डॉक्टर आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य Doctor Ambedkar Yanche shaixanik kary

डॉक्टर आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य Doctor Ambedkar Yanche shaixanik kary

डॉक्टर आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य Doctor Ambedkar Yanche shaixanik kary

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. परंतु बहुजन समाजातील गोरगरीब आणि दीनदलित लोकांसाठी त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य हे फारसे प्रकाशात आलेले नाही. तरी डॉक्टर आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य Doctor Ambedkar Yanche shaixanik kary अतिशय भरीव स्वरूपाचे आहे. या ठिकाणी आपण त्यांच्या शैक्षणिक कार्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

शिक्षण हे वाघिणीचे दूध

मध्यप्रदेशातील महू या ठिकाणी 14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेल्या भीमरावांनी लहानपणापासून अतिशय जिज्ञासू वृत्ती ठेवून देश परदेशामध्ये हालअपेष्टा सोसून अनेक मोठ्या पदव्या मिळवल्या. आदर्श विद्यार्थी कसा असावा याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. स्वतः कष्टपूर्वक उच्चविद्याविभूषित होऊन संपूर्ण भारतीय समोर त्यांनी ठेवलेला आदर्श खूप वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.शिक्षणाचे महत्त्व बाबासाहेबांनी जाणले होते. आपला गोरगरीब, दीनदलित समाज, बहुजन समाज जर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वर आणायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. त्यामुळेच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे दुध या समाजाला दिले तर तो आपले हक्क आणि न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. याची पुरेपूर जाणीव बाबासाहेबांना होती; म्हणूनच त्यांनी” शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.” असा एक धारदार आणि संदेश समाजाला दिला. या संदेशाचा अजूनही भारतीयांना विसर पडला नाही आणि पुढेही पडणार नाही.

बहिष्कृत हितकारिणी सभा

दीनदलित आणि गोरगरीब बहुजन समाजाच्या शैक्षणिक स्थितीला उंचावण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. या संस्थेच्या मदतीने दीनदलितांच्या शैक्षणिक स्थितीमध्ये सुधारणा व्हावी आणि सामाजिक व आर्थिक दृष्ट्या समाजाची परिस्थिती सुधारावी हा उद्देश मनात ठेवून 4 जानेवारी 1925 या दिवशी सोलापूर याठिकाणी बाबासाहेबांनी एक वसतिगृह स्थापन केले. गरीब आणि दलित विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्यही या संस्थेच्या मदतीने पुरवली. या ठिकाणी मोफत वाचनालय सुद्धा सुरू केले. त्यामुळे सोलापूर परिसरातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हक्काचे ठिकाण निर्माण झाले.

दलित शिक्षणसंस्थेची स्थापना

दीनदलित आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर लोटल्या गेलेल्या बहुजन वर्गातील गोरगरीब मुलांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 जून 1928 रोजी दलित शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यावेळच्या मुंबई सरकारकडे त्यांनी या संस्थेला मदत देण्यासाठी आवाहन केले. माध्यमिक शिक्षण हे अतिशय गरजेचे असल्यामुळे आणि दलित शिक्षण संस्था आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे असे आवाहन करणे गरजेचे होते. मुंबई सरकारने या संस्थेला 5 वस्तीगृहे मंजूर केली.मुंबईच्या गव्हर्नरने दरमहा नऊ हजार रुपये अनुदान या वसतिगृहांसाठी दिले. अर्थात ते कमी पडू लागल्यानंतर बाबासाहेबांनी पारशी आणि मुस्लिम समाजातील धर्मादाय संस्थांकडून देणग्या मिळवल्या व हे कार्य नेटाने पुढे नेले.

पीपल्स एज्युकेशन सोसायटी

शिक्षण देऊन समाजाचे पुनरूत्थान घडवून आणायचे असेल तर शैक्षणिक संस्थांची आवश्यकता असते. हे बाबासाहेबांनी जगभरामध्ये शिक्षण घेत असताना अनुभवले होते.त्याचाच परिपाक म्हणून अस्पृश्य समाज व निम्न मध्यमवर्गीय समाजाला उच्च शिक्षण देणे आवश्यक असल्याने बाबासाहेब आंबेडकरांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पुढाकारातून बाबासाहेबांनी मुंबई आणि औरंगाबाद येथे महाविद्यालयांची स्थापना केली.

1946- मुंबई येथे सिद्धार्थ व कला विज्ञान महाविद्यालय सुरू केले.

1950 – मराठवाड्यातील औरंगाबाद मध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू केले.

1953 – मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय सुरू केले.

1956 – मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरू केले.

ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पाॅलिटिक्स

मुंबईमध्ये 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदीय शिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून राजकारण,अंदाजपत्रक,कामगार संघटना, संसदीय कामकाज विषयक नियम व परंपरा इत्यादी गोष्टींचे शिक्षण देण्याची सोय बाबासाहेबांनी करून दिली.

वर्तमानपत्रांमधून लोकशिक्षण

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक लोकशिक्षक म्हणूनही भारतीय समाजावर फार मोठा प्रभाव निर्माण करणारे एक अजरामर व्यक्तिमत्व होते. बाबासाहेबांनी समाजाच्या शिक्षणासाठी आणि वैचारिक जागृतीसाठी पाच वृत्तपत्रे सुरू केली होती. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजाचे शिक्षण आणि समाजाच्या उद्धारासाठी आवश्यक असलेले नेतृत्व देत असताना आपले विचार त्यांनी प्रकट केले आहेत. बाबासाहेब करीत असलेले कार्य या वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत असे. त्याचप्रमाणे त्या काळातील विविध विषयांवर असणारी त्यांचे मौलिक विचारसुद्धा त्यामधून प्रकाशित होत असत.

डॉक्टर आंबेडकर हे अतिशय विद्याव्यासंगी मनुष्य होते. यांना प्रज्ञासूर्य म्हटले जाते. डॉक्टर आंबेडकर यांना वाचन आणि ग्रंथ यांची अतिशय आवड होती. त्यांच्या मुंबईतील घराला त्यांनी राजगृह असे नाव दिले होते. त्यांच्याकडे जवळजवळ पन्नास हजार पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह होता. ही पुस्तके त्यांच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान होती.डॉक्टर आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य Doctor Ambedkar Yanche shaixanik kary जाणून घेताना स्वतः डॉक्टर आंबेडकरांचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर उभी आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक दृष्टिकोन अतिशय प्रगल्भ होता. राज्यघटना लिहीत असताना शिक्षण विषयक धोरण आणि आणि कायदे यांचा राज्यघटनेत आवर्जून बाबासाहेबांनी उल्लेख केला आहे. सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी काही खास तरतुदी सुद्धा केल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या शैक्षणिक कार्याला मनःपूर्वक अभिवादन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार Quotes of Dr.Ambedkar

संविधान दिन निबंध Essay on Sanvidhan Din

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment