गोपाळकाला निबंध मराठी Essay on Gopalkala in Marathi

गोपाळकाला निबंध मराठी Essay on Gopalkala in Marathi

Essay on Gopalkala in Marathi

श्रावण महिना आला, की गोविंदा आला रे आला या गाण्याने अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा सर्वांचा आवडता सण-उत्सव म्हणजेच गोपाळकाला येतो.

गोपाळकाला केव्हा साजरा केला जातो?

गोपाळकाला हा श्रीकृष्ण  जयंतीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा एक महोत्सव आहे. या दिवशी ठिक ठिकाणी दहीहंडी टांगली जाते आणि बालगोपाळांची गोविंदा मंडळे त्याठिकाणी जाऊन मनोरे लावून दहीहंडी फोडतात आणि बक्षिसे मिळवतात. महाराष्ट्रात हा सण अतिशय सुंदर पद्धतीने साजरा केला जातो. तसा हा सण संपूर्ण भारतातही मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. परंतु महाराष्ट्रातील त्याचे स्वरूप जरा भिन्न आहे.

बैलपोळा मराठीत निबंध Essay on Bailpola in Marathi

कृष्णाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी जो दहीहंडीचा सण साजरा केला जातो, त्याला आपण गोपाळकाला असे म्हणतो. श्रीकृष्ण गोकुळात मोठा होत असतो. गोकुळवासीयांचा मुख्य व्यवसाय म्हणजे गाईंचे पालन आणि दूध दुभते इत्यादी पदार्थ यांचे विक्री करणे होय. त्यावेळची बाजारपेठ मथुरा होती. या ठिकाणी जाऊन गवळी आणि गवळणी दुधाचे तूप, लोणी असे पदार्थ विकत असत. त्यावरच त्यांचा चरितार्थ चालत असे.

श्रीकृष्णाचा जन्म केव्हा झाला?

भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचे आठवे अवतार मानले जातात. वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात होतो. श्रावण वद्य अष्टमी, नक्षत्र रोहिणी, चंद्र वृषभ राशीत असतांना श्रीकृष्णाचा जन्म होतो. श्रीकृष्णाच्या जन्माने सर्वत्र अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. कंसासारख्या दुष्टांचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म झालेला असतो.

14 सप्टेंबर हिंदी भाषा दिवस14 September Hindi Bhasha Divas

वसुदेव आणि देवकी यांचा हा सुपुत्र मात्र मथुरेत राहत नाही. श्रीकृष्णाचे वडील वसुदेव बाळकृष्णाला गोकुळाच्या नंदाघरी रातोरात नेऊन ठेवतात. तिथेच श्रीकृष्ण लहानाचा मोठा होतो. नंदपत्नी यशोदा माता श्रीकृष्णाचे सर्व लाड पुरवतात. श्रीकृष्णाच्या सर्व बाललीला गोकुळामध्ये घडत असतात.

श्रीकृष्णाला वाटे की ज्या कंसाचा वध करण्यासाठी माझा जन्म झाला त्याच्या मथुरेत हे पदार्थ जाऊ नयेत. आपल्या गोकुळातील सवंगड्यांना हे पदार्थ खायला मिळावेत. श्रीकृष्णाला ते धष्टपुष्ट व्हावेत असे वाटे.श्रीकृष्ण आणि त्याच्या सोबत्यांचे एक मंडळ होते.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे निबंध Essay on Vrikshavalli amha soyari vanachare

थोडक्यात ते एक गोविंदा मंडळच होते. त्यामुळे श्रीकृष्ण त्याच्या मित्रांसमवेत घरांमध्ये गुपचुपपणे शिरून तेथील शिंक्यावरचे दही, दुधाचे माठ काढून किंवा फोडून आपल्या सवंगड्यांना स्वतःच्या हाताने खायला देत असे. श्रीकृष्णालाही दही, दूध,लोणी हे पदार्थ फार आवडत. श्रीकृष्णाच्या बालपणीच्या लीला ऐकल्या, वाचल्या की त्यावेळचे गोकुळातील दही लोणी चोरून खाण्याचे प्रसंग किती छान असतील ते लक्षात येते. हे प्रसंग आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.

श्रीकृष्णाने गोपाळकाला कसा साजरा केला?

एक दिवस काय होते, श्रीकृष्ण आपल्या या सगळ्या सवंगड्यांना आपल्याबरोबर आपापल्या घरातील शिदोरी घेऊन वनात गाई गुरे चारण्यासाठी जातो. दिवसभर त्या ठिकाणी हे बाळगोपाळ अतिशय आनंदाने खेळत असतात. एका बाजूला गाई चरत असतात. दुपारची वेळ होते. सर्व जण भुकावलेले असतात. अशावेळी सर्व बाळ गोपाळ गोलाकार जेवायला बसतात. सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्या शिदोरी आणलेले असतात.

श्रीकृष्ण सांगतो की आता आपण हे सगळे पदार्थ एकत्र करून खाऊया. त्याचा काला करू खूप छान होईल. सर्व गोपाळ ऐकतात. आणि सगळ्या शिदोरीचा एकत्रित काला होतो. तो काला श्रीकृष्ण स्वतःच्या हाताने सर्वांना खायला देतो. त्याची चव अतिशय छान असते. हा काला खायला सर्वांना खूप आवडतो. स्वर्गातून देव पाहत असतात. त्यांना हे दृश्य फार आवडते. श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातचा काला खाण्याची इच्छा देवांना होते. सर्व देव यमुनेच्या पाण्यात माशांच्या रूपाने येतात.

काला खाल्ल्यानंतर गोपाळ यमुनेवर हात धुण्यासाठी येतील. तेव्हा त्यांचे उष्टे आपण खाऊ अशी त्यांची कल्पना असते. परंतु श्रीकृष्ण हे जाणून असतात ते आपल्या सोबत्यांना आपले हात धुण्यासाठी यमुना नदीवर जाऊ देत नाहीत. त्यामुळे देव हिरमुसतात.
सर्वांची शिदोरी एकत्र करून दुपारच्या वेळी दररोज गोपाळकाला करून श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी काल्याचा आनंद घेत असत.

गोपाळकाला उत्सवामागे श्रीकृष्णाचे आपल्या सगळ्यांचा शिंक्यावरचे दूध दही चोरून खाणे आणि गाईमागे वनात गेल्यावर दुपारच्यावेळी गोपाळकाला करून खाणे ही कथा आहे.

महाराष्ट्रात मुंबई पुणे इतर सर्व छोट्या-मोठ्या शहरांमध्ये दहीहंडीचा उत्सव अतिशय आनंदाने साजरा होतो. यानिमित्त दहीहंडी फोडण्याची स्पर्धा असते. खूप उंचावर दोरांचा वापर करून एका मडक्यात दहीकाला बनवून त्यावर एक नारळ ठेऊन बांधले जाते. सुंदर अशा फुलांच्या हारांनी दहीहंडी सजवलेली असते. गोविंदा मंडळे येतात. उंच-उंच मनोरे तयार करून दहीहंडी फोडतात. बक्षिसे मिळवतात.

दहीहंडी (गोपाळकाला)कशी साजरी करावी?

गोपाळकाला हा अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर खेळ आहे दहीहंडी फोडताना ती खूप उंचावर लावली जाते. दहीहंडीची उंची कमी असली पाहिजे.
दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा मंडळे मनोरे लावतात. परंतु बरेच त्यामधील गोविंदा खाली पडल्याने जखमी, जायबंदी होतात. काही जणांचा मृत्यू होतो. जन्माचे अपंगत्वही येते.

दहीहंडी फार उंचावर न लावता ती माफक उंचीवर ठेवून इतर काही देशी खेळांच्या स्पर्धा आयोजित करून शेवटी दहीहंडी फोडली तर सर्वांचा आनंद द्विगुणित होईल.
दहीहंडीच्या स्पर्धांचे वेळेस खूप मोठ्या आवाजात स्पीकर्स लावले जातात. स्पीकरचा आवाज जरा मर्यादित असला पाहिजे. त्यामुळे सर्व आबालवृद्धांना या खेळाचा आनंद घेता येईल.

दहीहंडीचा खेळ 15 वर्षाच्या पुढील पुरुषांसाठी असावा. लहान मुलांचा यामध्ये समावेश नसल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.

याप्रसंगी श्रीकृष्ण चरित्रावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करावे.
गोपाळकाला,दहीहंडी सर्वांनाच आवडते.म्हणून बालगोपाळांचा सण सुरक्षिततेबाबत काळजी घेत साजरा करावा.

हे निबंध अवश्य वाचा.

संत ज्ञानेश्वर मराठी निबंध

संत तुकाराम महाराज निबंध

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment