डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी Essay on Dr.Sarvapalli Radhakrishnan

डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी Essay on Dr.Sarvapalli Radhakrishnan

 Essay-on-Dr.-Sarvapalli-Radhakrishnan-in-Marathi

डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी Essay on Dr.Sarvapalli Radhakrishnan

विद्येमुळे माणसाच्या जीवनात कृतार्थता आणि श्रेष्ठत्व लाभते. या गोष्टीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होय.भारताचे माजी राष्ट्रपति हे कृतार्थ आणि श्रेष्ठ जीवन जगलेले महान शिक्षक आणि तत्वज्ञ होते. Essay on Dr.Sarvapalli Radhakrishnan in Marathi

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन  यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. उपराष्ट्रपती पदावर कार्यरत असताना डॉक्टर राधाकृष्णन यांना त्यांचे विद्यार्थी भेटले आणि तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे, परवानगी द्या; असे म्हणाले. डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्यांना सांगितले माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी शिक्षक दिन साजरा करा.

५ सप्टेंबर शिक्षक दिन भाषणे

विद्यार्थ्यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी शिक्षक दिन साजरा करण्याचे ठरवले. सन 1965 पासून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉक्टर राधाकृष्णन आंध्र प्रदेशातील तिरुपती जवळ असणाऱ्या तिरुत्तानी नावाच्या एका खेड्यात 5 सप्टेंबर 1888 या दिवशी जन्मले. सर्वपल्ली हे आंध्र प्रदेशातील एक खेडे आहे. डॉ. राधाकृष्णन यांचे पूर्वज ज्या ठिकाणी राहत. त्या प्रदेशात असणाऱ्या प्रथेला अनुसरून नावापूर्वी गावाचे नाव लिहिले जाते. म्हणून राधाकृष्णन यांच्या नावांमध्ये सर्वपल्ली हे गावाचे नाव आले आहे.

5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन

राधाकृष्णन यांचे वडील एका जमीनदाराच्या हाताखाली लेखनिक म्हणून काम करीत. वडिलांचे नाव वीरस्वामी होते.  आईचे नाव सिताम्मा होते.  वडील साधे राहणीमान असणारे आणि बेताची सांपत्तिक स्थिती असणारे होते. त्यामुळे राधाकृष्णन आपल्याच गावातील प्राथमिक शाळेत गेला. तिथेच शिकला.

वेल्लोरच्या ह्युरिस कॉलेज आणि चेन्नईच्या ख्रिश्चन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. जवळजवळ बारा वर्षे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी चालवलेल्या शाळांमध्ये राधाकृष्णन यांचे शिक्षण झाले. येथे विद्यार्थिदशेत असताना राधाकृष्णन यांनी हिंदू धर्माचा होत असलेला तेजोभंग पहिला. भारतीय संस्कृतीला तेजोहीन मानले जात होते. हे अनुभवले. त्याचवेळी (1893) विवेकानंदांच्या विजय वार्तेने भारतीयांची मने मोहरून आली होती. विवेकानंदांची ही प्रेरणा घेऊन हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्याचे राधाकृष्णन यांनी ठरवले.

14 सप्टेंबर हिंदी भाषा दिवस

सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये राधाकृष्णन यांनी प्रथम श्रेणीचे यश संपादन केले. एम. ए. साठी त्यांनी “वेदांतातील नीतिशास्त्र” Ethics of Vedanta विषय निवडला. आपल्या तर्कबुद्धीचा आणि प्रज्ञेचा वापर करून अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी हा प्रबंध लिहिला. पुढे हा या विषयाचा प्रबंध ग्रंथरूपात प्रसिद्ध झाला. त्यावेळी राधाकृष्णन फक्त वीस वर्षांचे होते.

सन 1909 मध्ये सर्वपल्ली यांची मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे सर्व प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. या काळामध्ये त्यांनी आपला विद्याव्यासंग चालूच ठेवला. पाश्चात्य राष्ट्रातील शेक्सपियर, वर्डस्वर्थ, ब्राऊनिंग, मॅथ्यू अर्नाॅल्ड, वॉल्ट व्हिटमन इत्यादी साहित्यकारांच्या साहित्यकृतींचा आस्वाद घेतला. प्लेटो, प्लॉटनिस, कांट,ब्रॅडले अशा पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांच्या संप्रदायांचा त्यांनी सखोल अभ्यास केला.

दिनविशेष ऑक्टोबर महिना

‘द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर,’ ‘द रीजन ऑफ रेलिजन इन कंटेम्पररी फिलोसोफी,’ ‘ इंडियन फिलोसोफी’ हे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रसिद्ध ग्रंथ होत. ऑक्सफर्ड विद्यापीठाने हिंदूंचा जीवनविषयक दृष्टिकोन या विषयावर राधाकृष्णन यांची व्याख्याने आयोजित केली. ती सुद्धा पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाली. कलकत्ता विद्यापीठाने तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक पदासाठी राधाकृष्णन यांना निमंत्रित केले. स्पाॅलडिंग नावाच्या एका विद्याप्रेमी व्यक्तीने ऑक्सफर्ड विद्यापीठात राधाकृष्णन यांच्यासाठी एक विद्यासन निर्माण केले.

कर्नाटक मधील मैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरविले अशाप्रकारे सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अनेक मानसन्मान मिळत गेले. इंग्लंडमध्ये असताना एका सभेमध्ये पंतप्रधान ॲन्थनी ईडन यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे कौतुक केले. ते म्हणाले,” डॉक्टर राधाकृष्णन यांच्या भाषणानंतर बोलताना नांगरलेल्या शेतातून ठेचकाळत, अडखळत, कोसळत चालणाऱ्या एखाद्या मुलाप्रमाणे माझी स्थिती झाली आहे.”

सन 1931 या वर्षी आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून राधाकृष्णन नियुक्त केले गेले सुमारे सहा वर्षे या विद्यापीठांमध्ये कर्तव्य पार पाडत असताना आंतरविद्यापीठ कळताच नेले. सन 1939 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी राधाकृष्णन यांच्याकडे बनारस हिंदू विद्यापीठाची सूत्रे दिली. त्याही विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. या दोन्ही विद्यापीठांमध्ये काम करीत असतानाही डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या प्राध्यापक वृत्तीचा त्याग केला नाही. पदाचा त्याग केला नाही.

ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये वर्षातील काही महिने त्यांना अध्यापन करण्यास संधी मिळाली अशी वीस वर्ष त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. कलकत्ता विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना बनारस विद्यापीठाचा प्रशासकीय कारभार ते शनिवार – रविवार या दिवशी पहात.

एका प्राध्यापकाने आंध्रा, म्हैसूर, कलकत्ता, बनारस, ऑक्सफर्ड अशा विद्यापीठांमध्ये एकाच वेळी प्राध्यापक आणि कुलगुरू ही दोन्ही पदे सांभाळत अध्यापनाचे कार्य करणे हे अपवादभूत आणि आश्चर्यजनक उदाहरण आहे.

सन 1931 ते 1939 या दरम्यान संयुक्त राष्ट्र संघटनेत राधाकृष्णन यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. यही ठिकाणी सर्वपल्ली आपल्या या कार्याचा अनमोल ठसा उमटवला आहे.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने धर्म आणि संस्कृतीच्या या महान अभ्यासकाला रशियामध्ये सन 1949 ते 1952 या कालावधीसाठी पाठवले. रशियाचे अध्यक्ष स्टॅलिन यांच्या जीवनावर अखेरच्या काळात राधाकृष्णन यांचा विचारांचा पगडा तयार झाला. रशियासारख्या एक साम्यवादी विचारसरणीच्या राष्ट्रप्रमुखावर सर्वेपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचा प्रभाव हा भारतीय संस्कृतीच्या प्रभावासारखाच आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारत राष्ट्राने सन 1952 ते 1962 अशी 10 वर्षे उपराष्ट्रपती पदावर काम करण्याची संधी दिली. राधाकृष्णन यांचा कार्यकाळ हा अतिशय भारतीय संस्कृतीचा जगभर तत्वज्ञानाचा सुगंध येणारा काळ ठरला.

सन 1954 मध्ये भारत सरकारने भारताच्या या महान सुपुत्राला भारतरत्न हा सर्वोच्च किताब बहाल केला. त्याहीपूर्वी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज या इंग्लंडमधील विद्यापीठांनी सर्वपल्लींना सन्माननीय डॉक्टर आहेत ही पदवी दिली होती.

सन 1962 मध्ये हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांनी राष्ट्रपती म्हणून अतिशय गौरवपूर्ण कारभार केला. पुढेही आणखी पाच वर्षे आपणच कारभार पहावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली. परंतु त्यांनी अतिशय नम्रपणे ह्या गोष्टीस नकार दिला.यातून त्यांची नम्रता दिसून येते.

स्वामी विवेकानंदानंतर आपल्या ओजस्वी वक्तृत्वाने आणि तेजस्वी बुद्धीने जगभर कीर्ती पावलेला श्रेष्ठ विचारवंत म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नाव घेतले जाते.इतके मोठे त्यांचे कार्य होते. स्वामी विवेकानंदांच्या मार्गाने जाणारा आणि वैचारिक उंची जगाला देणारा एक ओजस्वी वक्ता आणि तेजस्वी तत्त्वज्ञान म्हणजेच राधाकृष्णन होत.

राष्ट्रपती पदापर्यंत डाॅ. राधाकृष्णन पोहोचले. परंतु त्यांनी आपली राहणे सदैव साधीच ठेवली. राधाकृष्णन यांचे राहणीमान हे साधे होते.  ते सर्वसामान्य माणसाप्रमाणे आहार-विहार करत. ” मी एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच आयुष्य जगतो. सर्वसामान्य माणसांप्रमाणेच माझी सुखे आणि दुःखे आहेत.” असे ते एकदा म्हणाले होते. आपले सामान्यपण त्यांनी असे जपले होते.

चेन्नई शहरामध्ये आयुष्यातील शेवटचे दिवस राधाकृष्णन यांनी घालवले.जगभरातील विद्वान त्यांना त्याठिकाणी भेटावयास येत. त्यांचे विद्यार्थी त्याठिकाणी भेटण्यासाठी येत. एक प्राध्यापक अर्थात शिक्षक म्हणून घेण्यात राधाकृष्णन यांना आनंद वाटत असे.ते खरे ज्ञानयोगी तत्वज्ञ होते.

प्लेटो या महान तत्वज्ञाने तत्वज्ञ राजा ही संकल्पना मांडली होती. प्लेटोच्या संकल्पनेतील आधुनिक काळातील तत्वज्ञ राजा म्हणून भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांचे नाव घेता येईल.सार्‍या जगाने मान्य केले होते.हे विशेष. एक तत्वज्ञ राष्ट्रपती अर्थात राजा एका खंडप्राय देशामध्ये नेतृत्व करतो ही गोष्ट आधुनिक काळातील राजनीति तज्ञांना अभ्यास मुलक ठरली.

tचेन्नई या ठिकाणी आपल्या ‘गिरीजा’ नामक निवासस्थानी दिनांक 17 एप्रिल 1975 या दिवशी सर्वपल्ली राधाकृष्णन या भारतमातेच्या श्रेष्ठ सुपुत्राने जगाचा कायमचा निरोप घेतला. परमेश्वराने आपल्या हृदयामध्ये या महान शिक्षकाला आणि तत्त्वज्ञाला नक्कीच स्थान दिले असेल.जग एका महान शिक्षकाला मुकले.

डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी Essay on Dr.Sarvapalli Radhakrishnan in Marathi.

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment