स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा Essay on Sant Gadgebaba

स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा Essay on Sant Gadgebaba

महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावांमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते. गावोगावी हे अभियान राबविल्यामुळे लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटू लागले आहे. पण प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की या मोहिमेला संत गाडगे बाबांचे नाव का दिले असावे?

चला तर आपण आज स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा यांच्या संबंधी उद्बोधक अशी माहिती पाहूया. म्हणजे आपल्याला संत गाडगेबाबांचे नाव ग्रामस्वच्छता अभियानाला काय दिले हे लक्षात येईल.

संत गाडगेबाबांचा जन्म वर्‍हाडातील शेंडगाव या गावांमध्ये एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव डेबू असे ठेवले. संत गाडगे बाबांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर असे होते.आताची मुले डेबू हे नाव ऐकून हसू लागतात. परंतु पूर्वीच्या काळी अशी जरा वेगळी नावे आपल्या महाराष्ट्रात होती. शिक्षणामुळे झालेला बदल आपल्याला लक्षात घेतला पाहिजे.

संत गाडगेबाबा यांच्या विषयी अधिक माहिती

संत गाडगेबाबांचे वडील लहानपणीच वारले. आईने मग डेबुला बरोबर घेऊन भावाकडे जाऊन राहिली. मामाच्या शेतावर राहू लागला प्रत्येक काम हे अतिशय मनापासून करण्याची डेबुला हौस असे. कोणतेही काम करायचे ते अगदी नीटनेटके आणि टापटीप. ज्याला आपला हात लागेल ते सुंदर दिसले पाहिजे इतके काम उत्कृष्ट करण्याची पद्धत डेबूची होती.

संत तुकाराम महाराज निबंध

त्याकाळी असणारे जीवन अतिशय कष्टदायक होते. काबाडकष्ट करून सुद्धा लोकांना दुःख आणि दारिद्र्य यांना सामोरे जावे लागे. त्यामुळे डेबूचा जीव तुटत होता. समाजामध्ये वावरत असताना समाजातील लोकांचे चुकीचे वागणे त्याला पसंत पडत नसे. व्यसनामुळे कर्जबाजारी होणारे लोक, कर्ज काढून सण करणारे लोक, रोगराई झाली तरी औषध न घेणारे,देवाला नवस करत बसणारे,कोंबडी व बकऱ्यांचे बळी देणारे लोक, डेबुला आवडत नव्हते.

त्यामुळे लोकांना तो खूप काही चांगल्या भल्याच्या गोष्टी समजावून सांगत असे. परंतु लोक चांगल्या गोष्टी ऐकत नसत. उलट डेबूलाच समजावून सांगत असत. त्यामुळे डेबुला वाटले की आपल्या शब्दाला वजन नाही. आई आपल्यासाठी कष्ट करते.आपण आईचे ऐकतो. मग आपण इतके कष्ट करायचे की लोक न बोलता ही माझे ऐकतील. त्यांच्यामध्ये सुधारणा होतील. अशी त्यांनी जणू काही प्रतिज्ञा घेतली.

सानेगुरूजी Saneguruji

त्यामुळे वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी घर सोडून निघून गेले. गाडगेबाबांनी आपल्या या घरादाराचा आणि सगळ्या प्रापंचिक गोष्टींचा त्याग केला. सगळीच माणसे हे आपले सगेसोयरे आहेत सगळे विश्व हीच आपले घर असे मानून ते राहू लागले. गावोगाव भजने-कीर्तन करत फिरू लागले.

गाडगेबाबा गावोगाव फिरू लागले. प्रत्येक गावात जात गेल्यावर लोकांना सांग येत का जे कीर्तनकार बाबा संध्याकाळी आपल्या गावात कीर्तनासाठी येणार आहे. तेव्हा सगळ्यांनी कीर्तनासाठी या. लोकांना आश्चर्य वाटे. पण लोक भाविक असल्यामुळे संध्याकाळी मंदिरात कीर्तनासाठी जात. आणि हे सांगताना लोकांना म्हणत की चला आता झाडू आणि खराटे घेऊन या.

बैलपोळा मराठीत निबंध

कीर्तनकार बाबा येणार म्हणजे देवही येणार. मग आता पण आपण स्वच्छता करून त्याचे स्वागत करूया. बाबा स्वतः हातामध्ये खराटा घेत.रस्ते गाव झाडू लागत. मग लोकही बरोबर येत. गावातील जबाबदारी मोठी मंडळी सुद्धा हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करत.सारा गाव स्वच्छ सुंदर नीटनेटका झालेला असे.

लोक संध्याकाळी मंदिराकडे जमा होत. गाडगेबाबा तिथे मध्ये उभे राहात आणि लोक कीर्तनकार कुठे आहे विचारू लागले की सांगत की मीच कीर्तनकार आहे. आणि लोकांना प्रश्न विचारत. प्रश्न विचारून लोकांकडून उत्तरे घेत. लोकांचे म्हणणे कसे चुकीचे आहे हे त्या प्रश्नोत्तरातून गाडगेबाबा लोकांना मोठे चपखपणे पटवून देत.

किर्तन रंगात येत असतानाच,” गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” हे त्यांचे आवडते भजन ते म्हणत.आता लोकांना हे भजन खूप आवडे. लोक सुद्धा त्या भजनाच्या तालाबरोबर डोलू लागत. गाडगेबाबांचे म्हणणे लोकांना पटलेले असे.

किर्तन संपू लागले, कि लोक गाडगेबाबांच्या पायावर डोके ठेवत. पण गाडगेबाबांना ही गोष्ट अजिबात आवडत नसे. ते लोकांना आपल्या पायांना स्पर्श करू देत नसत. फारच कोणीही आग्रह करु लागला तर हातात असलेली काठी त्याच्या पाठीत टाकीत असत.

कीर्तन संपले की गाडगेबाबा त्या ठिकाणावरून अक्षरशः पळून जात.कारण कारण लोक धार्मिकतेच्या नावाखाली बाबांचे किर्तन आणि विसरून जाऊ नयेत असे त्यांना वाट लोकांनी सर्वांशी करावेत रूढी परंपरा सोडून अंधश्रद्धेला मूठमाती द्यावी स्वच्छतेची कास धरावी विनाकारण कर कर्जे काढू नयेत असाच त्यांचा मोलाचा उपदेश आहे.

गाडगे महाराजांचा वेश अतिशय बावळा म्हणावा असा होता. अंगामध्ये स्वच्छ परंतु फाटका सदरा,नेसायला एक लुंगी, एका पायात कापडाचा बूट आणि दुसरा पाय अनवाणी असे. हातात एखादी काठी आणि हात सदा नमस्कारासाठी जोडलेले. चांगल्या मजबूत शरीराचे आणि पुरेशा उंचकाठीचे बाबा हे जगावेगळे व्यक्तिमत्त्व होते.

बाबांनी केवळ गावी झाडून आणि कीर्तने करून समाज प्रबोधन केले असे म्हणता येणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक तीर्थक्षेत्री त्यांनी धर्मशाळा बांधून घेतल्या. गावोगावी ठीकठिकाणी गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा आणि वस्तीगृहे उघडली. नद्यांवर सुंदर घाट बांधले. पाणपोया घातल्या. जिथे जिथे दुष्काळ पडला तिथे तिथे बाबा धावून गेले.

गोरगरीब, अनाथ, अपंग यांना बाबांनी अन्नदान केले. बाबांनी केलेले लोक जागृती पाहून मोठे मोठे लोक बाबांबरोबर येऊन बाबांच्या उपदेशाप्रमाणे आणि मार्गदर्शनाप्रमाणे कार्य करू लागले. गाडगेबाबांनी या सर्वांना शाळा,विद्यालये,महाविद्यालये, वस्तीगृहे,अन्नछत्रे,नद्यांवरचे घाट, गोरगरिबांची सेवा यासाठी प्रवृत्त केले.त्यामुळे महाराष्ट्रात फार मोठे समाज प्रबोधन घडून आले.

यामध्ये एक फुटकी कवडी नसताना, केवळ स्वतःच्या सद्विचारांनी समाज प्रबोधनासाठी आणि समाज परिवर्तनासाठी आपले जीवन खर्च करून, मोठमोठ्या लोकांना समाजसेवेसाठी प्रवृत्त करून, इतकी मोठी समाजसेवा करणे, हे गाडगेबाबांचे कार्य पाहिले की वाटते की समाजसेवेसाठी पैशांची नसून चांगल्या विचारांची आणि आचारांची गरज आहे. तीव्र इच्छाशक्तीची आणि प्रांजळपणे पारदर्शक काम करणाऱ्यांची गरज आहे.

गाडगेबाबांच्या या कार्यकर्तृत्वामुळेच महाराष्ट्र सरकारने स्वच्छता अभियानासाठी गाडगेबाबांचे नाव दिले. हे खरोखरच गाडगेबाबांना आदरांजली वाहून परिवर्तनाची साद प्रतिसाद कशी आहे हेच महाराष्ट्राच्या जनतेला प्रतीकात्मकरीत्या सांगितले आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment