मकर संक्रांति वर मराठी निबंध Essay On Makar Sankranti

मकर संक्रांति वर मराठी निबंध Essay On Makar Sankranti

मकर संक्रांति यावर मराठी निबंध Essay On Makar Sankranti

मकर संक्रांति मराठी निबंध 10 line Essay on Makar Sankranti

1)मकर संक्रांति हा हिंदू धर्मीयांचा एक लोकप्रिय सण आहे.
2) मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळ यांचे सेवन करतात.
3)मकर संक्रातीला एकमेकांना तिळगूळ देतात.

4)तिळगूळ देताना “तिळगुळ घ्या गोड बोला” असे म्हणतात.
5)मकर संक्रातीला दक्षिण भारतात पोंगल असे म्हणतात.
6) संक्रांत दरवर्षी 14 जानेवारीला येते.
7)संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो.
8)संक्रातीच्या दिवसापासून उत्तरायण सुरू होते. 9)भौगोलिकदृष्ट्या हा दिवस खूप महत्वाचा असतो.
10) मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात; त्यामुळे खूप मजा येते.

मकर संक्रांत निबंध Makar Sankrant Essay in 100 words

जानेवारी महिन्यामध्ये 14 तारखेला मकर संक्रातीचा सण येतो. सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि उत्तरायण सुरू होते. हा दिवस सण म्हणून सर्व भारतात अतिशय आनंदाने साजरा केला जातो.

संक्रातीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ वाटतात. तिळगुळ वाटताना तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे आवर्जून एकमेकांना म्हटले जाते.तीळ हा स्निग्ध पदार्थ असून गूळ हा गोड पदार्थ आहे. तिळाची स्निग्धता आणि गुळाची गोडी आपल्या संबंधांमध्ये निर्माण व्हावी हा यामागील आपल्या पूर्वजांचा उद्देश आहे.

मकर संक्रातीलाच दक्षिण भारतात पोंगल असे म्हणतात तर उत्तर भारतात माघी असेसुद्धा म्हटले जाते.

पोंगल

संक्रातीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे पतंग उडवताना खूप मजा येते आणि सणाचा आनंद वाढतो. संध्याकाळी असणारे पुरणपोळीचे जेवण मकर संक्रांतीच्या सणामध्ये अधिकच गोडवा निर्माण करते. त्यामुळे संक्रांतीचा सण मला खूप आवडतो.

मकर संक्रांत निबंध Makar Sankrant Essay in 200 words

दरवर्षी 14 जानेवारीला येणारा हा मकर संक्रांतीचा सण हा माझा आवडता सण आहे. हिंदू धर्मीय हा लोक असं अतिशय आनंदाने साजरा करतात.

मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो. या दिवसापासून उत्तरायण सुरू होते.या दिवसापासून दिवस मोठा होत जातो. या दिवसाचे महत्व जाणून आपल्या पूर्वजांनी हा सण सुरू केला असावा.

मकर संक्रातीच्या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ वाटतात तिळगुळ वाटताना तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणतात. यामागे तिळगुळ घ्या आणि तिळा सारखे स्निग्ध आणि गुळासारखे गोड संबंध निर्माण होऊ द्या अशी उदात्त भावना आहे.

मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवसाला भोगी म्हटले जाते. या दिवशी शेतात पिकणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्यांचा एकत्रित भाजी बनवली जाते. त्यामध्ये तीळ मिसळले जातात. भाकरीमध्येही तीळ मिसळतात. तीळ खाल्ल्याने थंडीच्या दिवसात आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते व थंडी सहन करण्याची शक्ती वाढते.

दक्षिण भारतात संक्रातीला पोंगल असे म्हटले जाते. तर उत्तर भारतात माघी म्हटले जाते. संपूर्ण भारतात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे. पतंग उडवल्यामुळे लोकांमध्ये आणखी आनंदाचे वातावरण निर्माण होते. घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. त्यामुळे वातावरण अधिकच प्रसन्न होते.

हिंदू धर्मीय लोक मकर संक्रांतीच्या दिवशी तीर्थक्षेत्राला जातात. त्या ठिकाणच्या नद्यांमध्ये स्नान करतात काशी, प्रयाग या ठिकाणी मकर संक्रातीच्या दिवशी स्नान करणे पुण्यदायी समजले जाते.

मकर संक्रांतीचा सण सूर्यदेवाला समर्पित असल्यामुळे सूर्याचे तेज आणि ऊर्जा आपल्यामध्ये येवो अशी प्रार्थना लोक करतात. आपल्या संबंधांमध्ये तिळाची स्निग्धता गुळाचा मधुर गोडवा निर्माण करण्यासाठी संक्रातीचा सण एक प्रकारची खूप मोठी संधी आहे. त्यामुळे हा सण मला खूप आवडतो.

मकर संक्रांत निबंध Makar Sankrant Essay in 500 words

मकर संक्रांति हिंदू धर्मीयांचा अतिशय लोकप्रिय असलेला एक सण आहे. मकर संक्रातीचा सण हा एक भौगोलिक वैशिष्ट्यावर आधारलेला आहे. या दिवशीही सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो आणि पृथ्वीवर उत्तरायण सुरू होते. दिवस मोठा मोठा होत जातो आणि रात्र छोटी-छोटी होत जाते. भारतामध्ये पूर्वी कोणतीही विज्ञानाधारित गोष्ट, तत्व हे धार्मिक पद्धतीतून सांगण्याची प्रथा आहे. त्यामुळे मकर संक्राती या भौगोलिक वैशिष्ट्य धार्मिकतेचे रूप आले आहे.

मकर संक्रांत हे साधारणतः दरवर्षी 14 जानेवारीला येत असते. केव्हा केव्हा ती 15 जानेवारीला सुद्धा येते. या दिवशी तिळगुळ वाटला जातो. एकमेकांना तिळगूळ देताना तिळगूळ घ्या आणि गोड बोला असे प्रेमाने म्हटले जाते. तीळ हा एक स्निग्ध पदार्थ असून आपल्याला आरोग्यासाठी चांगला आहे. गुळ खाणे सुद्धा आपल्याला आरोग्यदायी असते. तिळाची स्निग्धता आणि गुळाचा मधुर गोडवा सणाचा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. आपल्या स्वभावात स्निग्धता आणि गोडवा निर्माण करणारा मकर संक्रांति एक आगळावेगळा सण आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी तीर्थक्षेत्रांना जाऊन लोक स्नान करतात. हे स्नान तीळ मिश्रित पाण्याने करावे अशी एक मान्यता आहे. तीर्थक्षेत्राला गेल्यामुळे आपली मानसिकता सकारात्मक होते. तीर्थक्षेत्राला स्नान केल्यामुळे आपल्याला पुण्य मिळते.त्यामुळे आपण अधिक सकारात्मक होतो; असे धार्मिक माणसाला वाटते.

मकर संक्रांतीच्या दिवशी भारतामध्ये पतंग उडविण्याची प्रथा आहे. आकाशामध्ये पतंग एखाद्या पक्षासारखा उडवताना एक वेगळीच मजा येते. पतंग उडवण्याच्या स्पर्धा होतात. वेगवेगळ्या आकारांचे पतंग आकाशामध्ये जेव्हा झेपावतात तेव्हा एक अपूर्व असे दृश्य दिसते. ते दृष्ईय फारच मनमोहक असते. अक्षरशः हजारो लोक या पतंग उडवण्याच्या खेळांमध्ये सहभागी होतात आणि आनंद लुटतात.

दक्षिण भारतामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला पोंगल असेही म्हणतात. काही ठिकाणी माघी,खिचडी, उत्तरायण असेही संबोधले जाते. महाराष्ट्रात मात्र मकर संक्रांत म्हटले जाते. शब्द वेगळे असले तरी त्यातून एकच अर्थ निघतो की सण साजरा करा; उत्सव साजरा करा. सण साजरा केल्याने माणसाचे मन अधिक आनंदी होते. आपण नवे वर्ष आनंदाने साजरे करतो. गुढीपाडव्याला गुढी उभारतो. त्याप्रमाणे संक्रांतीला तिळगुळ देऊन एकमेकांना शुभेच्छा आणि प्रेम देतो.

संक्रांतीच्या अगोदरचा दिवस महाराष्ट्रात भोगी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची मिश्रित भाजी केली जाते. त्यामध्ये तीळ टाकले जातात. काही भागात याला शेंगसोला, खेंगाट म्हणतात. त्यामुळे ही भाजी अतिशय चविष्ट आणि खमंग होते. खवय्यांना एक वेगळीच मेजवानी मिळते.

मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. या दिवशी तीळ खाऊ नयेत असे म्हणतात. वैज्ञानिक कारण असे सांगता येईल की संक्रांतीच्या दिवशी जास्त तीळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढू नये आणि उष्णतेचा त्रास होऊ नये.

रब्बी हंगाम संपल्यानंतर संक्रातीला एक वेगळाच आनंद शेतकरी साजरा करतात. या दिवशी ऊस, गाजर,हरभरे,ओले,गहू,तीळ यांचा प्रसाद बनवला जातो आणि महिला सुगड्यांची पूजा करतात. एकमेकांना हळदी-कुंकू लावतात आणि सौभाग्याचे वाण वाटतात महिलांमध्ये हळदी कुंकू लावणे हे पवित्र समजले जाते.

असा हा मकर संक्रांतीचा सण मला खूप आवडतो. या सणाच्या निमित्ताने आम्ही गावाला जातो आणि खेड्यातील पद्धतीने सण साजरा करतो. खूप मजा येते. सर्वांनी प्रेमाने गोड बोलावे; हेच शहाणपण शिकवणारा एक सुंदर सण म्हणजे मकर संक्रांति असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रेमातील गोडवा वाढावा आणि वाढ व्हावा. हाच संदेश देणारा मकर संक्रांति हा एक सुंदर सण आहे.

मकर संक्रांति यावर मराठी निबंध Essay On Makar Sankranti हा निबंध आपल्याला कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा.

काही निबंध आपल्याला आवडू शकतात नक्की वाचा.

राष्ट्रीय विज्ञान दिन वर निबंध 28 February National Science Day

27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन 27 February Marathi Bhasha Gaurav Din

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment