माझा आवडता ऋतू पावसाळा वर मराठी निबंध Essay on Rainy Season in Marathi

माझा आवडता ऋतू पावसाळा वर मराठी निबंधEssay on rainy season in Marathi

Essay-on-Rainy-Season-in-marathi

Essay on rainy season in Marathi

पावसाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू आहे. कारणेही तशीच आहेत पावसाळ्यात सारखे जे बदल सृष्टीत होतात आणि निसर्गसौंदर्याला जी झळाळी येते, तशी इतर कोणत्याही ऋतुत येत नाही. हे सर्वात महत्त्वाचे कारण पावसाळा ऋतु आवडण्यामागे आहे.

वृक्षारोपणाचे महत्त्व मराठी निबंध Vruksharopanache Mahattva Nibandh Marathi

“माउलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार”

असे कवींनी म्हटलेले आहे.जून महिन्यातील येणारे पावसाळ्याचे पहिले नक्षत्र म्हणजे मृगनक्षत्र होय. या मृगनक्षत्रामध्ये पावसाची सुरुवात आपल्याकडे होत असते. मान्सून केरळ राज्यात याआधी दाखल होतो; परंतु महाराष्ट्रात मात्र सहा जूनच्या आसपास येतो.

मी पाहिलेला महापूर निबंध

सुरुवातीला असणारा रोहिणी नक्षत्रातला वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह संपूर्ण परिसराला पावसाळ्याची जाणीव करून देतो. मात्र त्यानंतर मृग नक्षत्रात येणारा मान्सून कवीला माउलीच्या दुग्धापरी वाटतो. यातच त्या पावसाचे खरे वैशिष्ट्य धरलेले आहे. खूप छान वाटते.

लहान मुलांना हा पहिला पाऊस अंगावर घ्यावा वाटतो. त्याचा तुषार संपूर्ण शरीराला जेव्हा न्हावून काढतो तेव्हा ते पहिल्या पावसातलं भिजने हे खूप मजेदार असते. मुलांसाठी ही मौज फारच न्यारी असते आणि तितकीच प्यारी सुद्धा असते. मोर आपला पिसारा फुलवून नाचत कोकिळेचे कुहू कुहू, चातकाचे पडता हो, पडता हो हे ह्या सगळ्या वातावरणाला अधिकच खुलवते.

शाळेतील घंटेचे आत्मकथन निबंध मराठी

सगळीकडे मातीचा गंध पसरतो. पहिल्या पावसाचा हा सुगंध परत वर्षभर मिळत नाही तो दुर्मिळ आहे.
सर्वत्र पाऊस पडल्याने हिरवाई निर्माण होते आणि हिरवा गालिचा संपूर्ण सृष्टीवर अंथरला आहे की काय असे वाटते.

हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे

असे कवी बालकवी यांनी आपल्या श्रावणमास या कवितेमध्ये म्हटलेले आहे. किती छान वर्णन केले आहे! सृष्टीचे आषाढ महिन्यातील धो-धो पावसानंतर श्रावण महिन्यातला आनंददायी काळ सुरू होतो. कधी ऊन कधी पाऊस , सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहायला मिळते. सृष्टीला बहार आलेला असतो. हे पावसाळी वातावरण अतिशय सुंदर आणि हवेहवेसे वाटणारे असते.

जेव्हा धोय धोय मुसळधार पाऊस सगळीकडे पडू लागतो आणि पावसाचं हे धारानृत्य जेव्हा अखंडपणे चालू होते. तेव्हा डोंगरावरचे निर्झर खुळखुळ झुळझुळ करत आपले लाल पाणी घेऊन वाहू लागतात. नदीला येऊन मिळतात. नदीचा प्रवाह पूर्ववत होतो. कधी कधी नदीला मोठा पूर येतो. तो पूर पाहणे सुद्धा मजेदार असते.

जंगलातील पशुपक्षी, कीटक, छोट्या-मोठ्या वृक्ष- वनस्पती, वेली आनंदाने तरारतात. हे वातावरण माणसांची पावले निसर्गाकडे पावसाळ्यात वळवत असते.निसर्गप्रेमी पर्यटक या संधीची वाटच पाहत असतात. निसर्गात जाऊन धबधब्याखाली भिजणे, निसर्गात बागडने, मजे मजेत आनंद घेत फिरणे काही औरच असते.ही सारी माझ्या फक्त आणि फक्त वर्षा ऋतु चा आपल्याला देत असतो. त्यामुळे पावसाळा हा ऋतू मला खूपच आवडतो.

निसर्ग सौंदर्याला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी देण्याचे काम पावसाळ्यामध्ये घडते. माथेरान महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणे या पावसाळ्यात वर्षभर पुरेल असे पावसाचे दान याच ऋतूत घेतात.
कोणत्याही कवीला किंवा कवी मनाच्या माणसाला हे वातावरण काव्यमय शब्दात वर्णन करायला भाग पाडते. शेतकरी पावसाची वाट पाहत असतो. त्याला आनंद देतो; तो खरा पावसाळा. कारण वर्षभराची पुंजी पावसाळ्यात तयार होत असते.

आपली औत काठी घेऊन तो शेतात जातो. पाळी घालतो. मशागत करतो. पेरणी करतो आणि जेव्हा काळ्या, तांबड्या मातीतून धान्याचे अंकुर वरती येतात. तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर जो आनंद दिसतो. तो आनंद अवर्णनीय आहे. साऱ्या जगाचा पोशिंदा बळीराजा खऱ्या अर्थाने तेव्हा सुखावतो.
डोंगर हिरवेगार होतात पक्ष्यांना या हिरव्या सृष्टीमध्ये आनंदाने बागडायला अधिकच मजा येते आणि मग ते त्यांचे मजे मजेचे बागडणे पाहणे हा मोठा कौतुक सोहळा असतो.

“नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा”

पावसाळा नित्यनेमाने येत असतो. मात्र कधीकधी दुष्काळाची छाया सुद्धा अतिशय भयानकपणे पडते. आणि चांगला पाऊस पडणे हाच त्यावरचा एक मात्र उपाय ठरतो. त्यामुळे दुष्काळ पडू नये असे वाटते. त्यासाठी मात्र आपण माणसांनी जी निसर्गाची हानी केली आहे. ती भरपाई करण्याची सुवर्णसंधी सुद्धा आपल्याला पावसाळा देत असतो.

वृक्षारोपण करण्याची आवड अनेक लोकांना असते. अनेक संस्था सरकारचा वन खाते विभाग या काळामध्ये जंगलांमध्ये वृक्षारोपण करण्याची संधी सोडत नाही.नव्याने लावलेले रोपटे यादरम्यान चांगले रुजते. जंगलांना उभारी देण्याचं हे काम आपण करत राहिले पाहिजे. आपण निसर्गाचे एक घटक आहोत.

पावसाळ्यामध्ये शाळा वर्षा सहलीचे आयोजन करतात. वर्षा सहलीमध्ये मुले, शिक्षक,पालक सृष्टीच्या सौंदर्याचा पुरेपूर आस्वाद घेतात. विविध प्रकारच्या फुले देणाऱ्या वनस्पती आपल्या सौंदर्याने निसर्गाच्या देखणेपणात अधिकच भर टाकतात. सहलीला गेलेली मुलं शिक्षक सर्व गोष्टींचा आनंद घेतात. निसर्ग कसा जपावा- जोपासावा याचे शिक्षण नकळत बाल मित्रांना भेटत असते.ती निसर्गाशी एकरूप होतात आणि आपणही या निसर्गाचे घटक आहोत याची सहजपणे त्यांना जाणीव होते. ही सर्व संधी पावसाळा हा ऋतू देतो. त्यामुळे पावसाळा मला खूप आवडतो.

निसर्ग चित्र काढताना बहुतेकदा चित्रकार पावसाळ्याच्या वातावरणावर आधारित चित्र काढत असतो. त्या चित्रकारांचे ते चितारणं त्या चित्रकाराला निसर्गाशी मनस्वीपणे एकरूप व्हायला संधी देतो तो म्हणजे पावसाळा.

सृष्टीचे सौंदर्य आपल्या काव्यात उतरवणारे कवी केशवसुत म्हणतात;
“जेथे वृक्ष ओढ हे वनराजी
तेथे वृत्ति रमे माझी”
कवींची वृत्ती ज्या निसर्गामध्ये रमते त्या निसर्गाला संजीवनी देण्याचे काम पावसाळा हा ऋतू करतो. त्यामुळे पावसाला मला खूप आवडतो.

Essay on rainy season in Marathi

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment