संत ज्ञानेश्वर मराठी निबंध Essay On Sant Dnyaneshwar

संत ज्ञानेश्वर मराठी निबंध Essay On Sant Dnyaneshwar

आपल्या लेखणीने आणि वाणीने मराठी भाषेला दिव्यत्वाचा स्पर्श करून दिला ते अलौकिक प्रतिभेचे कवी संत ज्ञानेश्वर होत.

माझा मराठाची बोलू कौतुके । परि अमृतातेही पैजा। जिंके ऐसी अक्षरे । रसिके मेळवीन॥

मराठी भाषेच्या रसिक श्रोत्यांना भगवद्गीतेवरील टीका असे आशय स्वरूपात सांगत असताना मराठी भाषा ही अमृताशी पैजा जिंके इतकी मधुर आणि अर्थवाही आहे. असा तेजस्वी आणि व ओजस्वी उद्गार काढणारे संत ज्ञानेश्वर होते.

संत ज्ञानेश्वर यांचे वडील विठ्ठलपंत संन्यासाश्रमात गेले होते. परंतु आपले गुरू श्रीपाद स्वामी यांच्या आज्ञेवरून पुन्हा गृहस्थाश्रमात आले. पुढे त्यांना चार मुले झाली. संत ज्ञानेश्वरांचा जन्म सन १२७५ मध्ये झाला.

त्यावेळच्या कर्मठ समाजालाही गोष्ट अजिबात मान्य झाली नाही.त्या काळच्या समाजाने त्यांना वाळीत टाकले. खरेतर धर्माचा कर्मठ मार्ग अनुसरण यापेक्षा माणुसकीचा सहज-सोपा धर्म कोणत्याही धर्माला जोडला, तर जीवन अधिक सुलभ होते. हेच त्या काळचा समाज विसरला असे म्हणावे लागते.

आळंदीतील कर्मठ लोकांनी संत ज्ञानेश्वर आणि भावंड एकूणच त्यांचे कुटुंब यांना वाळीत टाकल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. असे असले तरी समाजातील काही दयाळू लोक त्यांच्या पाठीशी होते. या काळामध्ये विठ्ठलपंतांनी आपल्या मुलांना स्वतःला असलेले वैदिक धर्माचे ज्ञान दिले. विविध ग्रंथांची ओळखही करून दिली.

मुले मोठी झाल्यानंतर ब्राह्मण समाजाचा मुलांची मुंज करणे हा विधी केला जातो. आळंदीच्या पंडित लोकांना याविषयी विठ्ठलपंतांनी विचारले की माझ्या मुलांची आता मुंज व्हायला पाहिजे. परंतु त्या कर्मठ लोकांनी या गोष्टीसाठी नकार दिला आणि त्यांना पैठणला पैठणच्या ब्रह्मवृंदाकडे पाठवले.

त्याठिकाणीही त्यांना याबाबतीत नकार मिळाला.
पैठण वरून परत येत असताना ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करण्यासाठी विठ्ठल पंत आणि कुटुंब गेले. प्रदक्षिणा करीत असताना एका वाघाशी त्यांचा सामना झाला. त्यावेळी निवृत्तीनाथ त्यांच्यापासून बाजूला झाले. त्यांनी एका गुहेचा आश्रय घेतला. त्याठिकाणी नवनाथांपैकी गहिनीनाथ ध्यानधारणा करीत होते. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना नाथपंथाची दीक्षा तथा अनुग्रह दिला.

पुढे निवृत्तीनाथ पुन्हा आपल्या कुटुंबाला जाऊन मिळाले.निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना भावंडांनाही नाथपंथाची दीक्षा दिली. नाथपंथ हा योगमार्गाने जाणारा कोणता आहे. पुढे हे सर्व कुटुंब आळंदी मध्ये गेले. पैठणच्या ब्रह्मपीठाने ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना प्रायश्चित्त म्हणून देहत्याग करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी एक दिवस अचानक आपले कुटुंब सोडून इंद्रायणी मध्ये देहत्याग केला असे म्हटले जाते.

आता निवृत्तीनाथ हे भावंडांचे सर्वात मोठे बंधू असल्याने त्यांच्यावर सर्व जबाबदारी आली. ज्ञानेश्वरादी भावंडांना वाळीत टाकल्यामुळे आळंदी मधील कर्मठ लोकांचा त्यांना फार त्रास होत असे. या त्रासाला ते सर्वच कंटाळले होते. आता आई वडील अनंताच्या प्रवासाला गेलेले असल्यामुळे आपण पुन्हा पैठणला जाऊन आपल्या जीवनाचा मार्ग इथून पुढे वैदिक धार्मिक पद्धतीने चालायला काहीच हरकत नाही. म्हणून पुन्हा ही मंडळी पैठणला गेली. त्या ठिकाणच्या ब्रह्मवृंदाकडे त्यांनी दाद मागितली. परंतु केवळ देवाचे नामस्मरण करीत तुम्ही तुमचे आयुष्य घालवा असा त्यांनी न्याय दिला.

या भावंडांची हेटाळणी झाली. त्या सभेमध्ये असणारे तेथील कर्मठ लोक त्यांना निंदू लागले.ज्ञानेश्वर म्हणाले की वस्तुतः सर्व जीव हे एकाच चैतन्याची रुपे आहेत. परंतु तेथील एका कर्मठ आणि रस्त्यावर चाललेला रेडा त्याचे नाव ज्ञाना आहे. तुझे नाव ज्ञानदेव आहे मग तुम्ही दोघे सारखेच आहात का? तो तुझ्याप्रमाणे वेदवाक्य बोलेल का? तेव्हा ज्ञानेश्वरांनी उत्तर दिले की निश्चितच बोलू शकेल. कथा असे सांगते की ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या मस्तकावर आपला हात ठेवला आणि तो रेडा वेदांच्या ऋचा त्याच्या आवाजात म्हणून लागला.

हा अभूतपूर्व चमत्कार पाहिल्यानंतर सगळी ब्रह्मसभा हादरली. ही मुले सामान्य नसून कोणीतरी अवतारी पुरुष असले पाहिजेत.असे त्या ब्रह्मवृंदाना
वाटू लागले.

असे असले तरी आता ज्ञानेश्वरादी भावंडांनी आपल्याला कोणत्याही ब्रह्मपिठाची कोणत्याही प्रकारची कृपा नको असे ठरवले. आपला जीवनक्रम आपण आपल्या पद्धतीने पुढे सुरू ठेवून आयुष्य काढायचे असे ठरवले.

संत ज्ञानेश्वरादी भावंडे ही जन्मजात कवी होते. नेवासे या ठिकाणी असणाऱ्या मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांच्या आग्रहाखातर भगवद्गीतेवर येथील समाजाला ज्ञान देण्याचे ठरवले. भगवद्गीतेतील ज्ञान आपल्या सोप्या भाषेत संत ज्ञानेश्वर लोकांना देऊ लागले. सच्चिदानंद बाबा नावाच्या एका व्यक्तीने ज्ञानेश्वरांनी सांगितलेली भगवद्गीतेवरील ओवीबद्ध टीका लिहून घेतली. नऊ हजार पेक्षा जास्त ओव्या असलेली ही भगवद्गीतेवरील टीका भावार्थदीपिका या नावाने प्रसिद्ध झाली. नंतर यालाच ज्ञानेश्वरी असे लोक म्हणू लागले. ज्ञानेश्वरी या नावाने हा अद्वितीय ग्रंथ समाजामध्ये लोकप्रिय झाला.

भगवद्गीतेच्या अठरा अध्यायातील सातशे श्लोकांवर संत ज्ञानेश्वरांनी त्या काळच्या लोकांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये भाष्य केले होते. ऐकणारे श्रोते आणि वाचणारे वाचक त्यामुळे कृतकृत्य झाले. आजही सातशे वर्षे होऊन गेली तरी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मध्ये दररोज वाचला जातो. भाविक त्यातून ज्ञान घेतात. आपले जीवन कृतार्थ करतात. ज्ञानेश्वरांनी हे कर्तृत्व वयाच्या सोळाव्या वर्षी केले. ही घटना अलौकिक आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षी भगवद्गीतेतील कठीण ज्ञान ज्या संस्कृतीच्या सामाजिक शब्दांच्या कडे कुलपात बंदिस्त होते. त्या ज्ञानाचा प्रवाह ज्ञानेश्वरांनी मोकळा करून लोकभाषेत लोकांपुढे मांडला.जनसामान्यांना धर्माचे ज्ञान सोपे केले मराठी भाषा ही अमृताची ही आपल्या माधुरी याच्या बाबतीत स्पर्धा करू शकते हे त्यांनी दाखवून दिले.

एक दिवस त्या काळचे महान योगी चांगदेव महाराज यांच्या कानी ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेतील ओव्या कानी आल्या. चांगदेव हे आपल्या योग बळाने अनेक चमत्कार करून दाखवित. ह्या सहज सोप्या भाषेत असलेले ज्ञान पाहून आणि सोळा वर्षाच्या मुलाने लिहिलेले आहे हे ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

कर्माची रेखा नोलांड इता योग आहे तत्वतः हे ऐकून तर चांगदेव विचारात पडले. त्यांनी ज्ञानेश्वरांना एक पत्र लिहायला घेतले.वयाने लहान आहे परंतु ज्ञानाने मोठा आहे मग मायना काय लिहावा असा प्रश्न त्या योग्याला पडला आणि त्याने एक कोरा कागद ज्ञानेश्वरादी भावंडांना पाठवला. त्यावेळी ज्ञानेश्वर आळंदीमध्ये होते.

चांद देवासारखा योग्याने पाठवलेले पत्र वाचून पहावे म्हणून मुक्ताबाई च्या हाती आल्याबरोबर मुक्ताबाई म्हटली ही चौदाशे वर्षे आयुष्य काढून सुद्धा हात चांग्या अजून कोराच आहे. संत निवृत्तीनाथांनी चांगदेवांना काही उपदेश करावा म्हणून ज्ञानेश्वरांना त्या पत्रावर काही लिहिण्यास सांगितले. ६५ ओव्या संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला उद्देश करण्यासाठी उपदेश करण्यासाठी लिहिल्या आणि ते पत्र पुन्हा पाठवून दिले.

चांगदेवाने ते पत्र वाचले. परंतु मराठी भाषेतील त्या ओव्या सुद्धा चांगदेवाला समजल्या नाहीत.त्यामुळे चांगदेव ज्ञानेश्वरादी भावंडांची भेटीसाठी वाघावर बसून, हातात सापाचा चाबूक घेऊन निघाला. त्यांनी आपल्या योग्य बळावर ही कृती केली असे समजले जाते.

चांगदेव भेटीला आले. आता आपणही त्यांना सामोरे जायला पाहिजे. कारण ते वयाने मोठे आहे. योगी आहे.तेव्हा सकाळच्या ऊन्हामध्ये बसलेली ज्ञानेश्वरादी भावंडे विचारात पडली. ज्ञानेश्वरांनी भिंतीला आज्ञा दिली आणि चांगदेवांना सामोरे जाण्यासाठी भिंत चालू लागली.भिंत चालू लागली आहे. हे पाहून चांगदेवांना आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. त्यांनी वाघावरून खाली उतरून ज्ञानेश्वरादी भावंडांना साष्टांग दंडवत घातले आणि शरण आले. चांगदेवाला मुक्ताबाईने उपदेश केला. अनुग्रह केला.

संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका, चांगदेव-पासष्टी, अमृतानुभव, हरिपाठ आणि अनेक अभंग लिहून ठेवले आहेत. त्यांचे हे सर्व वाड़मय आजही लोक अभ्यासत असतात आणि कृतकृत्य होतात. वारकरी पंथातील प्रत्येक वारकरी या ग्रंथांचे अनुसरण करतो.

ज्ञानेश्वरांचा हरिपाठ आजही प्रत्येक मंदिरामध्ये आणि घरामध्ये अतिशय श्रद्धेने लोक म्हणतात. संत ज्ञानेश्वरांनी सत्तावीस अभंगांमधून अतिशय सोप्या भाषेत जनसामान्यांना समजणाऱ्या भाषेमध्ये हरिपाठाचे रचना केली आहे. सर्व सामान्य माणूस ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग या अध्यात्मिक मार्गांचे अनुसरण करणे सोपे समजत नाही. त्यामुळे हरिपाठ सर्वसामान्य वारकऱ्याला खूप जवळचा वाटतो. त्यातला उपदेश ग्रहण करून तो आपले वारकरी म्हणून जीवन फुलवीत असतो.

त्या काळातील विठ्ठलाचे निस्सीम भक्त असलेले संत नामदेव चोखामेळा सावता माळी गोरोबाकाका इत्यादी संतमंडळी ज्ञानेश्वरादी भावंडांना भोवती गोळा झाली परमेश्वराचे अवतार आहेत असे मानू लागले ब्रह्मविद्या त्यांच्या ओठावर खेळते आहे आणि तिचे ज्ञान आपल्याला व्हावे म्हणून भाविक भक्त ही त्यांच्या भवती गोळा करू लागले

संत ज्ञानेश्वरांनी पुढे संत नामदेव बरोबर भारतभर तीर्थाटन केले याविषयीचे त्यांचे अभंग तीर्थावळी म्हणून प्रसिद्ध आहेत संत नामदेव हे भक्ती योगी होते तर संत ज्ञानेश्वर हे ज्ञानयोगी होते भक्ती आणि ज्ञान यांचा अनोखा संगम दोघांच्या व्यक्तिमत्त्वातून झालेला होता संत संत ज्ञानेश्वरांचा नामदेवांवर मोठा प्रभाव होता त्याचप्रमाणे संत नामदेवांचा सुद्धा संत ज्ञानेश्वर यांच्यावर प्रभाव दिसून येतो.

संत ज्ञानेश्वरांनी १२९६ यावर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर आपल्या अलौकिक कार्याने अजरामर झाले.आजही भावी फक्त आळंदीला संत ज्ञानेश्वरांच्या दर्शनासाठी जातात. आषाढी कार्तिकी यात्रेला आळंदीला मोठी यात्रा भरते. आळंदी या ठिकाणी भक्तांची मोठी मांदियाळी दरवर्षी जमा होते. ज्ञानेश्वरांच्या समाधीवर डोके ठेवून आपले जीवन कृतार्थ करते.

सानेगुरूजी Saneguruji

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment