दिनविशेष ऑक्टोबर महिना Dinvishesh Month October

दिनविशेष ऑक्टोबर महिना Dinvishesh Month October

शालेय शिक्षण देत असताना शिक्षकांना परिपाठामध्ये तीन विशेष याबद्दल माहिती असणे खूप गरजेचे असते. प्रत्येक दिनविशेष याबद्दल परिपाठामध्ये माहिती देणे. हा अतिशय सुंदर उपक्रम आहे.त्या दिवशी घडलेल्या घटनेविषयी विद्यार्थी अधिक जागृत होतात आणि प्रत्येक दिवसाच्या इतिहासाबद्दल त्यांना माहिती होते. वर्तमानामध्ये जगत असताना भूतकाळातील घटनांचा वेध विद्यार्थ्यांना घेता येतो.

१ ऑक्टोबर
ग. दि. माडगूळकर जन्मदिन (१९१९)

ग.दि.माडगूळकर उर्फ गदिमा हे मराठी भाषेतील अतिशय नावाजलेले कवी होते. मराठी भाषेतून रामायणावर आधारित काव्यरचना केली. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे वाल्मिकी असे समजले जाते. रामायणावर आधारित लिहिलेल्या या काव्याला गीत रामायण असे संबोधले जाते. अतिशय सुंदर चाली आणि संगीत यामुळे गीत रामायण प्रत्येक मराठी माणसाच्या घरी पोहोचले आहे. गदिमांनी विविध प्रकारचे साहित्य रचना केली आहे. अनेक चित्रपट गीते त्यांनी लिहिली.

14 सप्टेंबर हिंदी भाषा दिवस

जागतिक वयोवर्धन दिन. (१९९१)

१ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह.

वन्यजीव सप्ताहच्या दरम्यान प्राण्यांच्या संवर्धनासाठी लोक जागृती पर कार्यक्रम आयोजित केले जातात विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.जंगली आणि वने यांचे संवर्धन व्हावे म्हणून वैविध्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन केले जाते.

२ ऑक्टोबर
• राष्ट्रपिता महात्मा गांधी जन्मदिन (१८६९) महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला त्यांचे वडील पोरबंदर संस्थांमध्ये नोकरी करत होते. महात्मा गांधींनी इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर ही पदवी घेतली. पुढे काही वर्षे वकिलीचा व्यवसाय केल्यानंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला.

लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर  भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गांधीजींनी नेतृत्व दिले. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, दांडी यात्रा, निळीचा सत्याग्रह, 1942 छोडो भारत आंदोलन अशी आंदोलने गांधीजीनी केली. 30 ऑक्टोबर 1948 रोजी प्रार्थनेला जात असताना एका माथेफिरूने गांधीजींची हत्या केली.

महात्मा गांधीं वर मराठी निबंध व भाषणे

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री
जन्मदिन (१९०४) मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा प्रकारचे म्हण ज्यांना तंतोतंत लागू पडते. ते म्हणजे भारताचे दुसरे कर्तबगार पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होय. रेल्वेमंत्री असताना एका रेल्वे अपघाताची जबाबदारी घेऊन त्यांनी आपला राजीनामा सादर केला.सन 1965 मध्ये पाकिस्तानने जेव्हा भारतावर आक्रमण केले.

त्यावेळी “जय जवान जय किसान” ही घोषणा देऊन त्यांनी पाकिस्तान वर निर्णय विजय मिळवला. ताश्कंद येथे वाटाघाटी चालू असताना हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. लालबहादूर शास्त्रींच्या काळामध्ये भारताने हरितक्रांतीचे प्रयोग केले. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अमाप पिक पिकवून भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले.

जागतिक अहिंसादिन (२००७)

६ ऑक्टोबर
• राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी स्थापना (१९४९) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुण्याजवळ खडकवासला या ठिकाणी आहे. भारतीय सैन्यदलासाठी लागणारे अधिकारी या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतात.भारताशिवाय अन्य देशातील सैन्यातील अधिकाऱ्यांनाही या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते.

८ ऑक्टोबर वायुसेना दिन (१९३२)

९ ऑक्टोबर
• भारतीय हवाई दलाची स्थापना (१९३१)

१३ ऑक्टोबर.
आल्फ्रेड नोबेल जन्मदिन (१८३३) आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट धातूचा शोध लावला. परंतु या धातूचा दुरुपयोग यामुळे हजारो लोकांचे प्राण गेले. त्याबद्दल त्यांना नेहमी खंत वाटत राहीली. पुढे आयुष्यभरातील कमावलेल्या संपत्तीमधून नोबेल पारितोषिके देण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.आजही त्यांच्या नावाने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र,वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र, जागतिक शांतता यासाठी नोबेल पारितोषिके दिली जातात.

१५ ऑक्टोबर,
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
जन्मदिन (१९३१) अब्दुल कलाम तामिळनाडूतील रामेश्वरम येथे जन्मलेले एक अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. भारताच्या अवकाश कार्यक्रमांमध्ये त्यांनी खूप मोलाची भूमिका बजावली. राष्ट्रपती पदावर असताना अब्दुल कलाम यांनी आपले कार्य जनमानसापर्यंत नेले. 2020 साली भारत प्रगत राष्ट्र होईल असे त्यांचे स्वप्न होते. यांचे अग्निपंख हे पुस्तक फार प्रसिद्ध आहे.

१९ ऑक्टोबर
• चंद्रशेखर सुब्रह्मण्यम जन्मदिन (१९१०)

२० ऑक्टोबर.
राष्ट्रीय एकात्मता दिन (१९६२)

२४ ऑक्टोबर
• संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) दिन (१९४५) 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली संयुक्त राष्ट्र संघटनेनेला इंग्रजीत युनायटेड नेशन्स असे म्हणतात. संयुक्त राष्ट्र संघटना ही आंतरराष्ट्रीय शांतता, मानव अधिकार, सामाजिक प्रगती, आर्थिक विकास,आंतरराष्ट्रीय सुरक्षा याविषयी काम करणारी एक जागतिक संघटना आहे.  जगभरातील जवळजवळ सर्वच देश या संघटनेचे सदस्य आहेत.

२६ ऑक्टोबर
• संत नामदेव जन्मदिन (१२७०) संत नामदेव शिंपी समाजातील थोर विठ्ठलभक्त होते. नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांनी बरोबर भारत भ्रमण केले. ते पंजाबमध्ये गेले असताना तेथील लोकांनी त्यांना आपले गुरू मानले. शीख धर्मीयांच्या पवित्र धर्मग्रंथात म्हणजेच गुरुग्रंथसाहिबमध्ये संत नामदेवांची काही पदे समाविष्ट आहेत. संत नामदेव आहे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते.

संत नामदेव यांनी केलेली अभंग रचना आजही लोकांच्या अभ्यासाचा विषय आहे.  संत नामदेव गाथा म्हणून संत नामदेवांचे अभंग रचना प्रसिद्ध आहे. संत नामदेव संत ज्ञानेश्‍वर,  संत चोखामेळा, संत गोरोबाकाका, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई,संत सोपान देव, संत सावतामाळी यांचे समकालीन संत होते.

२७ ऑक्टोबर
• कविवर्य भा. रा. तांबे जन्मदिन (१८७३) कविवर्य भा रा तांबे यांचे संपूर्ण नाव भास्कर रामचंद्र तांबे असे होते. भा. रा. तांबे हे ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी होते. भा. रा.तांबे यांची जन पळभर म्हणतील हाय हाय ही कविता अतिशय प्रसिद्ध आहे.

२८ ऑक्टोबर
• भगिनी निवेदिता जन्मदिन (१८६७) भगिनी निवेदिता या स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या होत्या. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला भारताच्या पुनरुत्थानासाठी भगिनी निवेदिता यांनी स्वामी विवेकानंदांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठे कार्य केले.

३० ऑक्टोबर.
डॉ. होमी भाभा जन्मदिन (१९०९) डॉ. होमी भाभा हे एक जागतिक कीर्तीचे अणशास्त्रज्ञ होते.अणुशक्ती चा शांततेसाठी उपयोग करणे या गोष्टीला त्यांनी महत्व दिले.

३१ ऑक्टोबर.
पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल
जन्मदिन (१८७५) भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभाई पटेल यांनी शपथ घेतली. भारतामधील सुमारे 550 संस्थाने भारतामध्ये सरदार वल्लभाई पटेल यांनी अतिशय धोरणात्मक दृष्टी ठेवून सामील करून घेतली.  त्यांचे हे योगदान फार मोठे आहे. सरदार ही पदवी त्यांना महात्मा गांधींनी दिली होती.

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी 1984 इंदिरा गांधी या भारताच्या चौथ्या पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.  इंदिराजींनी भारत देशाला अतिशय कणखर आणि दूरदृष्टीचे नेतृत्व दिले. इंदिरा गांधी यांच्या काळात 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. संस्थानिकांचे  तनखे बंद करण्यात आले.  बेचाळिसावी राज्यघटना दुरुस्ती इंदिराजींच्या काळात झाली.  या घटना दुरुस्ती ला छोटी राज्यघटना असे संबोधले जाते.

इंदिराजींच्या काळात भारत पाकिस्तानचे युद्ध 1971 मध्ये झाले पूर्व पाकिस्तान बांगलादेश या नावाने एक स्वतंत्र देश म्हणून इंदिरा गांधींच्या काळातच अस्तित्वात आला. पाकिस्तानचे दोन तुकडे येणाऱ्या एक कणखर पंतप्रधान म्हणून त्यांचे फार मोठे कौतुक केले जाते. या युद्धामध्ये पाकिस्तानचा पूर्ण पराभव झाला होता.

पाकिस्तानचे 90000 सैनिक भारताच्या ताब्यात आले होते. अमेरिकेलाही भारताने या युद्धामध्ये दाद दिली नव्हती. पुढे इंदिराजींनी देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू केली हा निर्णय देशातील जनतेला पटलेला नव्हता त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. असे असले तरी निवडणूका नंतर पुन्हा इंदिरा गांधी यांनी निवडणूक जिंकली. पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधी  यांना संजय गांधी आणि राजीव गांधी यांची दोन मुले होती. यापैकी राजीव गांधी पुढे भारताचे पंतप्रधान झाले.

पंजाबमध्ये उसळलेला अलगाववाद व दहशतवाद रोखण्यासाठी इंदिरा गांधींनी कडक पावले उचलली.  सुवर्ण मंदिरामध्ये लपलेल्या बसलेले अतिरेकी शोधण्यासाठी त्यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार नावाचे अभियान राबवले. पुढे या मध्येच त्यांची हत्या करण्यात आली. तो दिवस 31 ऑक्टोबर 1984  हा होता. भारत देश एका कणखर आणि दूरदृष्टी असलेल्या पंतप्रधानाला मुकला.

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment