भविष्यातील दळणवळण निबंध Bhavishyatil Dalanvalan Nibandh

भविष्यातील दळणवळण निबंध Bhavishyatil Dalanvalan Nibandh

भविष्यातील दळणवळण निबंध Bhavishyatil Dalanvalan Nibandh या विषयावर राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त निबंध लेखन केलेले आहे. निबंध स्पर्धांसाठी हे निश्चितच आपल्याला उपयुक्त राहील.

विज्ञानाची प्रगती होत असताना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने खूप मोठे वैविध्य आणले आहे. दळणवळण क्षेत्र याला अपवाद नाही. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या काळात संशोधन आणि विकास मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. पूर्वीच्या काळातील उंटगाडी, घोडागाडी, बैलगाडी, रथ इत्यादी वाहनांचा विसर पाडायला लावणाऱ्या वाहनांचा शोध सुरू झाला. चार चाकी गाडी प्रगत देशात आली आणि आता विकसनशील देशांमध्येसुद्धा प्रत्येकाच्या घरी-दारी येत आहे. या क्षेत्रामध्ये इतकी प्रचंड क्रांती झाली आहेत की 21 व्या शतकातील विज्ञान आणि तंत्रज्ञान उडत्या गाड्यांचा शोध लावून बसले आहे. नजीकच्या भविष्यकाळात हे तंत्रज्ञान निश्‍चितच वापरले जाऊ लागेल असे वाटते.

स्वयंपाकघरातील विज्ञान निबंध Vidnyan

बदल हा निसर्गाचा नियम आहे. फार फार प्राचीन काळापासून अश्मयुगीन मानव उत्क्रांत होत आला. मानवाच्या उत्क्रांती बरोबरच दळणवळणाच्या साधनांमध्ये सुद्धा उत्क्रांती झाली आहे आणि सध्याचे युग तर क्रांतिकारक शोधांचे आहे. पायी चालणारा माणूस घोडा, गाढव,खेचर,उंट अशा प्राण्यांचा उपयोग माणूस दळणवळणासाठी एकेकाळी करू लागला.पुढे चाकाचा शोध लागल्यानंतर दगडी चाके असलेले रथ शोधले गेले. रथांचा वापर सुरू झाल्यानंतर त्यामध्ये बदल होत असताना दगडी चाकांची जागा हलक्या वजनाच्या चाकांनी घेतली. पुढे शेकडो वर्षे असेच चालत राहिले. मात्र अठराव्या शतकात विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे जी औद्योगिक क्रांती सुरू झाली त्यामुळे दळणवळण क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड क्रांती सुरू झाली.

विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन निबंध

भविष्यातील दळणवळण वेगवेगळ्या स्मार्ट कल्पना विद्युतीकरण आणि स्वायत्तता या कल्पनाभोवती फिरत राहील. भविष्यातील वाहतूक क्रांतीमध्ये हॉवरबाईक,हायपरलूप,सेल्फ ड्रायव्हिंग टॅक्सी, क्वाॅडकाॅप्टर,फ्लाईंग कार इत्यादी प्रकार नजीकचे भविष्यामध्ये येणार आहेत.भारत, अमेरिका, यूके, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये आता हायपरलूप प्रकल्पांचा विचार केला जात आहे.इतर उदाहरणांमध्ये ऑटोमॅटिक मॅग्लेव्ह ट्रेन्सच्या वेगवेगळ्या आवृत्तीचा समावेश आहे. केबल कार; पंख असलेल्या हायब्रिड कार; इलेक्ट्रिक बाइक्स, स्केटबोर्ड आणि इतर वैयक्तिक गतिशीलता उपकरणे; स्वायत्त बसेस; अगदी फाल्कन 9 रॉकेट्स देखील जगभरातील लोकांना त्वरीत पोहोचवण्यासाठी अंतराळ उड्डाणाच्या गतीचा फायदा घेण्यासाठी भविष्यात येणार आहेत.

जैवविविधता वर मराठी निबंध Essay on Jaivavividhata in Marathi

जपान आणि चीन मध्ये वेगवान बुलेट असल्याचे आपण ऐकतो. आपल्याकडेही मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन नजीकच्या भविष्यकाळात सुरू होणार आहे. मुंबई दिल्ली पुणे मद्रास बंगलोर अशा शहरांमध्ये मोनोरेल सुरू आहे. नवे नवे मार्ग आणि नवे नवी वाहने शोधली जाऊन त्या ठिकाणी प्रस्थापित केली जात आहेत. मुंबई-पुणे दरम्यान होणार आहेत परलोक महामार्ग हायपरलूप महामार्ग याचेच द्योतक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात होत असलेल्या अल्ट्रा मॉडर्न संशोधनामुळे दळणवळण क्रांतीला एक कल्पनातीत परिमाण लाभले आहे.नव्या युगाच्या नव्या आशा, नव्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा यामधून हे सर्व काही घडत आहे.

पृथ्वीवरील मानवी लोकसंख्या वेगाने वाढत आहे आणि वेगाने शहरी शहरीकरण होत आहे. 30, 60 किंवा अगदी 90-100 वर्षांपूर्वी डिझाइन केलेल्या रस्त्यांवरील प्रवास आधुनिक गतिशीलतेच्या गरजांची मागणी टिकवून ठेवू शकत नाही. परिणामी आपल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी Traffic Jam होत आहे. नव-नवे वाहतूक पर्याय येत आहेत.वाहतूक अकार्यक्षमतेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला दरवर्षी शेकडो अब्ज डॉलर्सचे नुकसान होते. रस्ते, हवाई, रेल्वे आणि सागरी वाहतूक नेहमीच अखंड एकात्मिक नेटवर्क म्हणून कार्य करत नाही, ज्यामुळे पुढील खर्च आणि विलंब होतो.

माझा आवडता संशोधक निबंध Maza Avadata Sanshodhak

एकादस सर्वसाधारण व्यक्तीची किंवा कुटुंबाचे कार घेणे हे आजही एक स्वप्न असते परंतू भविष्यवेधी विज्ञानाचा विचार करताना तर हे वाहन एक निरुपयोगी वाहन म्हणून सिद्ध होण्याची शक्यता जास्त आहे अवजड आणि चिलखती वाहने घेण्याची स्पर्धा जोरात सुरू होईल. हायब्रीड आणि शून्य उत्सर्जन असणाऱ्या कार, फ्लाईंग कार, जैविक सुरक्षितता देणाऱ्या गाड्या यांची निर्मिती आणि खरेदी ऑटोमोबाईल उद्योगाला सातत्याने प्रेरणा देत राहील. अर्थात एकविसाव्या शतकातील ऑटोमोबाईल उद्योग हा छोट्या कारपेक्षा मजबूत आणि सुरक्षित शून्य उत्सर्जन देणाऱ्या गाड्यांवर आपला संशोधन आणि विकास विभाग प्रेरित ठेवतील.

संपूर्ण जगामध्ये वायुप्रदूषणाने कहर केला आहे. पृथ्वीभोवतालच्या ओझोन थराला सुद्धा धोका निर्माण होऊन ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळत आहे. ग्लोबल वार्मिंग प्रचंड वाढते आहे. त्यामुळे प्रदूषण न करणाऱ्या गाड्यांची निर्मिती करणे हे पर्यायाने अटळ आहे. पेट्रोल,डिझेल इंधन पारंपरिक आणि नजीकच्या भविष्यकाळात संपणारी आहेत.त्यामुळे नैसर्गिक वायू ,सीएनजी, हायड्रोजन वायू यांचा वापर करून इंधन पर्याय शोधले जात आहेत आणि त्यानुसार दळणवळणाची साधने निर्माण होत आहेत.काही वर्षांमध्ये हे केवळ इलेक्ट्रिक आणि गॅस आधारित वाहनेच असतील. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्या हा इतिहास असेल.

वाहतूक लेखक आणि स्पीकर लुकास नेकरमन म्हणतात की, ऑटोमोबाईल उद्योगासाठी ” मोबिलिटी क्रांती ” येत आहे. मोबिलिटी क्रांती ही तीन शून्यांनी परिभाषित केली आहे. ते तीन शून्य म्हणजे शून्य उत्सर्जन, शून्य अपघात आणि शून्य मालकी. प्रदूषण न करणारी वाहने, कोणत्याही अपघाताला बळी न पडणारी वाहने आणि कोणत्याही ड्रायव्हर शिवाय चालणारी वाहने भविष्य घडवतील. नेकरमन म्हणतात, ” मोबिलिटीसाठी सर्वात शक्तिशाली साधन म्हणजे तुमचा स्मार्टफोन /मोबाईल फोन/ सेलफोन होय  .”

Future of Transportation

वाहतूक क्रांती सुरू झाली आहे. बिग डेटा आणि शून्य उत्सर्जन तंत्रज्ञान, स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम वाहतुकीच्या पद्धतींसाठी आशा निर्माण करतात. कार अजूनही आमच्या रस्त्यावर असतील, तथापि त्यांना शक्ती देणारी ऊर्जा आणि त्या ज्या पद्धतीने विकत घेतल्या जातात, भाड्याने घेतल्या जातात किंवा भाड्याने घेतल्या जातात आणि ऑपरेट केल्या जातात त्यामध्ये नक्कीच बदल होईल. वरील उदाहरणे मानवी वाहतुकीच्या भविष्यासाठी क्षितिजावरील काही नवकल्पना आहेत.

भविष्यवेधी दळणवळणाचा विचार करताना श्रीमंत लोकांना अंतराळात जाण्यासाठी अंतराळयाने पर्यटन साधन म्हणून वापरता येतील.जगातील पहिला अंतराळ पर्यटक डेनिस टिटो होता. एलन मस्क सारखी उद्योगपती या या संशोधनामध्ये आघाडीवर असतील.अनेक लक्ष्मीपुत्र अंतराळ पर्यटनाला जातील. पर्यंत सामान्य माणसाचा विचार केला तर त्याचे स्थान हे पृथ्वीवर पृथ्वीमातेच्या भूमिपुत्रासारखे कायम राहिल.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment