चला वाचू आनंदे Chala Vachu Anande

चला वाचू आनंदे Chala Vachu Anande

वाचन म्हणजे प्रगती,वाचन म्हणजे आनंद.Chala vachu anande वाचन म्हणजे व्यक्तीमत्व विकास आणि वाचन म्हणजे संस्कृती हे समान सूत्र लक्षात ठेऊन प्रत्येकाने वाचनाकडे वळावे.

ग्रंथ हे आयुष्यभर मार्गदर्शन करणारे गुरू आहेत. विविध विषयांवरील ग्रंथांच्या वाचनाने ज्ञान संपन्न बनते. विचार आणि आचार समृद्ध होतात. खरेतर वाचन ज्ञानाची अगणित कवाडे खुली करतात. मनोरंजन करतात आणि दुःखाचा क्षणभर का होईना विसर पाडतात. याला आणखीन पुष्टी म्हणून काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील येल विद्यापीठाने केलेल्या संशोधनाचे देता येईल.

पुस्तक वाचनामुळे ज्ञानात भर पडते हे आपण ऐकले वाचले असेल परंतु पुस्तक वाचनाचा आणखीन एक फायदा संशोधनामुळे समोर आला आहे तो समजल्यानंतर एरवी पुस्तक डोळ्यासमोर घेतात डुलकी लागणारे वाचक ही नित्यनेमाने वाचन करण्यास प्रवृत्त होतील.

14 सप्टेंबर हिंदी भाषा दिवस14 September Hindi Bhasha Divas

चांगल्या पुस्तकांचे तल्लीनतेने वाचन केल्याने आयुष्य वाढते. हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. याकरिता येल विद्यापीठाने एक अभ्यास केला होता. त्यासाठी अभ्यासकांनी तीनशेहून अधिक अमेरिकन महिला आणि पुरुषांच्या आरोग्य व सवयींचा सलग बारा वर्ष अभ्यास करून हा निष्कर्ष काढलेला आहे.

चांगली कथा वाचल्याने मेंदू सक्रिय राहून ताणतणावापासून मुक्ती मिळते असे अभ्यासकांना आढळून आले आहे त्यामुळे दररोज तीस मिनिटे वाचन करण्याची सवय ही उपयुक्त ठरू शकते. दैनिके व नियतकालिकांपेक्षाही ग्रंथ वाचनाने मेंदू अधिक सक्रिय राहून त्यामुळे आयुष्य वाढते.

अलीकडे दूरदर्शन, केबल टीव्ही,अँड्रॉइड मोबाइल, इंटरनेट आणि कॉम्प्युटर्स यांचा सर्रास होणारा वापर यामुळे तरुणांमध्ये आणि मोठ्यांमध्ये देखील वाचनाची आवड कमी कमी होत असल्याचे दिसत आहे. लोकसंख्या वाढते पण त्या प्रमाणात पुस्तक प्रकाशनांची संख्याही वाढते पण त्यांचे वाचन करणारे मात्र घटतच आहे. वाचन संस्कृती लोप पावते की काय अशी भीती तज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

वाचन प्रेरणा दिन Reading Motivation Day

व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये वाचनाचे खूप महत्त्व आहे. तिचे वाचन जितके विविध अंगांनी समृद्ध असेल तितके तिचे व्यक्तिमत्त्व अधिक परिपक्व होण्यास मदत होत असते. माणसाला ज्या काही चांगल्या सवयी असतात त्यामध्ये वाचनाच्या सवयीला बरेच वरचे स्थान देता येईल. वाचनाची सवय ही दुःख विसरायला लावून विरंगुळा देते, जीवनात सुसंगती आणते व मनोरंजनाबरोबरच जगातील अफाट ज्ञानाची गणित कवाडे खुली करते.

वाचनाने माणूस बहुश्रुत आणि सुसंस्कृत होतो कित्तेक चांगल्या पुस्तकांनी कित्येकांची जीवन घडविले आहे. अनेकांनी उत्तम पुस्तकातून स्फूर्ती मिळवलेली आहे. जीवनाला उत्तम दिशा दिले आहे वाचनामुळे प्रतिभासंपन्न साहित्याचा आणि नव विचारांचा आस्वाद घेण्याची कुवत वाढत जाते आणि माणसांची मने सागरासारखी विशाल बनतात.

 तसे तर ग्रंथ वाचनाचे खूप सारे फायदे आहेत. जगातील 75 ते 80 टक्के  ज्ञान ग्रंथ रूपाने प्रकाशित झालेले आहे. हे ज्ञान समजून घेण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक गुरुची नक्कीच आवश्यकता असते तरीही कित्येकांनी ग्रंथांना गुरु म्हणून आपले ज्ञान भांडार विस्तृत केले आहे तर कित्येकांनी गुरु मुखातून मिळालेल्या ज्ञानाला ग्रंथ रूपातील ज्ञानाची जोड दिलेली आहे.मानसिक आनंद मिळवण्यासाठी आणि आपला ज्ञानसंग्रह विशाल बनविण्यासाठी वाचन केले पाहिजे.ही प्रवृत्ती समाजामध्ये विशेष प्रमाणात  असल्याचे दिसून येत नाही. ही कित्येक लोक आपला फावला वेळ साध्या व फालतू गोष्टींमध्ये घालवतात.चार चौघे मिळून गप्पाटप्पा करणे, दुसऱ्यांची टिंगलटवाळी करणे इतरांच्या भानगडींची चर्चा करणे व्यसनाधीन होणे,आळशा सारखे लोळत पडणे इत्यादी गोष्टीतून विकृत आणि नकारात्मक आनंद मिळवतात आणि आपला  मौल्यवान वेळ फुकट घालवतात. अशा लोकांना जर वाचनाची आवड गोडी लावता आली तर त्यांच्यात सकारात्मक बदल घडविणे शक्य होणार आहे. ज्या व्यक्तीला वाचनाची आवड नाही  तिच्या मध्ये ती निर्माण करण्यासाठी मुद्दामहून प्रयत्न केले पाहिजे खरंतर  वाचनाची आवड ही एकाएकी निर्माण होत नसते कारण ती एक प्रवृत्ती असल्यामुळे हळूहळू विकसित केली पाहिजे.एखाद्या चांगल्या छंदातून जसा आनंद मिळतो तसा वाचन रूपी छंदातून आनंद मिळविण्यास शिकले पाहिजे. वाचनाचा आणि मिळणाऱ्या फायद्याचा विचार केला पाहिजे वाचनाची आवड जोपासली पाहिजे. तसे मनाला वळण लावले पाहिजे.

जगात कीर्ती शिखरावर पोचलेल्या नामांकित मान्यवरांच्या चरित्राचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांच्यापैकी बहुतेकांना वाचनाचे विलक्षण वेड होते. त्यांच्या यशाचे आणि उत्तुंग कर्तृत्वाचे रहस्य त्यांच्या ग्रंथ वाचनामध्ये दडलेले दिसून येते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार Quotes of Dr.Ambedkar

वाचनाचा त्यांना त्यांच्या जीवनात खूपच लाभ झालेला पहावयास मिळतो वाचनामुळे त्यांना बुद्धीला आव्हान देणार्‍या नवनवीन समृद्ध आणि सृजनशील कल्पना सुचल्या. त्यांचे काही वाचन हे वरवरचे आनंद मिळविण्याकरिता व सहज वेळ घालवण्या करीता होते. तर बरेचसे वाचन हे मन लावून व सखोलपणे केलेले होते. या थोरांचे एकंदर कार्य एवढे प्रचंड होते की की त्यातून वाचण्यासाठी स्वतंत्र वेळ काढणे त्यांना शक्य नव्हते तरी त्यांनी वेळात वेळ काढून वाचन केले त्यातून स्वतःबरोबरच समाजालाही काही चांगले दिले. लोकमान्य टिळकांनी तर ग्रंथाना गुरु म्हणून तसा संदेश समाजाला दिला.

वाचन 

महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू,डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायमूर्ती रानडे इत्यादींनी ग्रंथांचे मोल जाणले होते त्यांचा ग्रंथ वाचनाचा व्यासंग दांडगा होता .त्यामुळेच अचाट अतुलनीय असं कर्तृत्व करू शकले. संत रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथ ग्रंथ वाचनाचे महत्व तपशीलवारपणे दिले आहे.अमेरिकेचे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन इंग्लंडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना तर पुस्तक वाचनाचे प्रचंड वेड होते. ते वेळात वेळ काढून पुस्तकांच्या सहवासात रमत. वाचनाने त्यांचे व्यक्तिमत्व अधिक परिपूर्ण केले होते.

भविष्याचा वेध घेण्याची कर्तुत्ववान शक्ती त्यांच्यात ग्रंथ वाचनाने निर्माण झालेली होती एडिसन तत्त्वज्ञ म्हणायचे ग्रंथ म्हणजे मानवाची शिक्षण ग्रंथ म्हणजे त्याची प्रगती आणि ग्रंथ म्हणजेच त्याची संस्कृती होय. माणसाला वाचन कला आणि लिखित ग्रंथाचे वरदान लाभले नसते तर त्याचे जीवन निरस झाले असते एखाद्या ग्रंथातील चांगले विचार एका व्यक्तीच्या जीवनालाच नव्हे तर अनेक पिढ्यांना शतकानुशतके उपयुक्त ठरतात हा इतिहास आहे.

उत्तम ग्रंथांचे वाचन हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण मानले जाते. वाचनामुळे ज्ञानाचे भव्य दालन खुले होते. अनेक विद्या शास्त्रे कला साहित्य इत्यादी गोष्टी ग्रंथामुळे जगभर पसरलेले आहेत. शिक्षणाने माणूस सुशिक्षित बनतो, संभाषणाने हजरजबाबी होतो. पण माणसाला पूर्णत्व मात्र वाचनानेच येते. चला तर मग वाचन प्रेरणा दिन दररोज अर्धा तास चांगल्या ग्रंथांच्या वाचनासाठी देण्याचा संकल्प करूयात आणि ताण मुक्त होऊन सुजाण, सुसंस्कृत भारत घडवूया.
धन्यवाद…

ग्रंथपाल,
सचिन उदय वाघ
सि.गो. पाटील महाविद्यालय साक्री(धुळे)

Share on:

1 thought on “चला वाचू आनंदे Chala Vachu Anande”

  1. सरजी, अत्यंत वाचनीय लेख आहे. आपले हार्दिक अभिनंदन !👍🏻👍🏻

Leave a Comment