माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध Essay on Shrawan month in Marathi

माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंधEssay on Shrawan month in Marathi

माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध Essay On shrawan month in Marathi

Essay on Shrawan month in Marathi

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे

मंगल तोरण कोणी बांधले नभोमंडपी कुणी भासे
— बालकवी(त्र्यंबक बापूजी ठोंबरे)
वरील बालकवींची कविता आठवते. श्रावण महिन्याचे निसर्ग सौंदर्य बालकवींनी अतिशय नेमक्या आणि नेटक्या शब्दात वर्णन केले आहे. श्रावण महिन्यात ऊन पावसाचा खेळ चाललेला असतो. निसर्ग आपल्या हिरव्यागार वनराईने नटलेला असतो. गाई गुरे रानात चरत असतात. इंद्रधनुष्य सकाळ-संध्याकाळ पाहायला भेटते. जणूकाही आकाशाच्या मंडपाला कुणीतरी मंगल तोरणच बांधले आहे.

श्रावण महिन्यातील गुणसुद्धा खुप कोवळे असते.
श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच खूप सुंदर असा निसर्ग आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते. अशा वातावरणात सणांचा राजा असलेल्या श्रावण महिन्याचे आगमन होते. भारतीय पंचांगाचा पाचवा महिना म्हणजे श्रावण महिना होय. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यामुळे या महिन्याला श्रावण असे म्हटले आहे.

सणांचा राजा श्रावण

नागपंचमी, राखी पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, गोपाळकाला, बैलपोळा, पिठोरी अमावस्या यासारखे सण उत्सव श्रावण महिन्यात येतात. याशिवाय दर सोमवारी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी हजारो भाविक वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जमा होतात.

श्रावण महिन्यात लोक व्रतवैकल्ये करतात. काही भाविक शिवभक्त संपूर्ण श्रावण महिना उपवास करतात. दर शनिवारी श्रद्धाळू धार्मिक लोक शनिमहाराजांचे दर्शन घ्यायला जातात. अशाप्रकारे जवळजवळ प्रत्येक दिवशी काहीना काही धार्मिक बाब चालूच असते. इतके श्रावण महिन्याचे सर्व दिवस उत्सवाने भरून गेलेले असतात.

नागपंचमी

पहिलाच सण येतो तो नागपंचमीचा नागपंचमी च्या सणाला सासुरवाशीन विवाहिता आवर्जून आपल्या माहेरी जातात. वारुळाला जाऊन नागराजाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. त्यानंतर विविध प्रकारचे देशी खेळ खेळले जातात. फुगडी,पिंगा, फेर धरून नाचणे, पारंपरिक गाणी म्हणणे अतिशय मजेदार असते.

नागपंचमी हा सण का साजरा करतात?

रक्षाबंधन

राखी पौर्णिमेचा सण हा श्रावण पौर्णिमेला येतो. श्रावण महिन्यात दोन पोर्णिमा असतील तर पहिल्या दिवशीच्या पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा साजरी करतात. श्रावणी पौर्णिमेला राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा किंवा कजरी पौर्णिमा असेही सगळीकडे म्हटले जाते. बहीण भावाला राखी बांधायला जाते. आपल्या भावांना औक्षण करते. भावांना राखी बांधून भावाच्या संरक्षणासाठी, उत्तम आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊ सुद्धा बहिणींना सुंदर अशी भेट देतात खूप मजा येते.

रक्षाबंधन वर मराठी निबंध

नारळी पौर्णिमा

नारळी पौर्णिमेचा सण कोकणामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने साजरा केला जातो. समुद्राला नारळ अर्पण केला जातो. नैवेद्य अर्पण केला जातो. नारळापासून नारळी भात वड्या असे पदार्थ बनवले जातात. या दिवसापासून समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव मासेमारीला पुन्हा सुरुवात करतात. समुद्र आपल्यावर प्रसन्न रहावा त्याची कृपा व्हावी म्हणून समुद्रदेवतेची पूजा केली जाते.

गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला

गोपालकृष्णाचा जन्म कृष्ण अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता होतो. या दिवसाला कृष्ण अष्टमी किंवा गोकुळाष्टमी असे म्हणतात. लोक उपवास करतात. रात्री श्रीकृष्णाच्या जन्माचा कार्यक्रम असतो. भजनांचे आयोजन केलेले असते. बरोबर मध्यरात्री 12 वाजता कृष्ण जन्म होतो. पाळणे गायले जातात. उपवासाचे पारणे फेडण्यासाठी मात्र दुसरा दिवस म्हणजेच गोपाळकाला उगवतो.

गोपाळकाला निबंध मराठी

गोपाळकाला मात्र उत्सवाचे भरती येते.
गोविंदा आला रे आला ….
या गाण्याच्या तालावर लोक अतिशय भान हरपून नाचतात.संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी उंच अशी दहीहंडी बांधली जाते. एका छोट्या लाडक्या मध्ये दही, लाह्या,साखर, तूप, लोणी भरलेले असते. त्यावर नारळ ठेवतात. मडके सजवतात. फुलांचा हारांनी दोरी सजवतात. कृष्णाचा फोटो लावला जातो.

गोविंदा मंडळे आपले सर्व सदस्य घेऊन त्या ठिकाणी येतात. उंच उंच मनोरे लावून दहीहंडी फोडतात.जे मंडळ दहीहंडी फोडेल त्यांना बक्षिसाची रक्कम अगोदरच जाहीर केलेली असते. गोविंदा मंडळांचा सत्कार करून बक्षीस दिले जाते. कौतुक केले जाते. मुंबई,पुणे, सोलापूर, कोल्हापूर अशा मोठ्या शहरांनी दहीहंडी मोठ्या प्रमाणात होते.छोट्या-मोठ्या गावाने सुद्धा दहीहंडीचा खेळ खूप सुंदर पद्धतीने चालतो.

श्री शंकराचे मंदिर ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकर औंढा नागनाथ परळी वैजनाथ रोशन ईश्वर इत्यादी ठिकाणी दर सोमवारी मोठी यात्रा भरते. प्रत्येक सोमवारी लोक भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून जातात. यात्रेत उत्साहाने सहभागी होतात. उपवासाबरोबर यात्रेचाही आनंद लहान थोर मंडळी लुटतात. सर्वत्र अतिशय उत्सवी वातावरण असते.

स्वातंत्र्यदिन

बऱ्याचदा आपला राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन श्रावण महिन्यातच असतो. स्वातंत्र्य दिनासाठी जोरदार तयारी केली जाते. श्रावण महिन्याच्या उत्सवी वातावरणात स्वातंत्र्यदिन येणे हे भारतीयांचे एक प्रकारे पुण्यच म्हणायचे.

स्वातंत्रदिनासाठी प्रभावी भाषण

पिठोरी अमावस्या

श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया संततीच्या प्राप्तिसाठी व्रत करतात. अमावस्या तशी अशुभ मानले जाते परंतु पिठोरी आमावस्या मात्र शुभ मानली जाते.

बैलपोळा

बैलपोळ्याच्या बहारदार सणाने महिन्याचा शेवट होतो. शेतकरीवर्ग बैलाला अतिशय सुंदर सजवतात. त्यांच्या पाठीवर झूल टाकतात. गळ्यात गोंडे बांधतात. गळ्यात आणि पायात फुलमाळा बांधतात. शिंगांना रंग देऊन बेगड लावले जाते. गळ्यामध्ये तोडे, घुंगरमाळा बांधल्या जातात. रंगीबेरंगी रिबन बांधली जाते. ढोल-ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते. देवाचे दर्शन बैलाला घडवले जाते. संध्याकाळी पुरणपोळीचा नैवेद्य बैलाला दिला जातो. बैलाची साथ शेतकऱ्याला वर्षभर लागते. त्यामुळे बैल हा त्याचा मित्र असतो. पाठीराखा असतो. त्यामुळे शेतकरी आपल्या बैलांचा सण अतिशय धूमधडाक्यात वाजंत्री लावून साजरा करतो.

एवढी सगळी मजा असल्यावर श्रावण महिना कोणाला आवडणार नाही? निश्चितच तो सर्वांना आवडतो. सण असले की मन प्रसन्न होते आणि आपले संत सांगतात की मन करा रे प्रसन्न. त्यामुळे श्रावण महिना माझा फार फार आवडीचा महिना आहे. मला तो फार आवडतो. वर्षभर हा महिना केव्हा येईल याची वाट पाहत असतो.

बैलपोळा मराठीत निबंध

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment