शेतकरी आत्महत्या कारणे निबंध Essay on causes of farmers suiciding

शेतकरी आत्महत्या कारणे निबंध Essay on causes of farmers suiciding

Essay on causes of farmers suiciding    शेतकरी हा अन्नदाता आहे. जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यांनी पिकलेलं अन्न जगभरातील प्रत्येक माणूस खात असतो. त्यामुळे तो एक प्रकारे त्याचा ऋणी आहे.असे असले तरी आज महाराष्ट्रात आणि एकूणच भारतामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे अतिशय भयावह चित्र आहे.

Essay on causes of farmers suiciding

देशभरामध्ये तासाला दोन आत्महत्या होत आहेत.
1995 ते 2011 या दरम्यान भारतामध्ये जवळजवळ 750830 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. दरवर्षी साधारणतः 14 ते 15 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात म्हणजे दिवसाला साधारण 40 आत्महत्या होतात असे नॅशनल सॅम्पर सर्वे ऑर्गनायझेशनने नोंदविले आहे.

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण देशांमध्ये सर्वात जास्त आहे. हे एकूणच महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला धक्का देणारे वास्तव चित्र आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही एक राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची अतिशय निकडीची गरज आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे Essay on causes of farmers suicide

शेतीसाठी आर्थिक मदत कमी होणे

1991 च्या आर्थिक सुधारणा नुसार देशभरामध्ये शेतकऱ्यांना दिली जात असलेली सबसिडी कमी झालेली आहे. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना शेती करताना आणि पिके घेताना जो भांडवली खर्च येतो.त्याची तोंडमिळवणी करणे अतिशय जिकिरीचे झाले आहे. शेती निसर्गाच्या लहरीपणावर जास्त अवलंबून आहे. गुंतवलेले आर्थिक भागभांडवल आपल्या पिकाच्या उत्पन्नातून  पुन्हा प्राप्त करणे शेतकऱ्यांना फार कठीण जात आहे.

शेतीमालाला बाजार भाव न मिळणे

खुल्या आर्थिक धोरणामुळे परदेशातून अन्नधान्याची मोठ्या प्रमाणावर आयात होते महागाई वाढू नये म्हणून सरकार अन्नधान्य आयात करते.  यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकविलेल्या अन्नधान्याला भाजीपाल्याला पाहिजे तसा बाजार भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उदासीनता निर्माण झालेली आहे.आपले आर्थिक चक्र कसे चालवावे हे शेतकर्‍यांपुढे उभे राहिलेले फार मोठे गंभीर संकट असते. बऱ्याचदा शेतीमाल चांगला पिकू नये मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला आणि अन्नधान्याला कवडीमोलाने आणि बऱ्याचदा हमीभाव पेक्षाही कमी दराने व्यापारी खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्याला गुंतवलेले भांडवल सुद्धा पुन्हा उभे करणे शक्य होत नाही.

खाजगी सावकारी व कर्जबाजारीपणा

शेतकरी आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्याचप्रमाणे शेतीसाठी भागभांडवल म्हणून अनेकदा खाजगी सावकारांकडून तसेच पतसंस्था कडून कर्ज उचलताना दिसून येतो. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मोठ्या व्याजदराचा सामना करावा लागतो. जगभरामध्ये व्याजाचे प्रमाण अल्प असतानाही भारतात खाजगी सावकार आणि पतसंस्था मोठा व्याजदर लावतात. त्यामुळे कर्ज परतफेड शेतकऱ्यांना शक्य होत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतात प्रत्येक ऋतूमध्ये असणारे पिके घेण्यासाठी भागभांडवल गरजेचे असते. एखाद्या हंगामात भांडवलही गेले आणि पुन्हा पुढील पिकासाठी आर्थिक चणचण भासू लागली की शेतकरी नैराश्यग्रस्त होतो. त्यातूनच खाजगी सावकार आणि खाजगी पतसंस्था कर्ज तगादा लावतात.  त्यामुळे शेतकरी आपली मनस्थिती गमावून बसतो.

रूढी व परंपरा

काही भागांमध्ये आजही अनेक कालबाह्य रूढी व परंपरा टिकून आहेत. उदाहरणार्थ लग्न ठरवताना मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला जातो. शेतकरी यासाठी कर्ज तरी काढतो किंवा आपली जमीन तरी विकतो. त्याच्याकडे हुंडा देण्यासाठी पैसा नसतो. लग्न करण्यासाठी आवश्यक पैसा नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. लग्न समारंभ हा फार मोठ्या आर्थिक गळीचा आणि कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कालबाह्य रूढी-परंपरा शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. हे समाजजीवनातील एक विदारक आणि अस्तित्वावर निर्माण करणारे प्रश्नचिन्ह आहे.

सिंचन सुविधांचा अभाव

शेतकरी प्रामुख्याने जिरायती शेती करून आपले कुटुंब चालवतात पुरेशा जलसिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे शेतकर्‍यांना जिरायती शेतीत करावी लागते. बागायती शेती करून नगदी पिके घेण्यासाठी पुरेशा जलसिंचन सुविधा असणे गरजेचे आहे. परंतु विकासाचा असमतोल आणि अनुशेष भरून काढणे कोणत्याही सरकारला अद्याप शक्य झालेले नाही. नगदी पिके घेण्यासाठी पुरेशा जलसिंचन सुविधा जोवर निर्माण होत नाहीत; तोवर शेतकऱ्याकडे आर्थिक समृद्धी येणे शक्य नाही हे वास्तव स्वीकारण्याची गरज आहे.

आर्थिक साक्षरतेचा अभाव

शेतकऱ्यांना आर्थिक साक्षरतेच्या अभावामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक साक्षरता निर्माण होणे काळाची गरज आहे.शेतकरी जेव्हा एखादी पिक घेतो. तेव्हा त्यामागचे अर्थकारण केवळ ढोबळ मानाने न स्वीकारता निश्चित अशा धोरणाने शेतकऱ्यांनी पिके घेण्याची गरज आहे.

वाढत्या भौतिक गरजा

पूर्वीच्या काळी शेतकरी राहत असलेले गाव स्वयंपूर्ण असे त्याच्या भौतिक गरजा ह्या मर्यादित होत्या परंतु बदलत्या काळामध्ये भौतिक गरजा वाढलेल्या आहेत घरामध्ये विविध भौतिक सुविधांचा अभाव शेतकऱ्यांना सहन होत नाही सध्याच्या काळातील शेती ही भांडवली झाल्यामुळे विविध प्रकारची यंत्रे वापरून शेती करावी लागते.

नैसर्गिक आपत्ती

दुष्काळ गारपीट चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्ती यांनी शेतकरी अक्षरशहा मोडून पडतो पिकांचे अपरिमीत असे नुकसान होते त्यामुळे कोणत्याही पिकासाठी गुंतवलेले भांडवल पुन्हा उभे करणे अशक्य होते नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होतो दुष्काळामुळे एकशिपी घेता येत नाही गारपिटीमुळे पिके उध्वस्त होतात चक्रीवादळामुळे घरे-दारे ही व दोस्त होतात त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्ज काढतो सरकारने दिलेली मदत तुटपुंजी ठरते त्यामुळे शेतकऱ्याला आपले जीवनमान अतिशय दारिद्र्यात काढावे लागते नैसर्गिक आपत्तीचे दुष्टचक्र हे सातत्याने चालूच असते त्यामुळे शेतकरी पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी मनाने तयार झाला तरी त्याच्यापाशी आवश्यक असे धन नसल्यामुळे नैराश्यग्रस्त होतो.

अल्पभूधारक शेतकऱ्यांचे वाढते प्रमाण

भारतामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येते मुळातच शेती कमी असल्यामुळे पाहिजे तितके उत्पादन आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न कमीच असते त्यातही निसर्गाचा लहरीपणा बाजार भावांचा अभाव यामुळे शेतकऱ्याला आपल्या अल्प अशा जमिनीमध्ये पाहिजे तितके उत्पादन घेता येत नाही परिणामी उत्पन्नही कमी येते आर्थिक उत्पन्न कमी आल्यामुळे आपल्या दैनंदिन गरजा भागविणे शक्य होत नाही. लोकसंख्येबाबत साक्षरतेचा अभाव असल्यामुळे अल्पभूधारक त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे एवढेच नव्हे तर शेतकरी भूमिहीन होऊन शहरांकडे स्थलांतरित होताना दिसून येतो.

प्रक्रिया उद्योगाची कमतरता

शेतकरी जे पीक आपल्या शेतामध्ये घेतो त्यावर असलेल्या प्रक्रिया उद्योगाची कमतरता हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागील एक मोठे कारण समजता येईल बऱ्याचदा प्रचंड उत्पादन ठेवू नये शेतकऱ्याला बाजार भाव मिळत नाही कारण त्या उत्पादनाला मागणी नसते शेतमालाची प्रक्रिया करून जर हा अतिरिक्त उत्पादित झालेला शेतमाल उद्योगांकडे गेला तर शेतकरी आपला आर्थिक उत्पन्न तर चांगल्या ठेवू शकतो यासाठी अधिकारी प्रक्रिया उद्योगांची उभारणी ग्रामीण भागातच होणे आवश्यक आहे.

शिक्षणाचा अभाव

आपण पाहतो की शेतकरी हे अल्पशिक्षित असतात शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेणे हे परवडण्यासारखे नाही त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचा मार्ग शेतकऱ्यांपुढे असला तरी त्यांच्या आर्थिक तारांमुळे त्यांना शक्य होत नाही शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे आपण म्हणतो हे खरेच आहे परंतु सध्याच्या काळामध्ये कौशल्यपूर्ण उच्चशिक्षणाची अतिशय गरज आहे परंतु हे शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणारी आर्थिक स्थिती शेतकऱ्याची नाही त्यामुळे तो आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकत नाही मुलांच्या अपेक्षा आकांक्षा महत्वकांक्षा पूर्ण करणे शेतकऱ्याला जवळजवळ अशक्य बनून जाते ही परिस्थिती शेतकऱ्यांना नैराश्याकडे घेऊन जाण्यास पुरेशी ठरते.

शासकीय पातळीवरील उदासीनता

कोणतेही सरकार शेतकऱ्यांसाठी काही ना काही चांगले निर्णय घेत असते असे आपण सकारात्मक विचार करताना म्हणू शकतो परंतु ग्राउंड लेव्हल ला परिस्थिती वेगळीच असते शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा आणि सवलती देत असताना विविध प्रकारचे अडथळे पार पाडावी लागतात शासनाचे अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांकडे आपुलकीच्या दृष्टीने पाहत नाहीत शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे एका शेतकऱ्याच्या मनोभाव आतून शेतकऱ्यांना शासकीय पातळीची उदासीनता कमी करून मदत दिली गेली पाहिजे.

वरील काही समस्या व्यतिरिक्त आळस अज्ञान अंधश्रद्धा ग्रामीण भागातील अपुऱ्या सुविधा दैववाद अनावश्यक भीती सकारात्मक जीवन शैली चा भाव इत्यादी गोष्टी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरतात.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment