गणेश चतुर्थी निबंध Essay on Ganesh Chaturthi

गणेश चतुर्थी निबंध Ganesh Chaturthi 2021

 

Essay-on-Ganesh-Chaturthi

गणेश चतुर्थी 2021  Essay on Ganesh Chaturthi

गणेश चतुर्थी या वर्षी 10 सप्टेंबर 2021 या दिवशी आहे. गणेश चतुर्थी अर्थात गणेश उत्सव या सणाची वाट गणेश फक्त दरवर्षी आतुरतेने पाहत असतात. गणेशोत्सव हा हिंदू धर्माचा एक आगळावेगळा सण असून मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणारा हा एक सामाजिक उत्सव आहे.

गणेशोत्सव निबंध मराठी

एखादा धार्मिक उत्सव हा जेव्हा सामाजिक उत्सव होत असतो तेव्हा त्याचे स्वरूप हे अगदी लोकांच्या मनातील पावित्र्याची परमोच्च उंची गाठत असते. फक्त पावित्र्याची नाही तर एकूणच आनंदाचे शिखरे सुद्धा हे उत्सव गाठत असतात. लोकांच्या उत्साहाला फार मोठी भरती येत असते.

बैलपोळा मराठीत निबंध

प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरूनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा,
चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी,
हे गणनायक गजमुखा भक्ता बहु तोषवी ॥

सुरुवातीलाच गणरायाला विनंती करून विद्येचा सागर दयाचा सागर गणरायाला प्रार्थना करतो की, हे गणराया आमच्या अज्ञानत्व नष्ट कर आम्हाला चांगली बुद्धी दे आराध्य मोरेश्वर आमचे चिंता क्लेश दुःख आणि दारिद्र्य सगळे देशांतर आला पाठवून दे. हे गणनायका गजमुखा सर्व भक्तांना आनंद दे, आनंद दे.

गणेशोत्सव हा दरवर्षी भाद्रपद महिन्यात येत असतो. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी असते या वर्षी 10 सप्टेंबरला हा सण आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये मागील वर्षी गणेशोत्सवाला कोरोणा साथीमुळे साजरा करणे फार कठीण गेले. तरी सुद्धा लोकांनी प्रचंड गर्दी करून गणेशोत्सव साजरा केला. अर्थात त्याची फळे नंतर लोकांना भोगावी लागली.

५ सप्टेंबर शिक्षक दिन ५ भाषणे

पार्वती मातेने आपल्या मुलाला म्हणजेच गणेशाला खूप सामर्थ्यशाली बनवले. गणेश हा सर्व विद्यांचा दाता आहे. सर्व कलांचा देव आहे. चौदा विद्या चौसष्ट कला यांचा अधिपती आहे.सर्व गणांचा महानायक आहे. सर्वात आधी गणपतीची पूजा कोणताही धार्मिक विधी करत असताना होत असते. ही परंपरा आहे. हे सर्व आशीर्वाद आणि वर गणरायाला लाभलेले आहेत.

गणेश ही विघ्नहरण करणारी देवता आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात ओझर या ठिकाणी अष्टविनायकांपैकी विघ्नहर्त्या गणरायाचे भव्य असे मंदिर आहे.या ठिकाणचा गणपती विघ्नहर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. हा विघ्नहर्ता सर्व संकट मोचक आहे.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा॥
हा श्लोक मला या ठिकाणी आठवतो. कोटी सूर्यांच्या प्रकाशाइतकी प्रभा असणारा, महाकाय असा वक्रतुंड गणराया सर्व कार्यांमध्ये येणाऱ्या विघ्नांचा नाशक आहे. मलाही हे कार्य करताना कोणतेही संकट येऊ नये म्हणून प्रार्थना करताना, हे कार्य निर्विघ्न व्हावे, म्हणून निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून सर्वदा पाठीशी उभा राहा. अशी प्रार्थना अशी भावना यामध्ये आहे.

महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव हा सामाजिकरित्या मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा यासाठी सुरुवातीला प्रयत्न केले. त्यामागे त्यांचा उद्देश हा सामाजिक जागृती करणे, लोकांचे संघटन करणे आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हे संघटन वापरणे हाच मुख्य उद्देश होता.

गेली दोन वर्षे कोणताही सण आणि उत्सव साजरा करण्यामध्ये प्रचंड प्रमाणात मर्यादा येऊ लागली आहे. कोरोनासारख्या साथीने लोकांच्या उत्साहावर विरजण पडत आहे. लोक नैराश्यग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे लोकांना आता किती थांबावे असा प्रश्न पडू लागला आहे.

पण गर्दीच्या ठिकाणी एखादा कोरोनाबाधित व्यक्ती अजाणतेपणे फिरत असेल, त्यालाही माहित नसेल की आपल्यामुळे कोणते महासंकट आपल्या सभोवतीच्या लोकांवर येणार आहे.कोरोना पसरण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर वाढते.

गणेशोत्सव साजरा होत असताना होणारी गर्दी आवरणे फार जिकीरीचे असते. पोलीस खात्याला सुव्यवस्था ठेवणे मोठे कठीण जाते. यामागे काय कारणे असतील की जाणत्या लोकांनी शोधली पाहिजेत. समाजाने एक शिस्त अंगी बाणवली तर असे उत्सव साजरे करणे शक्य होईल.

कोणताही धर्म हा समाजाची सर्व अंगांनी प्रगती करण्यासाठी निर्माण झालेला आहे.जीवनातील दुःखे नाहीशी करण्यासाठी आणि सुखाने जीवन व्यतीत करण्यासाठी धर्मांची रचना आणि धार्मिक विधींची पद्धत काळाच्या ओघात निर्माण झाली आहे.आता आपला धर्म हा जर आपल्या दुःखाचा निवारणासाठी असेल तर विविध उत्सव साजरे करताना दुःखाची निर्मिती होऊ नये यासाठी सामाजिक शिस्त पाळणे गरजेचे आहे.

सरकारही अशा काळामध्ये काही गाईडलाईन्स आखून देत असते. त्यामागे उद्देश चांगला असतो. त्या गाईडलाईन किंवा मार्गदर्शन बाबींना फाटा देणे चुकीचे आहे. कारण अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना ह्या तज्ञ लोकांच्या विचारमंथनातून तयार झालेल्या असतात.यामध्ये कोणत्याही धार्मिक उत्सवाला नियंत्रणात आणणे हा उद्देश नसतो.

जगामध्ये जी काही प्रगत राष्ट्र आहेत त्यांच्याकडे एक नजर टाकली तर ती राष्ट्रीय तेथील नागरिकांमध्ये असलेल्या शिस्त आणि प्रामाणिकपणा या सामाजिक प्रगतीच्या मौल्यवान गुणांमुळे प्रगत झालेली दिसून येतील.
या दृष्टीने आपण भारतीयांनी सुद्धा भारत देश महासत्ता होणार असे स्वप्न पाहत असताना काही सामाजिक मूल्ये आपल्या अंगी बाणवली पाहिजेत असे वाटते.

मागील वर्षी कोरोना साथीमध्ये थोडी चांगली परिस्थिती झाल्यावर लोकांना वाटले यावर्षी गणेशोत्सव मागील वर्षी प्रमाणे साजरा करता येईल. सरकारच्या गाईडलाईन्स लोकांनी फॉलो न करता गणेशोत्सव साजरा केला. खरे तर कोणताही उत्सव साजरा करायला सरकारची काहीच आडकाठी नसली पाहिजे. पण करायचे तरी काय?कोरोना साथ इतकी प्रचंड आहे की अशा अशा उत्सवांना मधून कोरोना पसरायला वेळ लागत नाही आणि पुढच्या लाटेची पूर्वतयारी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्यामुळे यातून होत असते.

त्यामुळे असे वाटते की गणेशोत्सव, गोपाळकाला, दहीहंडी, नवरात्र उत्सव, रमजान किंवा मोहरम दसरा, नाताळ यासारखे सण कोरोना महासाथीचे भान ठेवून आणि सामाजिक शिस्तीची जाण ठेवून साजरी केली पाहिजे.

काही संघटना किंवा काही राजकीय पक्ष धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे व्हावेत यासाठी प्रयत्नशील असतात. खरे तर समाजाला चांगली दिशा देण्याचे काम त्यांनी केले पाहिजे आणि एखादी कोरोना सारखी जर साथ चालू असेल तर अधिकच जबाबदारीने वागले पाहिजे.

आपल्याकडे विशेषता महाराष्ट्र मध्ये कोरोना प्रचंड प्रमाणामध्ये आहे. दररोज अजूनही हजारो रुग्ण सापडत आहेत. मृत्यूचे प्रमाण टक्केवारीमध्ये कमी असले, बरे होण्याचे प्रमाण 97 च्या पुढे असले तरी धोक्याची घंटा मोठ्या प्रमाणावरील गर्दीमुळे होत असते यात शंकाच नाही.

मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीमुळे सणांना गालबोट लागते. गणेशोत्सव मंडळे सण उत्सव साजरा करताना मोठ्या प्रमाणात गर्दी व्हावी अशी अपेक्षा ठेवून नसतात. गणेशोत्सव मंडळांना सामाजिक शिस्तीची जाण असतेच. परंतु त्या ठिकाणी येणाऱ्या गर्दीला ही मंडळी तरी काय करणार? लोकांच्या उत्सवी मनाला किती आवरणार मोठा प्रश्नच आहे.

सर्व परिस्थिती उत्सव साजरे करण्यासाठी प्रतिकूल असली तरी सामाजिक उत्सव साजरे होणे गरजेचे आहे. त्यातल्या त्यात लोकांमधील धार्मिकता यानिमित्ताने मारून टाकणे चुकीचे आहे. यापेक्षा लोकांमध्ये सामाजिक शिस्तीची जीवनमूल्ये विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

मागील वर्षी आणि याहीवर्षी कोरोना साथ अस्तित्वात आहे. असे म्हणतात की 2025 पर्यंत ही साथ राहील. ही साथ असताना गणरायाच्या आशीर्वादाची साथ आपल्याला असली पाहिजे. म्हणून आपण गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा करतो.

गणेशोत्सव साजरा करताना आपण गणरायाला सर्व भाविक भक्तांनी प्रार्थना केली पाहिजे .प्रार्थना ही आपल्याला शक्ती देत असते. आपली भक्ती वाढ होत असते. अंतकरणाची पवित्रता वाढ होत असते. आपल्यातील भाव आणि भक्ती यांना फुलोरा निर्माण करीत असते.

यावर्षी गणेशाला आपण प्रार्थना करूया की हे गणराया या कोरोना महासाथीचे लवकर उच्चाटन होऊ दे. आमच्यामध्ये सामाजिक शिस्त येऊ दे. आमच्या चिंता, दुःख, दैन्य,दारिद्र्य यांचा नाश होऊ दे सर्व भक्तांना सर्व जनतेला सुखी आणि समाधानी ठेव.

Essay on Ganesh Chaturthi

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment