माझी शाळा निबंध मराठी Essay on my school in marathi

माझी शाळा निबंध मराठी Essay on my school in Marathi

माझी शाळा निबंध क्रमांक -1

माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा पाचघर आहे. माझी शाळा इयत्ता सातवीपर्यंत आहे. माझ्या शाळेत प्रत्येक वर्गाला वर्ग शिक्षक आहेत. माझ्या शाळेला मोठे मैदान आहे.त्यावर आम्ही खूप खेळतो. शाळेला सुंदर अशी बाग आहे. आम्ही बागेची निगा राखतो. माझ्या शाळेत ग्रंथालय आहे.त्यातील पुस्तके आम्ही वाचतो. शाळेची घंटा वाजताच मुले सफाई करतात.परिपाठाचा टोल होताच परिपाठ होतो.माझ्या शाळेत मुलांचा गणवेश पांढरा शर्ट आणि खाकी पॅंट कसा आहे. तर मुलींसाठी निळा आणि पांढरा रंगाचा फ्रॉक आहे. माझ्या शाळेतील सर्व शिक्षक आम्हाला खूप छान शिकवतात. वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करतात.दरवर्षी सहल असते. सहलीमध्ये आम्ही खूप मजा करतो.आमच्या शाळेमध्ये संगणक कक्ष असून पहिलीपासूनच्या मुलांना संगणक शिकवला जातो. ई.लर्निंगची सुविधा आहे. माझ्या शाळेला सुंदर असा रंग दिला आहे. भिंतींवर छान छान चित्रे काढलेली आहेत. वर्गांमध्ये सुंदर असे तक्ते लावलेले आहेत.  एक छोटीशी प्रयोगशाळा सुद्धा आमच्या शाळेला आहे.आम्ही विज्ञान प्रदर्शनात भाग घेतो. माझी शाळा खूप छान आहे. त्यामुळे मला फार आवडते.

बंद शाळेचे आत्मकथन निबंध

माझी शाळा निबंध क्रमांक -2

माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव आहे. माझी शाळा इयत्ता चौथी पर्यंत आहे. आमच्या शाळेला खूप सुंदर बगीचा आहे. सुंदर सुंदर सुगंधी फुलांची झाडे आहेत. काही मोठी झाडे सुद्धा आहेत. शाळेला मैदान आहे. क्रीडांगणावर आम्ही सर्व प्रकारचे खेळ खेळतो.  स्पर्धांमध्ये भाग घेतो. शाळेला ग्रंथालय आणि प्रयोगशाळा सुद्धा आहे. शाळेमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केलेले असते. वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. सर्व महापुरुषांचे जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जाते. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन अतिशय उत्साहात साजरा होतो. त्यावेळी सर्व मुलांना खूप छान खाऊ वाटला जातो.
शाळेचे एक लेझीम पथकही आहे. राष्ट्रीय सणांच्या वेळी लेझीम पथक आपला खेळ दाखवते. दरवर्षी आमची शाळा सहलीचे नियोजन करते. वेगवेगळ्या ठिकाणी सहली जातात. खूप मजा येते. शाळेचा गणवेश खूप सुंदर आहे. शाळेमध्ये संगणक कक्ष आणि ई लर्निंग सुद्धा आहे. सर्व मुलांना संगणक शिकायला मिळतो. आमच्या शाळेत वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन नेहमी भरवले जाते. विज्ञान प्रदर्शनात मुले सहभाग घेतात. बक्षिसेही मिळवतात.
शाळेतील व्हरांड्यात संगितमय   परिपाठ असतो. आठवड्यातील दोन दिवस इंग्रजी, दोन दिवस हिंदी आणि दोन दिवस मराठी भाषेतून परिपाठ असतो. आमच्या शाळेत कच्च्या मुलांसाठी जादा वेळ देऊन शिकवले जाते. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी चांगली तयारी करून घेतात. दरवर्षी मुले शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येतात.
आमच्या शाळेत मूल्यशिक्षणाला फार महत्त्व आहे. शिस्त आणि प्रामाणिकपणा सुद्धा महत्त्वाचा मानला जातो. प्रामाणिक विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातात.
शालेय पोषण आहार सुद्धा खूप छान मिळतो.
वरील सर्व कारणांमुळे माझी शाळा खूप छान आहे त्यामुळे मला ती खूप खूप आवडते.

शाळा केव्हा सुरू होणार?

माझी शाळा निबंध क्रमांक- 3

माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय असे आहे. माझ्या शाळेला खूप सुंदर अशी  इमारत आहे. इमारतीला सुंदर  रंग दिलेला आहे.छान छान चित्रे काढल्यामुळे शाळेचे सौंदर्य वाढलेले आहे. माझ्या शाळेत इयत्ता आठवी पर्यंतचे वर्ग आहेत.
शाळेला खूप मोठे क्रीडांगण आहे.क्रीडांगणावर खो-खो, कबड्डी,फुटबॉल,हॉलीबॉल या खेळाची क्रीडांगणे आखून ठेवलेली आहेत.त्यावर मुले खेळतात. खेळाची आवड असणारी मुले इतरही वेळी शाळेतील क्रीडांगणावर येऊन खेळतात.
शाळेतील प्रत्येक वर्गाला पूर्णवेळ शिक्षक आहेत.सर्व शिक्षक अतिशय चांगले शिकवतात.वर्गांमध्ये शैक्षणिक तक्ते लावलेले आहेत. बसायला बेंच आहेत. सर्व वर्ग हवेहवेसे वाटणारे आहेत.
शाळा सकाळी दहा वाजता सुरू होते. सकाळी सफाई झाल्यानंतर परिपाठाची घंटा होते.परिपाठ अतिशय शिस्तबद्ध असतो. राष्ट्रगीतापासून पसायदानापर्यंत फार छान चालते.  परिपाठामध्ये प्रश्न मंजुषा, समूहगीत गायन, कविता गायन सारखे उपक्रमही आयोजित करतात.
शाळेच्या एका वेगळ्या खोलीत संगणक कक्ष व प्रयोगशाळा ग्रंथालय सुद्धा  आहे.  संगणकाचा आम्ही वापर करतो. खूप पुस्तके वाचतो. विज्ञानाच्या तासाला प्रयोगशाळेत प्रयोग करण्याची संधी आम्हाला मिळते. विज्ञानाचे कायमस्वरूपी प्रदर्शन प्रदर्शन शाळेत आहे.
आमच्या शाळेत सतत  उपक्रमांचे नियोजन केलेले असते. पावसाळ्यामध्ये वर्षासहल, परिसर सहल असते. हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोमोठ्या सहलीचे नियोजन करतात. सर्व मुलांना सहलीत सहभाग घेता येतो.  फार मजा येते.
शाळेचा गणवेश गुलाबी रंगाचा आहे. गुलाबी रंगात सर्व मुले मुली खूप छान वाटतात. दर बुधवारी गणवेशाला सुट्टी असते. शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करतात. त्यामध्ये क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा असते.
शाळेला सुंदर अशी बाग आहे.आमचे सर्व शिक्षक आणि आम्ही मुले बागेत काम करतो. बागेत काम करणे आम्हा मुलांना फारच आवडते.
आमच्या शाळेचे एक मंत्रिमंडळही आहे. सर्व मुला-मुलींना त्यामध्ये समान भाग मिळतो. त्यासाठी निवडणूक  होते. वर्गाचेही मंत्रीमंडळ असते.
अशा प्रकारे आमची शाळा खूप सुंदर अशी आहे. त्यामुळे ते सर्वांना आवडते.

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment