तरी आजी आजोबा सर्व संस्कारांचे शिदोरी मुलाला मुलीला देत असतात.त्यामुळे आजी आजोबांचे असणारे महत्त्व जाणून शासनाने आजी आजोबांना सन्मान आणि गौरव मेळावा यासाठी आजी-आजोबा दिवस सर्व शाळांमध्ये साजरा सप्टेंबर महिन्यामध्ये साजरा करा सूचना दिल्या आहेत.

आजी आजोबा दिवसाचा अर्थ काय आहे?

आजी आजोबा दिवस शाळेत साजरा करण्यामागे प्रमुख तीन उद्देश आहेत. पहिला म्हणजे आजी आजोबांना योग्य सन्मान व गौरव प्राप्त करून देणे. दुसरं म्हणजे आजी-आजोबांना आपल्या नातवंडांवर प्रेम व्यक्त करण्यास साठीची संधी उपलब्ध करून देणे. आजी आजोबा हे एक अनुभवी व्यक्ती आहे त्यांचे मार्गदर्शन व आणि अनुभवाचे ज्ञान मुलांना मिळू शकते. त्याचा मुलांच्या जीवनामध्ये म्हणजेच नातवंडांच्या जीवनामध्ये खूप फायदा होऊ शकतो. संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यास आजी-आजोबा दिवसाची गरज आहे.

आजी आजोबा दिवस कधी साजरा होणार आहे?

आजी आजोबा दिवस सप्टेंबर महिन्यातील पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी साजरा होणार आहे.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने शाळेत इतर दिवशी देखील सोयीनुसार आजी आजोबा दिवस साजरा करू शकतात.

आजी आजोबा दिवस कसा साजरा करावा?
आजी आजोबा दिवस साजरा Grandparents Celebration In School करताना कोणते उपक्रम घ्यावेत?

आजी आजोबा दिवस कसा साजरा करावा याचे अनेक मार्ग आहेत. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये पुढील काही उपक्रम शाळांनी राबवले असे सुचित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या व्यतिरिक्तही काही उपक्रम शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक पालक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विचारविनिमयातून राबविले जाऊ शकतात. महाराष्ट्र शासन परिपत्रकात सुचविलेले काही उपक्रम पुढील प्रमाणे:-

1)सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचा परिचय करून द्यावा.
2)आजी-आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक्रम आयोजित करावेत.
3)विटीदांडू, संगीत खुर्ची असे खेळ ठेवण्यास हरकत नाही.
4)संगीत खुर्चीसार‘या खेळात सहभागी होऊन बालपणीच्या आठवणी ताज्या करता येतील.
5)आजी-आजोबांसोबत शाळेतील शिक्षकांनी सुद्धा सहभाग घ्यावा.
6)पारंपरिक वेशभूशेमध्ये आजी-आजोबांना बोलवावे.
7)महिलांसाठी मेहंदी आणि वेगवेगळ्या उपक‘मांचे आयोजन करण्यात यावे
8)शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या आजी-आजोबांसाठी यावेळी कलाकृती सादर कराव्यात.
9)आजीच्या बटव्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगावे. झाडे लावणे आणि पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगावे.

मातृदिनाचे महत्त्व

काही देशात आजी आजोबा दिवस हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असतो.आजी आणि आजोबा यांच्याशी असणारा प्रेमळ नातेसंबंध दाखवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment